Dictionaries | References

लग्नासारखा हर्ष नाहीं, मरणारखा शोक नाहीं

   
Script: Devanagari

लग्नासारखा हर्ष नाहीं, मरणारखा शोक नाहीं     

लग्न सोहळा हा अतिशय हर्षदाई आहे. श्री. गडकर्‍यांच्या ‘ पुण्यप्रभावांत ’ -जन्मकाळीं आठवणीचा जन्म झालेला नसतो आणि मरणकाळीं आठवणीचेंच मरण ओढवतें म्हणून आयुष्यांतला अत्युत्तम, महत्वाचा आणि आनंदाचा असा जो लग्नाचा काल, त्याची आठवण मात्र तिप्पट जोरानें ताकद धरुन राहते...अशा तर्‍हेचा मजकूर आहे. तद्वतच, मरणासारखा शोक नाहीं. इतर कुठल्याहि दुःखापेक्षां मृत्युचें दुःख अधिक असतें. मग तें दुःख स्वःतच्या ओढवणार्‍या मृत्यूचें असो, वा इतराच्या मृत्यूचें असो. ( गु.) लगनसमान हरख नहि, ने मोहत समान शोक नहि.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP