पांढरे तीळ आंबिहळद बिबे समभाग कढवने नवसागर टाकने वाटून भक्षणे रोज २१ पथ्य जोंधळे याचि भाकर दधि भात अलवणी भक्षणें अवषध सम भाग मात्रा दररोज ३ घेत जाणे ॥
लसून सेर १ मुडदारासिंग । - येकत्र वाटिजे गजकर्ण वर्ण घासिजे वर शाहि लावजे त्यावर थाप दिजे घटिका चार गजकर्ण जाय ॥
सोमल दाहाबिबे आतसेर ऋयिचा चिक तेल येकत्र कवठने उत आलियासि उतरणे अंगास लावणे उष्ण घेने रोज तिन गजकर्ण जाय ॥
इथ निदानं ॥
रात्रौ दग्धभूमी तपननिदिवा जायते सीतलत्वं ॥
कंठे श्र्लेष्मा विसर वदना कुंकुमाकार नेत्रं ॥
जिव्हा कृष्ण स्थल त्वंच सूष्मा च नाडिभद्वैषज्यं स्मरणमरणासम रामेति रामा ॥