-
पु. १ ( कामाची , धंद्याची ) सिध्दि ; संपादणी ; हेतु साध्य होणें , सफळ होणें , शेवटास जाणें ; इच्छा तृप्त होणें ; तृप्ति . २ कशी तरी , बरीवाईट , सरासरी , सार्थकता , शेवट . पांचशें रुपयांनीं लग्नाचा चरितार्थ होईल . ३ कसा तरी , स्वल्प सामुग्रीनें , उदरनिर्वाह . मणभर भातामध्यें कसा तरी चरितार्थ करतों . ४ पोट भरणें ; उदरंभरण ; उदरनिर्वाह . स्त्रियांनीं घरची कृत्यें संभाळावीं आणि पुरुषांनीं पराक्रम करून दोघांचा चरितार्थ चालवावा . - गुप्तमंजूष ४ . - वि . सिध्दीस गेलेला ; लागू पडलेला ; पूर्ण केलेला ; अभिप्रेत अर्थी स्वीकार केलेला ( नियम , विधि , आज्ञा ). समाधान पावलेला ; तृप्त झालेला ( मनुष्य ). [ सं . चरित + अर्थ ]
-
वि. ( महानु .) सफल ; फलद ; कार्यकर . ' तुमची क्रिया चरितार्थ कीजैल .) - उच २०१ . ( सं . चरित + अर्थ )
-
; in a passable or tolerable manner. Ex. मणभर भातामध्यें कसातरीं च0 करतो; पांचशें रुपयांनीं लग्नाचा च0 होईल.
-
ना. उदरनिर्वाह , उदरभरण , उपजीविका , निर्वाह , पोट भरणे , योगक्षेम .
Site Search
Input language: