Dictionaries | References

विटाळ

   
Script: Devanagari

विटाळ     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
.

विटाळ     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  Impurity, pollution. The menstrual discharge.

विटाळ     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  अशुद्ध, अपवित्रा वस्तूच्या संसर्गाने होणारा दोष   Ex. त्याला विटाळ झाला.
ONTOLOGY:
भौतिक अवस्था (physical State)अवस्था (State)संज्ञा (Noun)
Wordnet:
benছোঁয়াচ দোষ
hinछूत
kokआफुडणी
noun  अस्वच्छ वस्तूचा संसर्ग   Ex. विटाळ टाळावा.
ONTOLOGY:
शारीरिक कार्य (Physical)कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
संसर्ग
Wordnet:
benছোঁয়াচ
oriଛୁଆଁ
tamதீயபொருள்
telమైల
See : रज

विटाळ     

 पु. १ दोष ; अपवित्रता ; अशुध्दता ; विशिष्ट प्राणिमात्र , वस्तुजात यांमध्यें असणारी अशुचिता . तरी आतां दिठीचा विटाळु गेला । - ज्ञा ११ . १९२ . या स्त्रीजिता नित्य विटाळ पाही । - सारुह ८ . ११ . २ अशुध्द , अपवित्र वस्तूच्या संसर्गानें प्राप्त होणारा दोष ; अशुचिता ; अस्पृश्यसंसर्गजन्यदोष . ३ स्त्रियांचा ऋतुस्त्राव ; रज : स्त्राव . रजस्वलेचा जो विटाळ । त्यामध्यें जन्मयांसि । - दा ३ . १ . ११ . ४ अभाव , अलिप्तता वगैरे दाखविण्यास हा शब्द योजतात . आम्हा विषयांचा विटाळु सदा । - शिशु २०१ . त्यांस देशभाषेचा विटाळहि सोसत नाहीं . - नि २ . [ सं . विष्टा ; प्रा . विट्‍ठा ; प्रा . विट्टाल ] ( वाप्र . ) करून घेणें - विधवेनें वपन करून घेणें .
०कालवणें   विटाळ पसरणें ; एकापासून दुसर्‍यास याप्रमाणें दोष सर्वभर होणें .
०जाणें   १ वेळीं अवेळीं रजःस्त्राव होणें . २ रजःस्त्राव होण्याचें अजिबाद बंद होणें . विटाळणें - उक्रि . १ अशुध्द , दूषित , भ्रष्ट , अपवित्र करणें ; विटाळ करणें ; होणें . जैसे पुत्र विटाळले । - विपू १ . ८४ . २ केवळ स्पर्श होणें , नाममात्र संबंध येणें . जेवण न जातां तोंड मात्र विटाळलें .
०चंडाळ  पु. नानाप्रकारचा विटाळ ; सर्वसामान्य विटाळ . विटाळशी - स्त्री . रजःस्वला ; ऋतुस्त्रात स्त्री .
०चंडाळशी  स्त्री. विटाळशी .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP