Dictionaries | References

शाई

   
Script: Devanagari
See also:  शाही

शाई     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Ink. 2 A paste made of ironrust; to be applied to the bass-end of a मृदंग or tabor.
or the members of an army &c. considered as a body. Ex. सगळ्या शाईंत त्यासारखा शूर दुसरा कोण्ही नाहीं. 3 There are numerous licentious formations with this word; as ढपळशाई, फुकटशाई, बागशाई, लंगडशाई; of which the greater part will occur in order.

शाई     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Ink; a paste made of iron-rust. Sway. A people.
  Relating to the rule of. Belonging to.

शाई     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  लिहिण्यासाठी बनवलेला रंगीत द्रव पदार्थ   Ex. शाईचा उपयोग लिहिण्याची सुरवात झाल्यानंतर बर्‍याच काळाने झाला
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
मशी मषी
Wordnet:
asmচিয়াঁহী
bdखालि
benকালি
gujશાહી
hinस्याही
kanಮಸಿ
kokशाय
malമഷി
mniꯃꯨꯛ
nepमसी
oriକାଳି
panਸਿਆਹੀ
sanमसिः
tamமை
telసిరా
urdروشنائی , سیاہی
noun  लोखंडाच्या किसापासून तयार केलेले मृदंग, पखवाज इत्यादीस लावण्याचे लुकण   Ex. तबल्याची शाई उडाली आहे
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
पुडी
Wordnet:
benগাব
kanಪ್ಯೂರಿ
oriପୁଡ଼ି
panਪੂਰੀ
sanखरलिः
telతోలు

शाई     

 स्त्री. १ मषी ; लिहिण्यासाठीं बनविलेला रंगित द्रव पदार्थ . शाईचा उपयोग लिहिण्याची सुरवात झाल्यानंतर बर्‍याच काळानें झाला - ज्ञाको २० . १५ . २ लोखंडाच्या किसापासून तयार केलेलें मृदंग , पखवाज इ० स लावण्याचें लुकण , रोगण . [ फा . सियाही ]
वि.  १ ताबा , अंमल यासंबंधीं ; गुण , स्वभाव , नांव धारण करणारा ; मालकीचा . उदा० पुणेंशाई , मुंबईशाई , सुरतशाई . २ कडून प्रस्थापित ; संबध्द ; वाच्य - वाचक . उदा० शिंदेशाई ; होळकरशाई , अप्पाशाई , बाबाशाई . ३ नाणीं , चाली , रीतरिवाज , पध्दती , कायदे वगैरे . उदा० शिवशाई , आदिलशाई , इ० ४ विशिष्ट जातिगुणादिवाचक . उदा० ब्राह्मणशाई , शूद्रशाई , मोंगलशाई , सोदेशाई , शिनळशाई , लबाडशाई . - स्त्री . १ अंमल ; सत्ता ; अधिकार ; आमदानी ; कारकीर्द . शिंदेशाई पुण्यामध्यें झाली . २ ( राज्य , गांव , लष्कर , इ० मध्यें राहणारा विवक्षित ) जनसमूह ; समाज . उ० सगळया शाईत यासारखा शूर दुसरा कोणी नाहीं . होळकरशाईमधें मल्हारबा होता एकच पूत . - ऐपो ९० , ११० , १२७ , इ० . ३ राजमंडळ ; राज्य . ४ आणखीं निरनिराळे संकीर्ण उपयोगाचे प्रकार . उदा० ढपळशाई , फुकटशाई , बागशाई , लंगडशाई . [ फा . शाही ]
०घालणें   नाश करणें . त्या सुंदर चित्रावर त्या दुष्टानें शाई घातली .
०शिरस्ता  पु. १ सार्वजनिक किंवा सर्वसाधारण चालरीत , पध्दत ; रिवाज , रूढी ; जनरीति . २ राजशिरस्ता ; राजरीत . चांगलें माणूस मिळऊन शाई शिरस्त्याचें मर्द माणूस पाहून - समारो १ . १३ .
०देणें   कराराप्रमाणें वागण्याची निश्चितता दाखविण्याकरितां आगाऊ कांहीं पैसे देणें , इसार , बयाणा देणें .
०दान   दानी - न . स्त्री . ( क . ) दौत ; शाई ठेवण्याचें साधन ; पात्र .
०शिरें  न. शिर्‍याची शाई . - रा ८ . २१ .
०शोक   सोक - पु . ( व . ना . न . ) टिपकागद . ( इं . ) ब्लॉटिंगपेपर . [ शाई + शोक ( ष ) णें ] शाईचा पुडा शाईपुडी - पुस्त्री . शाई किंवा लुकण लावलेली मृदंगाची बाजू .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP