माकियाचे मूळ तांबियावर उगाळून डोळा घालिजे चिपडे जाति ॥ सोनवाळिचा रस नेत्रि घालिजे रक्त फाके ॥
जटामांसि निंबाची पाने वाटून रस डोळा घालिजे रक्त फाके ॥
आघाडियाचें मूळ , गाईचें तूप , दहि , याचे पाणि सैंधव , गोरोचन , हे तांबियावर उगाळून नेत्रि घालिजे झडल्यापात ज्याये ॥
तीळ , सतांजन , मदे उगाळून डोळा घालिजे त्रिमिर जाय ॥ तिळाचें फुलें ८० पिंपळिचे तांदूळ ६० एकत्र करून नेत्रि धुईंजे वरि जोपकिजे त्रिमिर जाय ॥
हेंच औषध दहियेचे पाणिये घालिजे रातांध जाय ॥ पाणी ये रक्त फाके कांजिये पडळ जाये ॥
कमल सैंधव रातांजन त्रिफळा वस्त्रागळीत करून नेत्री घालिजे त्रिमिर जाय ॥
बेलाच्या मुळाचा रस , घोडियाचे मुत्र डोळा घालिजे फुल जाय ॥ गुळवेलिच रस सैंधव मर्दून नेत्रि घालिजे झावळ तिमिर जाय ॥
व्याहाड्याचा ब्या ज्येष्ठमद मद मिरे मोरचूद उगाळून नेत्रि घालिजे त्रिमिर जाय ॥
गाढवाचा खुर उगाळून उन करून नस दिजे शिर वेथा जाय ॥
मिरे १ , कुंकू १ तीळ डोईस लाविजे दारणा जाय ॥ महानिंबाच्या निबोळ्या वाटून लेप किजे खवडे जाति ॥
नेत्र उपचार ॥ पांढरे कनेराचा रस डोळा सुजे , पाणियाचे डोळे हालु होती ॥
कासलिचे मूळ जांबूल उदके उगाळून डोळा घालिजे तिडिक रक्त राहे ॥
कारलिचे मूळ , अश्र्वमूत्रे उगाळून डोळा घालिजे पडळ जाय ॥
देवद्वार बोकड मूत्रे उगाळून डोळा घालिजें चिपडीविलास जाय ॥
सिरस सैंधव हिरडा पळसाचा अंतर सालिचा रस राई दहि मेळवून वस्त्रगळीत किजे सुईजे पडळफूल नीळ चिपडी जाति ॥
पांढरी घेटुळीचे मूळ पाणिये उगाळून डोळा घालिजे मूळ जाय ॥
भद्रमुस्ता बोकडमुत्र उगाळून डोळा घालिजे बहुता दिवसाचें फूल जाये ॥
आघाडाखार जाळून मसिकिजे डोळा घालिजे प्रिमिर जाय ॥
सखु वाचा हरीतकी मिरे काष्ट ब्याहाड्याच्या ब्या शेळिचे मूत्र डोळा घालिजे त्रिमिर पडळ फूल जाय ॥१॥
पिंपळी पिंपळामूळ त्रिचक पाडा डआळिंबे याचा रस नेत्रि सुइजे नेत्ररोग जाय ॥
वांझ करुटिचा कंद पाणि उगाळून डोळा घालिजे निद्रा जाय ॥
बेलाचे मूळ मिरे हरणाचे मूत्र डोळा घालिजे त्रिमिर पडळ निलिफूल राती अंध इतुके जाय ॥
हिरडेबीज मिरे चिलष्टि बीज गंगावती बीज समभागे चूर्ण किजे आवळे भवना दिजे ॥
थानिचे दूधें नेत्रीं घालिजे दृष्टि निर्मल होय ॥ निंबाची पाने मिरे ब्याहाडामो समभाग बोकड मुत्रे बाटून वटि किजे थानिचे दुध उगाळून डोळा घालिजे त्रिमिर पडळ चाखनीळी काचनिळी इतके जाती ॥ गोखरू मूळ धोतर्याचे मूळ वाटून नेत्रमधि घालिजे मागुते न येति ॥१॥
पांढरि काव्हा अथवा कारलिमूल अथवा घेटळि मूळ अथवा सावेरि मूळ पानिये उगाळून डोळा घालिजे निके होति ॥
हिरडे सेनांत घालून गुंडून गडद खांदोन पुट दिजे मग बीज काढिजे गाईचे लोनिये मर्दोनि लेइजे निके होति ॥
हळदकुंडगाठे सोला व निंब रिसांत बोकुड मूत्रांत दिन ७ धोतर्याचे पानि बांधोन पुट दिजे निंबरसे वाटुन गोळिया किजे नेत्रि घालिजे निर्मळ होति ॥ सेउगे पानाचा रस मधारि लईजे तिडिक शमे ॥
हिरडेची रक्षार गोमुत्रे लेइजे निके होति ॥ समुद्र फेन पानिये नाटून लेइजे निके होति ॥
हिरडे १२ बीज काहाडिजे पिंपळि व आवाळे रस मर्दिजे सावलीत वाळविजे उगाळून नेत्रि घालिजे दृष्टि निर्मळ होय ॥
सुंठी निंब उदक वाटून डोळा सुइजे त्रिमिर जाय ॥ कडु भापळीचि मसि किजे मदासि नेत्रि लेइजे रातिअंध जाय ॥
बिबे राति कांजिया मध्यें भिजो घालिजे उकद काढिजे गाईचे लोनिया मध्ये तिल दडपून काढिजे टकोन देन मग तेल लोनि तांबियान मर्दिजे ते लोनि उदकामध्ये ठेउन डोळा लेइजे रात्रि समथि उडतियाचे फुल जाय ॥
नागर मोथे वावडिंग टाक १ लवंगा टाक १ मोरचूत २ खापरिया तुरटि ३ येळा १ बोळ ३ येकत्र करून अजा मुत्रे खलून निंब रसे पुटे सात दिजे उतरनी रस पुट ७ दिजे व टिका किजे नेत्रि अंजिजे सर्व नेत्र रोग जाति ॥
पाणि ये त्रिमिर जाये पडळ जाये पुत्रवंतिचानि दुधे मर्दलिया दुष्टि ये ॥
गाईचे लोनिये किडि असे ॥ त्यासी केष निघाति कारलीचे मूळ घोडियाचे मूत्र डोळा घालिजे रातिअंध जाय ॥
कडु तोंडळिचे मुळ पाणिये वाटून डोळा घालिजे रातिअंध जाय ॥
तेल कढले लुगडे रज येकत्र जाळिजे येशेल तेल शेळिचे लेंडिवर घालिजे ते लेंडि जाळिजे बाजि वागांतावर वाळा घालून वाटिजे नेत्रि सुइजे रातिआंध जाय ॥
त्रिफळा गुळ आलेसि सेविजे कवळ जाय ॥ देवदांगरीचे बीज तांदुळ धुवनिसी वाटून नसु दिजे कवळ जाय ॥
येरंड मुळ मदसि दिजे कवळ जाय ॥ पांढरिया घेटळिचे मूळ मदेसि वाटून दिजे कवळ जाय ॥
नुस्ता हिंग डोळा घालिजे कवळ जाय ॥ तिळवनिचा रस तिळेल मर्दून डोळा सुइजे निळी टीक जाय ॥
गेह फुटे लोह गर्जे बाहिर गोरा हाक दे ईश्र्वर सांडे जवि गर फुटे इश्र्वर वाया लेकरासः होति तरि लकुरास तेल वाटीस घालून डोईवरि ठेऊन भरिजे उतरिजे ॥
कवळ जाय ॥ हिंगनाचा डिरिया लाहान वाटिजे मिरे घालून वटिका किजे पोफळ प्रमाण शेविजे कवळ जाय ॥
हिरडा मोठा पाहोन म्हैसी मूत्रामध्ये भिजू घालिजे मग नर मुत्र उगाळून नेत्रि लेइजे नखि वाढली असेल ते तुटे ॥
इति नेत्ररोग प्रकर्ण समाप्तः ॥