|
पु. क्रूर मासांहारी जंगली प्राणी ; एक वन्य पशु . एक उड्या मारणारा कीटक . बुद्धीबळांतील शेळ्या मेंढ्या खेळांतील हत्ती . एक मुलांचा खेळ . - वि . ( ल . ) जागरुक व भयप्रद . [ सं . व्याघ्र ; प्रा . वग्घ ; पं . हि . बं . वाघ ; सिं . बाघु . गु . वाघ ] ( वाप्र . ) ०डांभणे गार्याजवळ ( वाघ आल्यास त्यावर मारा करील अशी बंदूक बांधून ठेवणे ). सामाशब्द - ०जाई स्त्री. व्याघ्रदेवता ; एक क्षुद्र देवता . ०जोर पु. ( व्यायाम ) एक प्रकारचे दंड काढण्याची पद्धति . एक प्रकारचे दंड काढण्याची पद्धति . - व्यायाम मासिक मार्च १९२३ . ०ट न. लहान वाघ ; वाघ शब्दाचे तिरस्कारदर्शक रुप . ०डोळ्या वि. मोठ्या , बटबटीत व पाणीदार डोळ्यांचा . ०नख न. वाघाची नखे सोन्यांत मढविलेला लहान मुलांचा एक दागिना . वाघाच्या नखांच्या आकाराचे पोलादी हत्यार . वाघाचा पंजा . ०नख - स्त्री . मद्रासकडील महाराष्ट्रीयांत प्रचलित असलेला एक दागिना . सांखळी - स्त्री . मद्रासकडील महाराष्ट्रीयांत प्रचलित असलेला एक दागिना . ०नखी स्त्री. झाड . एक पोलादी हत्यार . ०बकरी स्त्री. एक खेळ . ०बीळ न. वाघाची गुहा . ०मान पु. मुख्य मान . तुम्ही आपला जो वाघमान करावा तो करुन घेतला . - भाव ६८ . ०मार्या वि. वाघास मारणारा . ( ल . ) अतिशय बळकट , शूर , धाडसी . अतिशय लागणारा ( हरिक , सुपारी वगैरे पदार्थ ). ०मुंगी स्त्री. भयंकर दंश करणारी मुंगी . ०मेंढी मेंढ्या - स्त्री . बुद्धिबळांतील एक खेळाचा प्रकार . ०यी स्त्री. सुंगट जातीचा मोठा मासा . री पु . जाळ्यांत पशुपक्षी पकडणारी एक जात व तींतील व्यक्ति ; फासेपारधी . यांचे सांकेतिक शब्द - मुवा = गुरु ; माती = मृतमांस ; माड , बिलाडी = पोलीस ; झेमी = घरफोडी ; माढेनो = चोरलेले जवाहीर ; हाथवान = चोरीचे कापड ; तारखो = रुपया ; पिलिऊन = सोने ; धोलीऊन = रुपे ; चमई जावन = लप ; खावरी = वाघानी ; दातरड = घरफोडीचे हत्यार ; चिरित्रो = किल्ल्यांचा जुडगा ; बांदो = साथीदार ; भुर्यो , माकडो = युरोपिअन ; वस्तू ; पैसे इ० . ०रुं न. वाघास तुच्छतादर्शक शब्द . ०वडाई स्त्री. वाघजाई ; क्षुद्रदेवता . फूजिति वाघवडाइआं । - शिशु ५२७ . ०व - एक मुलींचा खेळ . - मखेपु ३५५ . बकरी - एक मुलींचा खेळ . - मखेपु ३५५ . ०वे वाघावे - न . वाघांचा उपद्रव . ( ल . ) उपद्रव ; त्रास ; पीडा ; काहूर . आमच्या विरुद्ध काय वाघवं उठलंय ते तूं पहातच आहेस . - झांमू १७७ . वाघाचा डोळा - पु . ( संकेत ) रुपया . वाघाची जाळी - स्त्री . वाघास लपून बसण्यास योग्य झाडी , वेलांची गुंतागुंत वगैरे . वाघाची मावशी - स्त्री . मांजर . वाघाचे कातडे - न . व्याघ्रचर्म ; वाघाचे चामडे . ( ल . ) अधिकार , सत्ता गेल्यावरहि ज्यास लोक भितात असा मनुष्य . ०कातडे - आव आणणे ; पोकळ सत्ता , सामर्थ्य दाखविणे ; ढोंग करणे . वाघाड्या - पु . मंत्रसामर्थ्याने वाटसरुंच वाघांपासून संरक्षण करणारा मांत्रिक . वाघी - स्त्री . पांघरणे - आव आणणे ; पोकळ सत्ता , सामर्थ्य दाखविणे ; ढोंग करणे . वाघाड्या - पु . मंत्रसामर्थ्याने वाटसरुंच वाघांपासून संरक्षण करणारा मांत्रिक . वाघी - स्त्री . वाघ्याची भंडार ठेवयाची - वाघाच्या कातड्याची पिशवी . वाघाच्या तोंडाचा पुढे आकार असलेली जलद चालणारी नौका , होडी . वाघाच्या कातड्यासारखी पिवळ्या रंगाची , वर ठिपके असलेली घोड्याची झूल . लांकूड तासण्यासाठी त्याच्याखाली ठेवावयाचा सुताराचा एक खांच पाडलेला ठोकळा . दोन टोंकांचा खिळा एक प्रकारचा सोनाराचा चिमटा . - वि . वाघाच्या रंगाचा ; वाघासारखा . एके वाघी पिवळी पुंडी । - दाव २८१ . वाघी कवडी - स्त्री . ठिपके असलेली कवडी . वाघीण - स्त्री . स्त्रीजातीची वाघ ; वाघाची मादी . वाघी तंबाखू - स्त्री . पानावर ठिपके असलेली तंबाखूची जात . वाघेरे - वि . वाघांनी भरलेले . - लोक २ . ७७ .
|