Dictionaries | References

मुडा

   
Script: Devanagari

मुडा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
.
muḍā a Of which the mouth is broken off--a vessel, earthen or metal.

मुडा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  An oval bundle formed of layers of grass, containing grain, &c.
मुडा घालून बसणें   To sit bundled cogether.

मुडा     

वि.  
 पु. 
तोंड किंवा गळा फुटलेलें ( मडकें ).
भात किंवा इतर धान्य आंत घालून बाहेरुन पेंढा अगर गवत यांचें आवरण घालून सुंभानें अगर दोरीनें बांधून केलेलें गोलाकार किंवा अंडाकृति गाठोडें , कणगा . निरनिराळ्या आकारावरुन याला निरनिराळीं नांवें आहेत . उदा . मुडी , मुडें , कोळें , चोबा इ० .
वरील गठ्ठ्याइतक्या प्रमाणाचें धान्य . पंचवीस मण हें एका मुड्याचें परिमाण मानितात .
चोंबडा ( मनुष्य ).
गुळाच्या ढेपीचा निघालेला तुकडा .
कणगा ; बीजाचें साठवण ; सांठा . तुका म्हणे बीज मुडा । जैशा चाडा पिकाच्या । - तुगा . २७४४ .
( माण . ) गाठोडें .
ठराविक वजनाइतकें खोबरें . खोबर्‍याचा मुडा . [ मूठ + का . मुडि ]
०घालून   - पोटाशीं पाय घेऊन व गुडघ्यांत मान घालून व त्या सभोवतीं दोन्ही हातांचा वेढा देऊन बसणें ; शरीराचें गाठोडें करुन बसणें . म्ह० ( गो . ) मुड्यांनीं खाल्लें तर वेढ्यानीं तरी पाउक जाय . = एखाद्याकडून पुष्कळसें घेऊन खाल्लें तर थोडें तरी त्याला पोंचविलें पाहिजे .
बसणें   - पोटाशीं पाय घेऊन व गुडघ्यांत मान घालून व त्या सभोवतीं दोन्ही हातांचा वेढा देऊन बसणें ; शरीराचें गाठोडें करुन बसणें . म्ह० ( गो . ) मुड्यांनीं खाल्लें तर वेढ्यानीं तरी पाउक जाय . = एखाद्याकडून पुष्कळसें घेऊन खाल्लें तर थोडें तरी त्याला पोंचविलें पाहिजे .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP