Dictionaries | References

निवडणे

   
Script: Devanagari

निवडणे     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
verb  चांगल्या किंवा कामाच्या गोष्टी वेगळ्या काढणे   Ex. माझी आई जेवणासाठी तांदूळ निवडत होती
HYPERNYMY:
वेगळे करणे
ONTOLOGY:
कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
SYNONYM:
वेचणे
Wordnet:
asmবাছা
bdजुदा खालाम
hinछाँटना
kanಆರಿಸು
kasژارُن , اَلَگ کَرُن
kokवेंचप
malതെരഞ്ഞെടുക്കുക
mniꯈꯟꯗꯣꯛꯄ
nepआलमारी
oriବାଛିବା
panਛਾਂਟਨਾ
tamதேர்ந்தெடு
telఏరు
urdچھانٹنا , چننا , انتخاب کرنا , کتربیونت کرنا , قطع برید کرنا , بیننا
verb  प्रतिनिधी म्हणून नियुक्त करणे   Ex. नरसिंह राव ह्यांना नेतेपदी निवडले. / ह्या अधिवेशनासाठी गांधीजींनी कॉंग्रेसचे अध्यक्ष म्हणून सुभाषबाबूंची निवड केली.
HYPERNYMY:
बनवणे
ONTOLOGY:
कार्यसूचक (Act)कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
SYNONYM:
निवड करणे
Wordnet:
asmনি্র্বাচন কৰা
bdबिसायख
benনির্বাচিত করা
gujચૂંટવું
hinचुनना
kokवेंचप
malതിരഞ്ഞെടുക്കുക
nepछान्नु
oriବାଛିବା
panਚੁਨਣਾ
sanवृ
urdانتخاب کرنا , منتخب کرنا , چننا , چناؤ کرنا
verb  धान्यातून कण, खडे, भूसा इत्यादी नको असलेली गोष्ट वेगळी करणे वा काढून टाकणे   Ex. आई तांदूळ निवडत होती.
HYPERNYMY:
वेगळे करणे
ONTOLOGY:
()कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
Wordnet:
bdबासि
gujછાંટવું
panਛਾਂਟਣਾ
urdچھانٹنا , پھٹکنا
verb  मनाला आवडलेली वस्तू घेणे   Ex. तिने त्यातून आपल्यासाठी एक सुंदरी साडी निवडली.
HYPERNYMY:
घेणे
ONTOLOGY:
कार्यसूचक (Act)कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
SYNONYM:
पसंत करणे
Wordnet:
ben(বেছে)নেওয়া
gujલેવું
kanತೆಗೆ
nepलानु
telఎంచుకొను
urdلینا
See : पसंत करणे

निवडणे     

उ.क्रि.  १ वेचणे . वोघ निवडतां निवडेना । गंगेमधे । - दा ९ . ३ . ३५ . २ ( ल . ) निर्णय , निश्चय , निकाल , निवाडा करणे , लावणे ; चावडिये न्यावो अन्यावो । निवडी वेदु । - ज्ञा १६ . २९५ . ३ निष्णांत , निपुण होणे . ते विद्याजात पढती । यज्ञक्रिये निवडती । - ज्ञा १७ . ७७ . ४ पसंतीस येणे ; हुडकून काढणे . देउनि गुरुपत्नीते । तूं गुरुभक्तांत जाणता निवडे । - मोअश्व ३ . ३७ . ५ घालवून देणे ; हाकलून देणे . परानिमित्त आपुला नाश । योग्य नव्हे करणे तुम्हांस । म्हणोनि निवडा त्या दोघांस । तरीच कल्याण तुम्हांसी । - जै ७६ . ४३ . [ प्रा . णिव्वड = पृथक होणे . तुल० सं . निवर्तन ] निवडणी , निवडणूक - स्त्री . १ वेंचणी ; पसंती ; पसंत करण्याची क्रिया . २ मतदारांनी उमेदवार निवडून देणे . निवड पाखड - स्त्री . ( बायकी ) धान्यांतील खडे वगैरे काढून , पाखडून स्वच्छ करणे . [ निवडणे + पाखडणे ]
उ.क्रि.  निवटणे पहा . ऐसा कल्पाल अभिप्रावो । तो सज्ञानासि न घडे भावो । तिही निवडूनियां अहंभावो । चिदानंदे पहा हो समाधिस्थ । - एभा १३ . ६५९ . [ निवटणे ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP