|
सोळा आणे किंमतीचे चांदीचे नाणे .
निरनिराळ्या राज्यांत व निरनिराळ्या टांकसाळीतील रुपयांना निरनिराळी नावे होती .
त्यांचे प्रमाण पुढील प्रमाणे -
कंपनीच्या १०० रुपयांबरोबर
१०४ चांदवडी ,
१०४ चिंचवडी ,
१०६ भडोच ,
१०९ बडोदी , बाबाशाई ,
११२ खंबायती ,
१०७ अमदाबादी ,
३७९ देसलशाई ,
१०९ कितुर शापुरी ,
१२३ औरंगाबादी ,
१२३ इराणी .
ज्या परगण्याचे अगर देशाचे नांव रुपयाला असे त्या परगण्यांत अगर देशांत तो चाले . याशिवाय आणखी पुढील प्रकारचे रुपये होते . - शिक्का , तळेगांवी , पन्हाळी , उखळी , कंची , बेलापुरी , अंकुशी , कोरे , ऐन शिक्का , मलकापुरी , अटीकी , बागलकोटी , नीळकंठशाही , तुटकरी , अरकौटी , इटावा , जरीकडा , काशीशिक्का , फुलचरी , दौलताबाद शिक्का , हुकेरी , गंजीकोट , छत्रपरी . पु. धन ; संपत्ति ; पैसा ; नाणे . रुपया व त्याचे भाग यांना पुढीलप्रमाणे सांकेतिक नांवे आहेत - राम = रुपया ; सीता = अधेली ; लक्ष्मण = पावली ; भरत = चवली ; रामदास = आणेली . [ सं . रुप्यक . रुपे ] रुपया पहा . ०मोडणे रुपयाची मान मोडणे - रुपयाची मोड करणे ; रुपयाचे नाणे किंवा खुर्दा करणे . नानक शहाचा अनुयायी . - सिंधी इंग्रजी कोश .
|