Dictionaries | References

रांधण

   
Script: Devanagari
See also:  रांधन

रांधण

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 

रांधण

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   cooking.
   A baking plate.

रांधण

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  शिजविण्याची क्रिया   Ex. रांधण झाले की आईला आराम करायला वेळ मिळतो.
ONTOLOGY:
कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)

रांधण

  न. शिजविणें ; रांधणें ; पाकक्रिया . २ रांधण्याचें भांडें , मडकें . रांधण नाहीं आमुचे धरीं - भवि ९ . १७० . ३ स्वयंपाक . ४ ( गो . ) चूल . [ सं . रध् ‍ - रंधन ] रांदायणी - स्त्री . स्वयंपाकीण बाई . [ सं . रंधन ] रांधचेकुड - स्त्री . ( कु . ) स्वयंपाकघर . रांधणी - स्त्री . ( व . ) स्वयंपाकघर . रांधणें - सक्रि . शिजविणें ; उकडणें . [ सं . रंधन ] म्ह० सारी रात्र जागली आणि शेंगावांगीं रांधलीं . रांतें घर - न . १ स्वयंपाक घर ; रांधतेंघर . २ माजघर . रांधतेंघर - स्त्रीन . ( ना . ) स्वयंपाकघर ; पाकशाला . रांधनीपल्ल - न . ( गो . ) चुलखंड . रांधप , रांदाप - न . १ शिजविणें ; उकडणें . २ रांधलेले पदार्थ ; स्वैंपाक . [ रांधणें ] रांधपखण - न . ( हेट . ) स्वैंपाकघर . रांधपी - पु . १ सैंपाकी ; आचारी . २ ( हेट . नाविक ) जहाजावर जेवण तयार करणारा इसम . [ रांधप ] रांधपीण - स्त्री . ( गो . ) स्वयंपाकीण . [ रांधप ] रांधय - न . ( गो . ) एक आमटीचा प्रकार . रांधवणा - पु . सैंपाकी ; आचारी . बल्लव रायाचा रांधवणा । - मुविराट २ . ४४ . रांधवणी - स्त्री . स्वयंपाक करणारी सुगरण स्त्री . जैसी रांधवणी रससोय निकी । - ज्ञा २ . २५४ . - वि . स्वयंपाक करण्याची ( चूल ). रांधवणी चुलीपुढें । - ज्ञा १३ . ५६२ . रांधवणी - न . स्वयंपाकाचीं खरकटीं भांडीं व हात धुतलेलें पाणी . [ रांधणें + पाणी ] रांधापघर - न . ( रत्नागिरी ) स्वयंपाकघर . रांधिये उणें - वि . पुरतेपणीं किंवा मुळींच न शिजविलेलें . रानपीण - स्त्री . ( कु . ) स्वयंपाकीण . [ रांधण ]
  न. मातीचा तवा ; पदार्थ भाजण्याचें खापर . [ सं . रध् ‍ ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP