|
स्त्री. ( व . ) स्त्री. मठ ; एक धान्यविशेष ; मटक्या . मोठी पिशवी ; पोतें ; मोठें ओझें ; गाठोडें ( धान्य , शेण इ० चें गाठोडें किंवा एकत्र जखडून बांधलेल्या पुष्कळ वस्तूंचा समूह ढीग , रास ). ना तो सूर्य मोटे । बांधितां निकें । - अमृ ७ . २७४ . बैलांकडून किंवा रेड्यांकडून विहीर वगैरेंतील पाणी वर काढण्याचें साधन . पाणमोट ; पोटांतील पाण्याची पिशवी . ( क्रि० येणें ; पडणें ; फुटणें ; निघणें ). ( ल . ) पशूला खालीं जमीनीवर पाडून त्याच्या पायांचे चारी खूर एकत्र बांधलेली त्याची स्थिति ; भूत - पिशाच्च बाधा झाली असतां माणसाची गठडी वळवून त्यास बांधलें जाणें किंवा त्याचे हातपाय जखडले जाणे शिदोरी ; उपहाराच्या साहित्याचें गाठोडें . मग आपुलालिआ मोटां घेऔंनि । सकळें एतें जालें । - दाव २०१ . दहा हजार ही संख्या . ( स्त्रिया फुलांची , दुर्वांची लाखोली वाहतात त्यावेळीं लक्षाचा दहावा अंश याअर्थी योजतात . ) म्ह० शिनळ धरावा खाटेस चोर धरावा मोटेस . ०बांधणें इच्छेविरुद्ध जखडून बांधणें ; एखाद्यास त्याच्या इच्छेविरुद्ध एखाद्या कार्यास प्रवृत्त करणें ; इच्छा नसतां धरणें . वार्याची बांधणें , ०बांधणें असंभाव्य गोष्ट करुं पाहणें . धरणें क्रि . मोट जुंपणें , सुरु करणें , हांकणें . सामाशब्द - ०करी पु. मोट हांकणारा ; मोटेवर काम करणारा . ०कळें कुळें - न . गांठोडें ; कसें तरी बांधलेलें किंवा नीट न बांधलेलें गांठोडें . मोटळा पहा . ०कुळी स्त्री. गांठोडी . ०उडी स्त्री. ( पाण्यांत ) उडी टाकतांना हवेंत असतांच स्वतःचे हातपाय पोटाशीं धरुन व शरीराचें गाठोडें करुन जी उडी मारतात ती . याच्या उलट चुबकती उडी . मोटला , ळा , मोटली , ळी , मोटलें , ळे पुस्त्रीन . मोटकुळें , पुरचुंडी ; गाठोडें . पृथुक मोटली सांपडतां प्रभु बहु हर्षाला लाहे । - मो सुदामचरित्र ( नवनीत पृ . ३७७ ). मोटवण न . मोटेंतील पाणी जेथें ओतलें जातें ती जागा . ( कर . ) मोटेचें वडप ; मोटेकरितां उभारलेली जागा . मोटस्थळ , मोटस्थळ जमीन - नस्त्री . मोटेच्या पाण्यानें भिजणारी जमीन ; विहीरीच्या पाण्याखालीं , बुडकीच्या पाण्याखालीं भिजली जाणारी जमीन . याच्या उलट पाटस्थळ . मोटाळा , ळी , ळें - न . ( महानु . ) गाठोडें ; बंधन . महातारी तमाचा मोटाळा गा । - चरित्र . ( महानु . ) ( ल . ) सामान ; संग्रह ( रोजचें व्यवहारोपयोगी भांडींकुंडीं , खाद्यवस्तु इ० ). मोटाळा बांधागा । - सूत्रपाठ . मोट्या - वि . मोटा वाहण्याचें कसब करुन उपजीवन करणारा ओझीं किंवा गठ्ठे वाहून नेणारा , हमाल . [ मोट ]
|