नक्षत्रस्वामी - अध्याय तिसरा

श्री नक्षत्रस्वामींचा जन्म हाच मुळी एक चमत्कार , कारण त्यांचा जन्म एका विधवेच्या पोटी आणि तोही नक्षत्रापासून .


आनंदमूर्तिच्या मनिं आंस । व्हावा मायलेकांचा वास ।

ब्रम्हनाळच्या वैभवास । वाढवावे ॥१॥

साधुसत्पुरुषांचा सहवास । भल्या योगियाचा निवास ।

ब्रम्हनाळीं करावा वास । माता आणि पुत्राने ॥२॥

आनंदमूर्तिचा हा भाव ।सत्पुरुषाचा प्रभाव ।

परी माता म्हणे एक ठाव । आमुचा सिद्धराज ॥३॥

आमुचे कुळीचा स्वामी । कैलासराणा शिवचंद्रमोळी ।

कारुण्यसिंधु झळाळी । कवठ्यांत ॥४॥

आमुचा श्रीसोमनाथ । आमुचा मल्लिकार्जुन ख्यात ।

आमुचा श्रीमहांकाल । कळठ्यांत ॥५॥

आमुचा श्रीअमलेश्वर । आमुचा तो वैजनाथ ।

आमुचा देव भीमाशंकर । कवठ्यात ॥६॥

आमुचा सेतुबंध रामेश्वर । आमुचा भगवंत श्रीनागेश ।

आमुचा काशिविश्वनाथ । कवठ्यात ॥७॥

आमुचा दाता त्रिंबकेश्वर । आमुचा श्रीकेदारनाथ ।

आमुचा श्रीघृष्णेश्वर । कवठ्यात राहे ॥८॥

आमुचा स्वामी सिद्धराज । तोच निर्गुण निराकार ।

तोच सगुण सकार । परब्रम्ह निश्चयेसी ॥९॥

सिद्धराज आमची स्तरी । भवार्ण्वासी पार करवी ।

माहेर सुखाचे एरवी । कवठ्यांत ॥१०॥

सिद्धराज आमचे निधान । कर्म , ज्ञानाचे विधान ।

परम मोक्षाचे साधन । प्रभू सिद्धराज ॥११॥

आत्मा , परमात्मा सकळ । माता पिता बंधू प्रबळ ।

सखा सोयरा सर्वकाळ । श्रीसिद्धराज ॥१२॥

त्याची सेवा अंगिकारिली । बुद्धि मनीं स्थिर केली ।

अन्य स्थाने त्यागिली । मुक्ति मिषें ॥१३॥

आनंदमूर्तीची आज्ञा घेतली । पुत्रासवे माता निघाली ।

दुरितांची कटके पळाली । दाही दिशा ॥१४॥

फिरोन आले कवठ्यास । बिराडसिद्धाचे राऊळास ।

सेवा , साधना करण्यास । सावकाश ॥१५॥

सवें आली ती गायवासरू । मुक्तिमार्गाने वाटसरू ।

संजिवन समाधीचे अधिकारू । फळा आले पूर्व संचित ॥१६॥

केले वास्तव्य देवालयी । महाथोर शिवालयी ।

शिवलीलामृताची करवी । पारायणे ॥१७॥

एकादष्णी , लघुरूद्र । महारूद्र , अतिरूद्र ।

तपोनिधि ब्राम्हण भद्र ।आरंभितीं ॥१८॥

कथाकीर्तने , हरिकथा । गायनवादनादि पूर्वप्रथा ।

प्रवचने , नाना मखा । आरंभति ॥१९॥

श्रीसिद्धराजाचे देऊळ । अभेद्य किल्ल्यापरी प्रबळ ।

नक्षत्रसाधनाचे बळ । बांधिले असे ॥२०॥

ग्रामाचे आग्नेय दिशेस । सिद्धमुनीने वास्तव्यास ।

भक्तासवे विजनवास । आंगिकारिला ॥२१॥

सभोवती बंदिस्त कोट । बुरुज ओवर्‍या तटानिकट ।

दिशासाधन सुनिश्चित । केले असे ॥२२॥

पूर्वेस महाद्वार प्रचंड । उत्तरेस राबता अखंड ।

येथिल द्वार बलदंड । द्वारपाल उभे तेथे ॥२३॥

त्यावरी नगारखाना । कर्णे , भेरी वाद्ये नाना ।

झडता करिती सावध जना । देवाकारणे ॥२४॥

द्वारी महामूर झाले पाणी । तुडुंब भरली पुष्करणी ।

स्नानसंध्या पुण्यखाणी । जोडा सावकाश ॥२५॥

या पुष्करणीच्या आंत । उदकीं शिवलिंग निवांत ।

कमलेश वास करी कल्पांत । भक्ताकारणे ॥२६॥

देवालयाचा प्रशस्त प्राकार । विशाल विस्तीर्ण आकार ।

दीपमाळ महाथोर । प्रांगणी असे ॥२७॥

शमीचा वृक्ष पुरातन । न ये त्याच्या वयाचे अनुमान ।

सोळाशे वर्षांचा निदान । सांप्रत असे ॥२८॥

इथे पावन नक्षत्र पडले । विधवेने ते भक्षिले ।

तेणे स्वामी जन्माला आले । माझे कुळगुरू ॥२९॥

प्राकाराचे दक्षिण भागा । होती वस्त्रांतराची जागा ।

भांडार , दुभत्याची जागा । प्रशस्त आणि निर्मळ ॥३०॥

गोशाळा , अश्वशाळा , पाकशाळा । समाराधनेची भोजनशाळा ।

नाना देशीचे भक्त गोळा । होती येथे ॥३१॥

येथे पाण्याची असे बाव । स्नान सोवळे कर्मठासी वाव ।

शिचिश्मंत वर्तावे हा स्वभाव । प्रघात राऊळी ॥३२॥

आता चला उत्तरद्वारी । एका प्रशस्त शिळेवरी ।

उभी चंडी माहेश्वरी । मूळमाया ॥३३॥

वरी अर्धगोलाकार घुमटी । संकटे जरी आली कोटी ।

पळवून लावी ती उलटी । रक्षणकर्ती ॥३४॥

येथे सोमसुत्री प्रदक्षणा । श्रीचंडीचे दर्शन क्षणा क्षणा ।

होईल तुम्हा पुन्हा पुन्हा । प्रदक्षणा घाला ॥३५॥

चंडीसमिप आहे समाधी । नक्षत्रस्वामींचा अपराधी ।

कवठ्याचा पाटील कुबुद्धि । पुढे उद्धारिला ॥३६॥

उत्तरद्वारी प्राकारात । पूर्वाभिमुख बसला कृपावंत ।

प्रसना बिडेश प्रशांत । पुढे नंदि ॥३७॥

बिराडसिद्धाचे हे मूळस्थान । परम भाग्याचे निधान ।

योगिराज सिद्ध महान । निर्विकल्प साधू ॥३८॥

मुख्य देवालये पक्षद्वारी । पांडूरंग सांवळा हरि ।

दोन्ही हात कटेवरी ।ठेवून उभा राहिला ॥३९॥

सवें उभी माता रुक्मीणी । मूळ माया भवानी ।

सांबसदाशिवासाठी चक्रपाणी । उभे ठेले ॥४०॥

आता करू विचार । मुख्य देवालयाचा विस्तार ।

वैभव , स्मृद्धि संपन्नतर । पुर४आतन वास्तू ॥४१॥

देवापुढचा सभामंडप । कुशल शिल्परचनेचा खटाटोप ।

कलाकुसरीचा उत्कट । मांडिला संसार ॥४२॥

लाकडी कलाकुसरीचे खांब । कमानी , कडिपाट रुंद लांब

कलापूर्ण दगडी स्तंभ । तळखडे उभे ॥४३॥

भिंतीवरती अद्‌भूत रंगी । चित्रे चितारली आंगोपांगी ।

रामायण महाभारत बहुरंगी । बहुसाळ होती ॥४४॥

सभामंडपाचे दो मजले । नाना कुसरीने होते सजले ।

मंद प्रकाशाने उजळलेले । शोभिवंत शांत ॥४५॥

कथाकीर्तने आणि पुराणे । प्रवचने , लळिते , गाणे ।

कमलेशाची नामस्मरणे । घडती येथे ॥४६॥

पुराणिकाची वाणी स्पष्ट । शास्त्री विद्याव्यासंगे पुष्ट ।

ह्स्रोत्यांस कळायासाठी कष्ट । घेती बहू ॥४७॥

झांज चिपळ्यांची झिमझिम । तबला मृदुंगांची धिमधिम ।

पखवाजी दंग असती परम । सेवा करती ॥४८॥

परब्रम्हाची ओळखण । सोडा आसक्ति धरा जाण ।

पुढे ठाकिले फक्त मरण । स्मरण असावे ॥४९॥

कथाकीर्तनी ही शिकवण । न्यायनीति सदाचरण ।

भगवंताचे करा स्मरण । ऐसे शिकविती ॥५०॥

लोकां असे बहु प्रीति । सिद्धराजाची कीर्ति गाती ।

नानाप्रकारे करती भक्ति । सकळजन ॥५१॥

क्षणभंगूर जीवन जाणा । संत सत्पुरुषांच्या खुणा ।

तास वाजे झणझणा । देवालयी ॥५२॥

हिलाल दिवट्या मशाली । समया दिवे दाटी झाली ।

हंड्या झुंबरे प्रकाशली । मंडपांत ॥५३॥

छत्रचामरे अबदागिरी । निशाणे मोर्चले बरी ।

रणशिंग भेरी घोष करी । महोत्सवी ॥५४॥

पालखी देवाची सुंदर । सुडौल रम्य नक्षीदार ।

व्याघ्रसिंह मुखवटे थोर । शुद्ध चांदीचे ॥५५॥

राजदंड पुढे धरती । सवें मानकरी चालती ।

भोई पालखी वाहती । भक्तिभावेर ॥५६॥

ऐसे सभामंडपी वैभव । देवदुर्लभ नसे ठाव ।

परम संपन्न शुद्ध भाव । पाहिले मी प्रत्यक्ष ॥५७॥

श्रीनक्षत्रस्वामींचे चरित्र अद्‌भूत । मने सज्जनांची होती शांत ।

भक्त आनंदाने परिसोत । तृतीयोध्याय हा ॥५८॥

N/A

References : N/A
Last Updated : May 20, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP