Dictionaries | References

अवघड

   
Script: Devanagari

अवघड

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   ; i. e. arduous, abstruse, inaccessible, impassable, intolerable, improbable. 2 Confined or strait--a place. 3 Severe--a sickness. 4 Strange, eccentric, bad--an action. 5 Awkward, inconvenient, embarrassing--place, circumstances. Pr. अ0 जागां दुःख जांवई वैद्य. 6 Hardin most of its figurative applications; as strange, odd, irregular--doing: grievous or afflictive--events: unreasonable or unconscionable; forced or strained &c. 7 Used as s n A difficulty, embarrassment, or trouble. अ0 वाटणें or होणें in con. To feel strange, odd, unquiet, uncomfortable. 2 To be difficulted, puzzled, nonplus-ed.

अवघड

 वि.  कठीन , कष्टप्रद , त्रासदायक , बिकट ;
 वि.  असाध्य , दुर्घट , दुष्कर , दुःशाध्य ;
 वि.  अगम्य , अगाध , किचकत , गहन , शूढ , जटिल , दुर्बोध .

अवघड

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
   See : दुष्कर, कठीण, कठीण

अवघड

 वि.  कठिण ; कष्टप्रद ; ( करण्याला , जाणण्याला , पोहोंचण्याला , सोसण्याला किंवा घडण्याला ); दुर्घट ; जबर ; दुष्कर ; श्रम - साध्य ; अशक्य ; असंभाव्य ; दुर्ज्ञेय ; दुर्गम ; दुर्लंघ्य ; दुष्प्राप्य . मिळाला जो अवघड वर । तो ऐकावा जी विचार । - कथा १ . ३ . १३ .
   अडचणीचें ; अप्रशस्त ; अरुंद ( स्थळ , जागा ).
   विलक्षण ; लोकोत्तर ; लोकबाह्य ; वाईट ; तर्‍हेवाईक ( कृत्य ).
   गैर ; भलतेंच ; चमत्कारिक ; गैरसोईचें ; घोटाळ्याचें ; संकटावह ( स्थळ , परिस्थिति , अवस्था ). अवघड जागीं दु : ख व जांवई वैद्य .
   कठिण ( बहुतेक सर्व लाक्षणिक अर्थानें ) जसें : विलक्षण , चमत्कारिक , अनियमित ; बेशिस्त ( करणी ); दु : खप्रद , त्रास देणारी , पीडा करणारी ( गोष्ट ). बुध्दीला न पटणारें ; बळजबरीचें ; अयोग्य ; सक्तीचें ; ओढून ताणून आणलेला . हे असो दीपाचिये सिध्दी । अवघड धू आधीं । - ज्ञा १८ . ७८० .
   वेडेंवांकडें ; चमत्कारिक ; भिन्नभिन्न आकाराचें . होतु कां उजू वांकुडें । परि बोरीचें हे न मोडे । तैसी भूतें अवघडें । परि वस्तु उजू । - ज्ञा १३ . १०६१ .
   दु : साध्य ; कठिण ( दुखणें ). [ सं . अव + घट ]. ... न . अडचण ; लचांड ; संकट ; त्रास . समर्थाचेनि नामैचि अवघडे निस्तरीजति - पंचतंत्र ३ . ९ .
०वाटणें   होणें -
   अस्वास्थ्य ; असमाधान वाटणें ; संकोच वाटणें ; कसेसें वाटणें . मला त्याच्या घरीं अवघड वाटतें .
   गोंधळणें ; भांबावणें ; घोंटाळ्यांत पडणें .
   असह्य वाटणें ; दु : ख होणें . मुलगी सासरी जावयाला निघाली , तेव्हां तिला अति अवघड वाटलें .
०जागा   जांघ वगैरे जागा ; अडसंधि . अवघड जागीं दु : ख आणि जांवई वैद्य .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP