नक्षत्रस्वामी - अध्याय चौथा

श्री नक्षत्रस्वामींचा जन्म हाच मुळी एक चमत्कार , कारण त्यांचा जन्म एका विधवेच्या पोटी आणि तोही नक्षत्रापासून .


आतां मुख्य देवालय । परम पवित्र शिवालय ।

श्वशुर ज्याचा हिमालय । नगाधिपती ॥१॥

हे सिद्धपुरुषांचे समाधिस्थान । परम पवित्र गहन ।

मोक्ष मुक्तिचे साधन । भाविकांस ॥२॥

अनादि काळी प्रख्यात । श्रीकृष्णेच्या डोहात ।

भिल्लग्रामे होता स्थित मठ सिद्धाचा ॥३॥

श्रीभुवनेश्वरी वरदायिनी । सिद्धांचे येवोन स्वप्नी ।

म्हणे हे स्थान सोडोनी । कवठ्यास जावे ॥४॥

तेथेच करावा वास । दीन भक्त तारण्यास ।

भूतबाधादि करी निरास । निरामय क्षेत्र ॥५॥

त्या कारणी वेगीं आले । मठ स्थापोनी राहिले ।

पुढे देवालय बांधविले । ते हे शिवालय ॥६॥

या मंदिराचे वेगळेपण । सृष्टि धर्ता -हर्त्याचे विलक्षण ।

हरिहराचे मिलन जाण । येथे झाले ॥७॥

श्रीयंत्र नक्षत्रसाधन बळे । मंदिराची उभारिली स्थळे ।

सौंदर्य कुशल कोमल मुळे । गर्भगृहे ॥८॥

उजवे हाती श्रीगजानन । डावे हाती श्रीहनुमान ।

पुढे नांदि भक्त महान । श्रीचरणी दक्ष ॥९॥

कूर्म बसले सांवरून । अवयव सारे एकवटून ।

दृष्टि देवाकडे लावून । स्थितप्रज्ञ ॥१०॥

माथा गणेशपट्टी आगळी । सूर्यचंद्र धाटी वेगळी ।

कलाकुसरीची नव्हाळी । प्रवेशद्वारी ॥११॥

येथे उभे राहून । भक्त करती मुखदर्शन ।

नंदिच्याशृंगा हात लावून ।ल्क्षताती ॥१२॥

गर्भगृह पहिले ढोलांचे । कुळकुळीत पाषाणाचे ।

नाना कलाकुसरीचे । खांब कमानी ॥१३॥

कमळे , अश्वमुखे , तळखडे । फरसबंदीचे रूप तगडे ।

घडीव चिर्‍यांनी लगडे । रचिले शिशांत ॥१४॥

शिरता या गाभार्‍यात । दक्षिणेस एका कमानीत ।

शिवलिंग केले स्थापित । द्वार सुरुंगाचे ॥१५॥

येथे प्रवेश केला असता । शामिवृक्षाकडे जातो रस्ता ।

पुढे अंधार आहे नुसता । आणि पाणी ॥१६॥

गाभार्‍याचे दक्षिणद्वार । विंझण वाहे निरंतर ।

द्वारापाठी मोठा अडसर । रक्षणकर्ता ॥१७॥

अगणित रुपये चांदीचे । मध्ये नाणे सुवर्णाचे ।

देणे नवसासायासाचे । फरसबंदी ठोकलेले ॥१८॥

तेणे पालटले रूप । पाषाणाचे बदले स्वरूप ।

भूमि मढवली रुप्याने खूप । ऐसे दिसे ॥१९॥

या गाभार्‍यात थंड वात । आणि श्रींचे शेजघर शांत ।

मंचकावरी विसावे निवांत । प्रभू सिद्धराज ॥२०॥

येथे गुरवाचा अधिकार । शिवालयाचा प्रपंच थोर ।

देणे -घेणे , साष्टांग नमस्कार । येथून करा ॥२१॥

जीवन म्हणजे एक श्वास । उश्वासाचा नाही विश्वास ।

असावे मरणाचे खास । स्मरण पदोपदी ॥२२॥

परी व्यवहार प्रबळ दारूण । प्रपंच परमार्थाचे कारण ।

विवेक कसला स्वार्थ प्रमाण । युद्धे करती ॥२३॥

ऐसा मोठा योद्धा एक । बलदंड करी भालाफेक ।

ज्ञाता शस्त्रास्त्रांचा अनेक । पटवर्धन कुळी ॥२४॥

परशुरामभाऊ ख्यात । ज्येष्ठ योद्धा विख्यात ।

सिद्धराजाचा परम भक्त । युद्ध करण्या निघाला ॥२५॥

कवचकुंडलांहूनी विशेष । प्रभू ईश्वराचे आशीश ।

रक्षण युस्शप्रसंगी निःशेष । करितात ॥२६॥

प्रभुदर्शनाची जाणून मात । परशुराम करी प्रणिपात ।

बिडेश प्रार्थी सद्‍भक्त । यश देई ॥२७॥

तो कटीची समशेर गळाळी । गाभारी स्वये पशली ।

आयुष्याची सद्दी सरली । हा अपशकुन ॥२८॥

श्रीरंगपट्ट्णाहूनि आता । जिवे येणार नाही परता ।

नीलकंठ महादेव त्राता । बरे येतो ॥२९॥

ती दुधारी खांडा तलवार । वजन मोठे तालेवार ।

राहिली आत निरंतर । या गाभारी ॥३०॥

घंटांचा कोंदे नाद । ढोल करी महाशब्द ।

कलोळ घालितो साद । भक्तांचा बडिवार ॥३१॥

आरत्या , भूपाळ्या , टाळ्या । भक्तांच्या पाहून मंडळ्या ।

भुताखेतांच्या पळती टोळ्या । दशदिशा ॥३२॥

येथे फुले काढती । नवस नाना भक्त बोलती ।

अनन्यभावे येते प्रचिती । रक्षी सिद्धराज ॥३३॥

नक्षत्र भक्षिता झाली माता । हे कमलेशाची सत्ता ।

अनन्य श्रद्धेची मत्ता । नक्षत्रस्वामी ॥३४॥

नाही अंधश्रद्धेचा भाव । तो दुर्जनांचा स्वभाव ।

हा असीम श्रद्धेचा प्रभाव । पूर्ण जाणा ॥३५॥

श्रद्धा असते केवळ श्रद्धा । अंध -डोळसाची बाधा बद्धा ।

साधकासी तारते श्रद्धा । अटळ ॥३६॥

चला आता पुढे जाऊ । तीर्थाचा गाभारा पाहू ।

शब्दसुमनांच्या माळा वाहू । कमलेशाला ॥३७॥

या गर्भगृही उदंड । रुद्रावर्तने चालती अखंड।

पारायणे , वेदघोष प्रचंड । मंत्रजागर , स्त्रोत्रे ॥३८॥

ब्रम्हवृंदाने येथे बसावे । प्रभुसी वेदोच्चारे आळवावे ।

परांचे भले स्मरावे । देवापाशी ॥३९॥

उत्तर भिंतीत पाषाण थोर । पाषाण सारता दूर ।

भुयाराचे भले प्रवेशद्वार । मार्ग प्रशस्त ॥४०॥

खाली सिद्धसमाधिस्थान । परतत्वाचे करण्या चिंतन ।

तप , समाधिस्थान । करा गुप्त जागा ॥४१॥

याचे वरी देवाचा गाभारा । गाठी पडली हरिहरा ।

कमलकांताच्या घरा । पार्वतिपति ॥४२॥

आता आणि पुढे जाऊ । शाळुंकेवरी माथा ठेऊ ।

श्रीसिद्धराजाला आळवू । अनन्यभावे ॥४३॥

हरिनारायणाची येथे वस्ती । सिद्ध -सुगरणांचे सांगाती ।

भक्तपालना कारणे । कपित्थनगरी ॥४४॥

सोळा सिद्धांचा मेरूमणी । जया वर्णिता शिणे वाणी ।

अनन्यभावे जोडे पाणी । रामानुज ॥४५॥

या गर्भगृहाची शोभा । प्रत्यक्ष चंद्रमौलीची आभा ।

दशदिशा फाकते प्रभा । श्रीमुख झळाळे ॥४६॥

तेवती अखंड नंदादिप ।स्वच्छ जल भरले समीप ।

प्राकारी ओतता अमाप । गाभारी सांचते ॥४७॥

पूर्वाभिमूख देवराणा । सोमसूत्र उत्तरेस जाणा ।

कामार आणि वैकंठराणा । अद्वैते नांदती ॥४८॥

शिवालयी तीर्थ अग्राह्य । परी येथे ते ग्राह्य ।

हरिनारायण झाला साह्य । भक्तसंतोषा ॥४९॥

नित्य संकल्पादि करून । षोडशोपचारे करती पूजन ।

आरत्या मंत्रपुष्पांजली म्हणून ।देवालयी ॥५०॥

पूजा पुजार्याचे काम । त्याने ते करावे निष्काम ।

प्रातः सायं उभा कल्पदूम ।रक्षिल निश्चये ॥५१॥

पंचपंच उषःकाली ।काकड आरत्या चंद्रमौली ।

तपन अप -हानकाली । गुरव करती ॥५२॥

प्रदोष समयी मंदवासरी । मंगलस्नान करी श्रीहरि ।

प्रभावळीसह पूजन करी । कमलेशाचे ॥५३॥

महापूजा आणि एकादष्ण्या । लघुरुद्र , महारुद्र पाहण्या ।

सोमवारी अर्चन करण्या । भक्त येती ॥५४॥

आरत्या मंत्रोच्चाराचा कल्लोळ । ढोल , घंटानादाचा गदारोळ ।

गर्जे सिद्धराज भूपाळ । भुते पळयी ॥५५॥

हा सोळा सिद्धांचा स्ग्रणी । मुनिवराआंचा मेरूमणी ।

व्यासे वर्णिला पुराणी । बिराडसिद्ध ॥५६॥

श्रीनक्षत्रस्वामींचे चरित्र अद्‌भूत । मने सज्जनांची होती शांत ।

भक्त आनंदाने परिसोत । चतुर्थोध्याय हा ॥५७॥

N/A

References : N/A
Last Updated : May 20, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP