निर्गुंडीचा रस पानि न घालितां कडविजे आत पिंपळीचा भुरका घालून दिजे सवेच पथ्य दिजे वात जाये ॥
वांझविचा काढा पिंपळिच्या अनुपानासी दिजे वात जाय ॥ वोल्या मेंडसिंगीचा काढा दिजे वात जाये ॥
वेळातरमुळाचा पालाचा काढा दिजे वात जाये ॥
गुंजेचा पाला विख दोडिमुखसालि भुरका करूण फकि कीजे घेइजे वात जाये ॥
कुमारी पानाचा रस सेर ५ गाघृत शेर १ सहद सेर १ त्रिकुट ॥ - वैरागडे सेर १ येकत्र कढविजे वटिका टाक ३ प्रमाण दिजे सर्व वात कटिवात जाये ॥
उदरवात जाये पुष्टि होये अग्नि मांद्य फिटे ॥ कनक बीज गंधक येकत्र करूण दिजे उध्यट वायो नासि ॥
हिंग कोष्ट देवदार रानटाकळी मुळी चिके उगाळून आंगि लेप दिजे वायो मुंगि बहिरा वले जाये ॥
आहाळीव तिवडिबि येकत्र करूण उष्णोदके प्रातःकाळीं फकि घेत जाइजे वात जाये ॥