रोगोपचार - उदरवेथा प्रकरण

भारतीय शास्त्रांमध्ये वैद्यक शास्त्राने फार प्राचीन काळापासून प्रगती केलेली आहे , त्यापैकी चरक आणि सुश्रुत यांनी सर्व जगाला आरोग्यविषयक ज्ञान दिले .


गाईचे दूध येरंडाचं मूळ समभागे लसूण वाटुन दिजे शूळ शमे ॥

कमल फल तांदुळाचे धुवनिये वाटुन दिजे पाठशूळ शमे ॥

बाहळ्याचा लाकुडाची सालि पांजर्‍याचा रस दिजे पोटशूळ शमे ॥

उनळीमूळ कांजिये वाटुन दिजे पोट शूळ जाय ॥१॥

हिंग वेखंड सविचळ इंद्रजव येरंड अतिविख हिरडे दिजे परम शूळ शमे ॥१॥

सागरगोट्या लसन हिंग सैधव एकत्र करूण दिजे पोट शूळ शमे ॥१॥

अस्वंदमूळसालि रुइमूळसालि एकत्र कांजिये वाटुन दिजे शूळ शमे ॥१॥

जोंधळ्याचा खार चुना सेर कुंडखारु सेर हे अवघे एकत्र काळऊन रोटि किजे गजपुठे दिजे निवालया काढिजे वस्त्रगाळीत कीजे ताकासि घेईजे वातशूळ वातगुत्म अजीर्ण नासे साहादेवीचे मूळ कांजिये वाटुन नस दिजे वातशूळ नासे ॥

मांदाराचे मूळ चूर्ण करूण मधसि दिजे वातशूळ नासे ॥

महालिंगाचा रस सैधव प्रतिपाके दिजे शूळ सर्व नासे । चिचेचे टोकराचा खारू किजे उष्णोदके दिजे परनाम सूळ शमे ॥

तांबोळवटिचे मूळ वाटुन दिजे शूळ शमे ॥ शंखचूर्ण करूण वैरागडे हिंग सुंठि मिरे पिंपळीचूर्ण उष्णोदके दिजे शूळ नासे ॥

जवखार कवडेविख सैधव सुंठि मिरे पिपळिपारा गंधक घ्रावळी कमळाची कंद हेमबीज कोष्ट समभाग चूर्ण किजे नागवेलिरस भावना ७ दिजे मच्छ पित्ते भावना दिजे मात्रा गुज दिजे शूळ नासे ॥ विष भाग २ पारा भाग ८ मधक भाग ८ चिंचा खारु भाग १२ पाचहि लोन भाग ते शंख भस्म भाग १२ एक निंब रसे मर्दिजे त्रीकूट भाग १८ हिंगभाग ४ ऐसे एकत्र करूण मर्दिजे सेविजे मात्रा टाक १ दिजे सुळ गुल्म अशी माधे फिटे । इति शंख वटिका ॥

गंध भाग १ ताम्रभस्म भाग हिंग सुंठ मिरे वेखंड आहाळी व पिंपळमूळ हिरडे जिरे २ शेउगे मूळ आम्लवेतस लसन टाकनखार लोनखार जवखार तिटुंबि लवंगा चित्रक सुरन हस्तकंद कांडवेलि कंडमोडि पाचाहि लवण येकत्र करून भावना देन लिंबरसे माकेरसे ७ नारागिरसे ७ माहोलिंगी रसे भावन दिजे वडि ब्याहाडा प्रमाण वटिका किजे प्रातःकाळी सेविजे दारून शूळ कर्मज शूळ वात शूळ खोकला इतकि शमे ॥ इति नागार्जुन रस समाप्तः ॥

येरंडेल हिंग कुडि पाहून देने त्रिदोषशूळ नाशे ॥१॥

गुळवेली रस मिरोसि दिजे शूळ शमे ॥ विडियाचे पान कुंकु येकत्र करून देने सूळ नासे ॥

हिंग सैंधव वोवियाचा खार येकत्र करून घेइजे येरंडेल तेलासि सूळ नासे ॥

हिंग सविचळ सुंठि चूर्ण करुण उष्णोदके घेइजे सिघ्न शूळ भमे ॥

येरडमूळ चित्रकमुळिचि त्वचा घेटुळि कुंडखार हिंग उष्णोदके घेइजे परंनाम शूळ सर्वशूळ शमे ॥

लोहकीट सेर १ काळाबोळ सेर १ सागि सेर १ येकत्र करूण अजामुत्र भावना ३ निंबुरस भावना ३ बोर प्रमाण वटिका किजे सेविजे पेहा गुल्म शूळ नासे १ त्रिकुट भाग ३ हिंग भाग १ सुरण भाग १ विषभाग १ निवडिंग चित्रक भावना देऊन रुचिक भावना देऊन वाळविजे मग भाग १६ कोरून त्यातु भरिजे मोहर करुण मातिकापड दिजे जगरा रांधिजे मग माति फेडुन सुरनासहित वाटिजे बोर प्रमाण वटिका किजे तुपासि दिजे सर्व गुल्म सर्व प्याहा सर्व उदर शूळ जाये १ गोमुत्र ५ निवडिंग चिक सेर ५ तेल २॥ येकत्र किजे गुल्मोदरि पाटबरि उडदाचे पीठाचि पाळि किजे तेल तेथें घालिजे लोखंड ताउन तेथ विझविजे सेकलागे तव किजे मग बुधिच उतरिजे तेल काहडिजे ऐसे मास १ किजे प्याहा गुलम उदर दोष फिटति ॥ कणिक १ वैरागडेमीठ विखटे भुरनीचे बीज येकत्र करूण निवडिंग चिक भिजविजे जाळून खारू किजे तो खार टाक २ कांजियेसि दिजे पथ्य तांदुळाचे अलवणी दिजे आंबट वर्जिजे प्याहा नाशे ॥ रुईचे पान वैरागडे मीठ थरोबदि मडक घालिजे तोंडि मोहर करूण चुलीवरि ठेऊन जाळुन खारू किज तो खारू दहियाचा पाणिसि दिजे पथ्य तांदूळाच अलवणि प्याहा नासे ॥ सेउग्याचा काढा पिंपळी मिरे सैंधव आल्मवेतस इतके घालून दिजे प्याहा नासे ॥ पिंपळिचूर्ण दुधासि दिजे प्याहा नासे ॥

चित्रकसालि सैंधव चूर्ण करूण ताकासि दिजे वातोदर नासे ॥

गोमुत्र मद हिरडा ब्याहाडा येकत्र करूण दिजे जलोदर नासे १ कटकी रोहिनी मूळ सैंधव येरंड तेल पिंपळी गोमुत्र येकत्र करूण दिजे जलोदर नासे ॥

त्रिकुटा टाक १ हिंग ३ पाचही लवण ७ चित्रकसालि ३ निवडिंग चिके भिजविजे सुरन कोरून आत घालिजे पुट दिजे काहडिजे येक ६ खाइजे घामुल सडासेल उसवण वग कछा जाये ॥१॥

हिरडा पुनर्नवा देवदार गुळवेली गुगुळ येकत्र करूण गोमुत्रासि दिजे पंडुरोग जलोदर नासे ॥

निळसवी चव चित्रक सैधव वैरागडे जवखार कटु त्रय येकत्र चूर्ण करूण गाईचा तुपासि भक्षिजे सर्पोदर गुलम इतकि नासे ॥

पिंपळीस निवडिंगाचि काचा भावना दिजे २१ वाळविजे चूर्ण साकरेसी दिजे सर्व गुलाम जाये ॥

चित्रक मूळ सालिचा पळे १०० हिरडे चूर्ण पळे ६९ गुळ वेली पळे येकत्र कढविजे सेउपात तज पत्र वेळा जवखार सर्व पळ १२ चूर्ण घालुनि मद पाक पाके पचीजे गोळि ब्याहाडे प्रमाण अथवा कळक टाक ३ शेविजे पाणि लागल असल असेल पाट जळ जळे करीत असे ते जाय ॥

मंदाग्नि पांडु फिटे ॥

अर्कक्षार चिंचक्षार हाळदी ब्रह्मदोडिचूर्ण करूण सेविजे सेळिचे मूत्रासि प्याहा गुल्म नासे ॥

रुईची सालिसे ३ गेसाली धोरतसाली पिपळाचि सालि सेपा हळदि तिखाडि पाट गेरू वेखंड कोष्ट राहू आहाळीव विहसा काळा बोळ बांगरखार लसन कारिची पान बिबवे देवदार येकत्र कांजिये वाटून लेप किजे घड फुटे नळ वितळति ॥१॥

कोहळ्याचा रस मुळ्याचा रस सेउगे रस हिंगण सालिरस आलेरस निंबरस येकत्र करून पोटात दिजे घडनळ वितळति ॥

पिंपळ्याचा डिरिया बोळ सागरगोटीयाचा डिरिया येकत्र करूण दिजे नळ वितळति गाठिहि बैसे ॥

कुमारि हस्तकंदु कोहळीवेल कळलावि कंदु हिंगणसालि चित्रक देवडांगरि इंद्रावनिसमुळी सुरन अर्कपत्र पिकलि निवडिंग उतरनि तिळवनी आघाडा टाकाळि गांधवी वेखंड हिरडे कळिचि सोपे पळस पापडा रतरोहिडा सेउगीसालि ब्रह्मराक्षस चाकवता चाडिरिया विष दोडि मुहु व्याकरमोडि लसन कोंडवेलि हौसवेल आहाळीव विखटे भुरनीच्या ब्या इतुकीसमुळी सपत्री मडका घालिजे तोडि मोहर करुण खारू बरवा किजे वस्त्रगाळीत किजे त्यातु वोखद घालिजे त्रिकुट पाच लवण जवखार साजीखार कुंडखार इतुके चतुथांश मेळउन येकत्र कीजे ताकेसि अथवा निरंसेसि घेइजे शुळवात शूळगुल्म प्याहा मंदाग्नी इतुके जाये ॥

इति चतुर्मुखखार उदर वेथा प्रकर्ण समाप्तः ॥

N/A

References : N/A
Last Updated : June 23, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP