रोगोपचार - उर्धपित्त उपचार

भारतीय शास्त्रांमध्ये वैद्यक शास्त्राने फार प्राचीन काळापासून प्रगती केलेली आहे , त्यापैकी चरक आणि सुश्रुत यांनी सर्व जगाला आरोग्यविषयक ज्ञान दिले .


आस्वंद सेंधव चिकणा देवदार राघडा गुळवेलि वटि वमने दिजे ॥

ऊर्ध्वपित्त सिरस हळदी सेंधव तरवंटे बीज तीळ समभाग सिरसे लेप किजे उर्ध्वपित्त वमे ॥

कविठाचा रस कोष्ठ साकर दिजे पित्त शमे ॥ वाळा सांबार साकरेसी दिजे ऊर्ध्व वात शमे ॥

तुप मिरे कोष्ट आंगि लावने वाळा कढउन आंगावरि घेने आम्लपित्त शमे ॥

पटोळि निंब त्रिफळा काढा मदेसी दिजे आम्ल पित्त शमे ॥

खार पडोळि निंबपत्रि फलासा गुळवेलि काढा मदेसि दिजे आम्ल पित्त शमे ॥

खिरुस गाइच्या तुपात तळुन भक्षिजे रक्त पित्त शमे ॥ ॥ अथ शैत्य उपचार ॥

भारंगी पिंपळी काकडसिंगी कोष्ट समभाग चूर्ण मदासि दिजे शैत्य जाये ॥

शैत्य घाम तुटे ॥ मिसे सुंठि लसन गंधक येकत्र करूण उष्ण उदकि दिजे शैत्य तुटे ॥

अलिरस तुपासि दिजे माके रस तुपासी दिजे शैत्य तुटे ॥ हिव तुटे ॥

आवळी भाग २ धोतर फूल रस भाग २ तिळेल भाग ४ घालोन कढविजे घटि येक अंगि लाविजे भक्षिजे शिन तुटे शैत्य तुटे ॥

घाम तुटे हिव जाये ॥ आलेरस कचरस चोगुण तिळेल घालून कढविजे घड्या दोन लाविजे भक्षिजे ॥

पित्त उपचार सुंठ गुळ तूप मद येकत्र करूण लिदिमध्यें पुरिजे दिवस २१ मग काढिजे टाक तिल ३ सेविजे शैत्य तुटे घाम तुटे आखंड श्र्लेष्मा तुटे ॥

अथ पित्त उपचार ॥ निंब पंचांग भाग २ देवदार २ सर्वा सम साकर घालिजे टाक ४ आम्लपित्त दारुण जाये ॥ पित्त सूळ जाये ॥ आघाड्या .

N/A

References : N/A
Last Updated : June 23, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP