|
पु. १ ठावठिकाणा ; स्थान . तयाचिये भजनाचे नाटी । - ज्ञा १० . १०९ . जाळूं न शके नाटे लागी । - एभा २८ . ३६९ . २ प्रदेश ; देश ; नाड . [ द्रा . नाडु , नाड ] पु. १ नृत्य ; नाच . २ एक हलकी जात ; नाटकासारखे खेळ करणारी जात . उग्रगंधा अरुप गौळणी । नाट जातीच्या हस्तिणी । तयांसी लुब्ध हे चक्रपाणी । ही बाळपणीची स्वलीला । - जै ९ . ५९ . [ सं . नट ] पुन . १ अडथळा , अपशकुन करणे ; हटक ; प्रतिकूलता ; नड ; अडचण . आजचा दिवस नाट लागला . मुळीच भेटलासी आतां । नाट लागले संचिता । - तुगा १२८ . २ दुर्दैव ; अभाग्य ; अननुकूलता ; एखादी बिघडवणारी , नासणारी , अपकारक , अडथळा आणणारी , इजा इ० करणारी अशी योजना , शक्ति . आज काम व्हावयाचे परंतु आज काय नाट लागले ते समजेना . - वि . अमंगल ; अशुभ ; अननुकूल ; आडफाट्या ; नुकसानकारक ( वेळ , मुद्दा इ० ). [ सं . नष्ट ; प्रा . णठ्ठ ] पुन . १ तुळई . ( व . ) मोठी मयाळ ; लाट . घराच्या नाटेखाली जेवण्यास बसणे अशुभ मानतात . २ विशाळ , अवजड , आकार . [ हिं . ] पुन . १ कवड्यांचा एक खेळ . २ या खेळांतील ( पांच ) कवड्या . ३ या खेळासाठी ओढलेल्या रेघा , काढलेली आकृति , कोष्टक ; हा खेळ खेळावयाचा पट - स्त्री . ( कु . ) गोट्यांच्या खेळांतील एक शब्द . मारण्याकरितां गजरा गर्र करुन फिरवितात तो . गोटी नाटीस लाव . क्रि.वि. समुद्राचे आंत दूरवर ; जमीनीपासून दूर . गलबताची नाळ नाट लाव . पु. १ ज्या कुळाकडला घेण्याचा पैसा उगवेनासा झाला असे कूळ ; दिवाळखोर कूळ . २ एखाद्या दोषामुळे कुळास लागलेला बट्टा . - वि . १ दिवाळखोर ; नादार ; धुळीस मिळालेला ; पैसा देण्यास असमर्थ ; लुच्चा ; उडवाउडवी करणारा ( ऋणको ). २ सर्वस्वी नष्ट ; पूर्णपणे नाश झालेला ; बेपत्ता ; ज्याचा मुद्दापत्ता नाही असा ; फरारी . - क्रिवि . गोंधळाच्या मनःस्थितीत ; अशरण स्थितित . [ ? सं . नष्ट ] ०करणे चोरुन नेणे ; पळविणे ; उपटणे . ०भाजणे जाळणे अंगलता , अननुकुलता काढून टाकणे , तिचा नाश करणे . म्हणजेच बोहणी करणे ; एखादी गोष्ट हिंमत बांधून छातीने करणे . ०जाणे येणे खुंटणे ; तूट येणे ; वचन दिलेली , अपेक्षित मदत अथवा चाकरी करण्यास हयगय करणे ; नाकबुलीने , नाकाराने , ओढून धरणे . हा दोहो रुपयाला नाट गेला . रुक्मा तो परि नाठ जाउनि वदे नाहीच तां जिंकिला । - कृकौ ९७ . ०बाट पु. १ कमनशिबाची गोष्ट , अपराध , दोष , काळिमा , डाग , उणीव इ० बद्दल व्यापक शब्द . ( क्रि० असणे ; पडणे ; भाजणे ; जाळणे ). २ आढळून आलेला दोष ; अपराध ; लावलेला बोल , डाग किंव काळिमा ; कलंक . ( क्रि० आणणे ; ठेवणे ; येणे ; पडणे ). [ नाट + बाट ] नाटलाबाटला वि . बाट लागलेला ; बहिष्कृत ; कलंकित ; पंचांपुढे येण्यार्या बखेड्यांत नाटल्याबाटल्यांच्या खटल्यांची संख्या जास्त याचे कारण जातिभेद . - गांगा ३२ .
|