रोगोपचार - बाळाची चिकित्सा

भारतीय शास्त्रांमध्ये वैद्यक शास्त्राने फार प्राचीन काळापासून प्रगती केलेली आहे , त्यापैकी चरक आणि सुश्रुत यांनी सर्व जगाला आरोग्यविषयक ज्ञान दिले .


वातरोग स्त्रियेसी उपजे तिचे दुध बाळ पीत बाळास रोग उपजे स्तर नासे भुकेल अस होय ॥

थोड थोड मुत्र पडे पोट फुगे मळ भिन्न पडे तिन्हि थन तलें उपडे ॥

पीतरोग स्त्रीस बाधा असे तिचे थान लेकरू पी तरी त्यास दोही तृषा उपजे ॥

स्त्रियेसि श्लेष्मा होय तिचे यान लेकरू पि तरी त्यास जांभळ्या ये आंग मोडे दे घायफूल समभाग काढा किजे अटांश दिजे दिवस तिन सावद होय स्त्रियेसि असमाधान असे थानि दुध नासे अथवा थान गुंतल असे याचा रोग बाळास होय तर ॥ इंद्रावनी च मूळ नासु दिने वे वहिरे ॥

आतां ग्रहाचा बाधा सांगेन ॥ बाळ उडे दचके नख दांत वरी भोये उंचटि आपण आपणास वर्पि वर्ते पाहे दांत खाय ॥

जांभळ्या दे आसोडा दे भवया गाठी पाटि दाता अबाट खाय केसा सारिखा हागे राति निद्रा नये ॥

श्रर कर्ष होय ॥ मास या सारखि सड घान उपजे कारक्ता असी घान उपजे हे बाळक ग्रह वेष्टित जाणाव ॥

आतां गृहाचा बाधा सांगेन ॥ ऐक डोळा येक दात येक पाय कापे आंग फूगे घाम जे वरते वास पाहे ताम्र डोळे तोंड तांबड होय रक्ताचि गंधि आंगि उपजे दात खाय विकळ जाय कीर किर रडे पाखराची गंधी उपजे दात खाय फोड उपजेत तो रक्त गृह जाणावा ॥

अतीसार ज्वर तृषा वाकडिया दृष्टि पाहे रडे निद्रा न करि थान न घे सरदि कास असे त्यास भुतनेचि बाधा जाणावि ॥

आंगिचा वर्त अंत्रा सारिखा होय तोंड कोमाईजे आंग पाणये दंत खाय तरि मुख मडकेचि बाधा जाणावि ॥१॥

याचि परि उन्माद गृह सांगितले त्याची चिन्हे जाणावि अनि औषध योजावे । कोष्ट हरीतकी येखंड ब्रह्ममेहंकि असि भाग चूर्ण किजे तुप अवलीह किजे दिवस तीन उठणे बाळास किजे नीट होय ॥

सेळिचे दुध आनुन भात काळे मातीचा गोळा ताउन त्यात विझविजे मग लेकरास नाभिलेप किजे शेकिजे शोक शने ॥

लेकराचा नाभि पाक होय तरी दोन्ही हळदि लोध त्रियंगु जेष्टमद असि तेलात समभाग पचविजे ते तेल गालुन घेइजे मग लेकराचे आंगास आता पायाचा संधि रगडिजे नाभिपात आवचुनि त्रिदोष फिटे ॥१॥

आडोळसा इंद्रजब समभाग कढिजे आष्टो लेकरास दिजे ॥ अतिसार शमे ॥१॥

थानिचे दुधास्तव जे रोग उपजति समति अतिसार ज्वर नासे मदपिंपळि काकडसिंगीं वरुणा याचे समभागे चूर्ण किजे मदेसि दिजे तरी अतिसार शमे ॥

कासश्वास सरदि नासे ॥ घायफूल बेल कोथंबीर लोद इंद्रजव दोन्हि बाळे समभागे चूर्ण किजे मदेसि अवलेह किजे ज्वर अतिसार अंतर दोष नासति ॥

मंजिमंजिष्ट घायफूल लोदकावळिचा मुळ्याचा समभाग अष्टौष काढा किजे मदेसि दिजे बाळकाचा ज्वर अतिसार शमे ॥१॥

दुर्लभा गुळवेल समभागे अष्टौषध काढा किजे वातज्वर नासि ॥

द्राक्षालोद समभागे चूर्ण किजे आडोळसाचा रस वो मधु साकरेसि दिजे तरि नाकि मुकि रक्त वाहे ते समे ॥

शतावरि गुळवेलिचा रसा मध्ये दिजे वातज्वर नासि ॥

कंकोळ डोलारिमुस्ता कोष्ट देवदार काकडसिंगि गुळवेल सुंठि समभ्ज्ञाग काढा किजे वातज्वर नासि ॥ बाळक परिक्षा समाप्तः ॥

गत नाना उद्भव शरीरी उपजलिया नानाशास्त्र पाहोन उपचार सांगेन ॥

अथ सीर वेथा ॥ कपाळि दूधाचि तुसनि माखिजे वरि काष्ट भुरका घालुन वरि पिंपळिची पान बांधिजे कपाळ राहे ॥१॥

देवदार १ कोष्ट १ हिंग १ वेखंड १४ रुचीक उगाळून खल्प तेल घालून तिळेल उन करोण माथा कपाळीं लेप किजे वरि पिंपळिचि पान घालून समान शेक किजे शिर वेथा दूर होय ॥

नायसमूळि आनून उन करणे कपाळ तुपें चोपडून वरि नाये डोइ कपालावरि बांधिजे सेक किजे वेथा राहे ॥

निर्गुंडि रसे मिरे उगाळून नस दिजे अर्ध सिसि जाय ॥ जासवंद पाला वाटून कपाळी डोई वरि बांधिजे शिर वेथा शमे ॥

कोष्ट मिरे येरंड मूळ तांदूळ वाटून लेप किजे गुगुळ तुप शेविजे वेथा जाये ॥ स्वेत सुंपलिमुळि उगाळून नस दिजे वेथा शमे ॥

तगरू रिंगणी शेउपा येरंडमूळ राष्णा सुंठि हरणवेल काष्टमद वावडिंग सेंधव याचे चौगुणा चणियाचे तेल तींतका माकीथाचा रस तीतके अजाक्षीर येकत्र कठबिजे नाकीनस दिजे ब्रह्मांडीचे सर्व रोग जाति ॥ वेथा राहे ॥ सुंठ निर्गुड वेखंड पिंपळ्या येकत्र उगालुन कपाळी लेप किजे वेथा राहे ॥

रिंगणीरस तेल कढवून कपाळि लाविजे वेथा शमे ॥ सावरीचा रस दिजे भवंडि बेथा शमें ॥

गोडिया निंबाचा निंबोळ्या कांजिये वाटून कपाळि लेप किजे अर्धांसिसि जाय ॥

येरंडमूळ कांजिये वाटून लेप किजे वेथा शमे ॥ जष्ट मद तुपेसि नसदिजे वेथा शमे ॥

N/A

References : N/A
Last Updated : June 23, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP