नक्षत्रस्वामी - परिचय

श्री नक्षत्रस्वामींचा जन्म हाच मुळी एक चमत्कार , कारण त्यांचा जन्म एका विधवेच्या पोटी आणि तोही नक्षत्रापासून .


सुमारे ३५० वर्षांपूर्वी सद्याच्या सांगली जिल्ह्यात , तासगाव तालुक्यात , कवठे एकंद या गावी श्रीनक्षत्रस्वामी या नावाचे एक सत्पुरूष होऊन गेले . त्यांची मुंज आनंदमूर्ती यांनी केली . आनंदमूर्ति हे समर्थ रामदास पंचायतनापैकी एक . श्री समर्थ रामदास , जयरामस्वामी वडगावकर , रंगनाथस्वामी निगडीकर , केशवस्वामी भागानगरकर आणि आनंदमूर्ति ब्रम्हनाळकर हें तें समर्थ पंचायतन . या गावी श्री सिद्धराजाचे जागृत देवस्थान आहे . श्री नक्षत्र स्वामींचा जन्म हाच मुळी एक चमत्कार . विधवेच्या पोटी जन्म आणि तोही नक्षत्रापासून , ही अशक्यप्राय कोटीतील गोष्ट . त्यांनी केलेल्या काव्याची रचना श्लोक , आर्या आणि ओवी या प्रकारात आहे .

N/A

References : N/A
Last Updated : May 20, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP