देवदार हिंगसिर अकोष्ट सैधव सेवगे रस येकत्र करूण ते आत कढविजे कानि घालिजे कर्णमूळ जाय ॥
सैंधव मेंढिचे दुध कानि घालने कर्णमूल जाय ॥ नागरिचा पाला लाहछरी वाटून तेल घालुन कानि घालिजे बहिरत्व जाय ॥१॥
सैंधव हिंग सेपा वेखंड कोष्ट बोकड मुत्र कानि घालिजे तिडिक शमे ॥१॥
रुई वाळ्याचा रस कापुराचि पुटळी करून कानि घालिजे तिडिक शमे ॥१॥
गायिचे तूपय साकर उन करूण कानि घालिजे तिडिक शमे ॥१॥ तिळघनिचा रस कानि घालने तिडिक शमे ॥१॥
समुद्र फळ कूट करून कानि घालिजे रंद राहे ॥१॥
सुंठ सैंधव भद्रमुस्ता पिंपळी लसन कोष्ट विळसा येकत्र उगाळून रुइचा पिकल्या पानाचा रस घालून नविक तिळेल घालून उन करून कानी घालिजे तिडिक शमे हरे ॥
अळिता निंबरस कालउन कानि घालिजे वेथा राहे ॥ इति कर्णरोग उपचार समाप्तः ॥