अध्यात्मपर पदे - भाग १
श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा आणि भारुडे रचून इतिहास घडविला आहे
१५४६
( राग-असावरी; ताल-तेवरा; चाल-प्रगट निरंजन० )
तगत नाहीं तगत नाहीं तगत नाहीं कांहीं । तगणार एक देव निरंजन तेथें चि अनन्य रांहीं ॥ध्रु०॥
नाना राजे भाग्यें विराजे वैमव साजे मोठें । संपत्ति विपत्ति दों दिवसांची सकळहि माइक खोटें ॥१॥
तारुण्य़ लावाण्य रूप मनोहर सुंदर सुखकरिता हे । शेवट नासे वाईट दिसे अंतीं सकळ राहे ॥२॥
माइक माया सांडुनि थाया सद्दढ धरिं रघुराया । दास म्हणे सुख सकळ पावसी साधन थोर उपाया ॥३॥
१५४७
( राग-कल्याण; ताल-दीपचंदी ; चाल-अरे नर० )
अरे कर सारविचार कसा ॥ध्रु०॥
क्षीर नीर एक हंस निवडिती । काय कळे वायसां ॥१॥
माया ब्रह्म एक संता जाणती । सारांश घेती तसा ॥२॥
दास म्हणे वंद्य वेगळें । कर्मानुसार ठसा ॥३॥
१५४८
( राग-छायालगत्वखमाज; ताल-धुमाळी )
गुणकाया रे मूळमाया रे । सकळ जनांसि भजाया रे ॥ध्रु०॥
जीवेंभावें रे बहु नांवें रे । परि आणिक नाहीं परावें रे ॥१॥
जीवतंतु रे मूळतंतू रे । त्याहूनि भिन्न अनंतु रे ॥२॥
धन्य धन्यु रे अन्ये अन्यु रे । दास म्हणे मुनिमान्यू रे ॥३॥
१५४९
( रागा-काफी; ताल-दीपचंदी; चाल-राजी राखो० )
सकळ पद मायिक आहे । एक निरंजन पाहे ॥धु०॥
चंचळ ते चळ जातें पळपळ । जाइल सर्व न राहे ॥१॥
इंद्रपदादिक राज्यपदेंहि । निर्गुण संग न साहे ॥२॥
दास म्हणे रचत खचताहे । पुसत जा सज्जना रे ॥३॥
१५५०
( रग-केदार; ताल-त्निताल. )
द्दढ धरिलासी विश्वासें । आतां करिसी कैसें ॥ध्रु०॥
मिथ्या माईक जीवित । कळलें तुझें मत ॥१॥
द्दश्य विपरीत भावना । मी कां आणीन मना ॥२॥
माया लाविली माईक । ठकिले बहुत लोक ॥३॥
माझी माया त्वां मारिली । जीवा हाणी केली ॥४॥
करीन देवपणाचा नास । तरीच रामदास ॥५॥
१५५१
( राग-कल्याण; ताल-दीपचंदी; चाल-अरे नर सार० )
सकळ भय लागलें चंचळीं ॥ध्रु०॥
उत्पत्ति स्थिति संहारत आहे । वैलोक्य तेंहि न राहे ॥१॥
जें जें उमारेल तें तें संहारेल । होईल जाईल रे ॥२॥
दास म्हणे जनीं आत्मनिवेदनीं । अनन्य हो निश्चळीं ॥३॥
१५५२
( चाल-धर्म जागो० )
सा तें काय बापा । व्यर्थ कापिसी लाफा ॥ प्रचित पुसो जातां । कां रे देतोसी धापा ॥ध्रु०॥
संसारा सार नाहीं । देह असार पाहीं ॥ वैमव स्थिर नाहीं ॥ कोणी सवें येत नाहीं ॥१॥
पृथ्वी जाते आप जातें । तेज जातें वारें जातें ॥ अंतरात्मा तेंही जातें । द्दश्य द्दश्यातें खातें ॥२॥
चंचळ तें चळत आहे । निश्चळ तें स्थिर राहे ॥ दास म्हणें बरें पाहें । संग निःसंगा न साहे ॥३॥
१५५३
( राग-असावरी; ताल-तेवरा; चाल-धन्य हरी जन० )
सुटत नाहीं सुटत नाहीं सुटत नाहीं माया ॥धु०॥
पाहों जातां सत्य असेना मानस घेतें थाया । दिसतसे परी सत्य न राहे पंचभूतिक काय ॥१॥
होइल तें मग जाइला शेवट खटपट व्यर्थचि वायां । रामदास म्हणे सत्य निरंजन विरहित मायिक माया ॥२॥
१५५४
( रागा-श्रीराग; ताल-दादरा; चाल-हर हर० )
चंचळ दामिनी । रम्य आठवे मनीं । झक पडे नयनीं । जाय निघोनी ॥१॥
तरंग निवळ । करी नळ नळ । रूप पाहतां कोमळ । फुटे तत्काळ ॥२॥
दास म्हणे स्वप्र । तेथें रिझें मन । तुटे समाधान । होतां पूर्ण ॥३॥
१५५५
( चाल-श्रीराग; ताल-दादरा; चाल-हर हर० )
गडे हो सर्व संग दुरि तुम्ही करा । माझी संगति द्दढ घरा । येथा तडवेल तोचि खरा । येरां पडेल लोम घसरा ॥ध्रु०॥
तुम्हीं जितेंचि मरोनि पहा । मग अमर होउनि रहा । याहि वेगळें नसोनि आहां । मग हाहि बोल न साहा रे ॥१॥
मी बोलतों कोण्या भावें । येथें मन बहु घालावें । आजि पाहिल्या ठाया जावें । अन्न देहबुद्धि चट खावें ॥२॥
माया यमुनेचा पैलपार । तेथे स्थळ सुरवाडिक फार । जरि मघेंचि डगमगाल । तरी हे भ्रमपुरीं वाहवाल ॥३॥
पोहों जाणेल तों बुडी मारा । परी मुख्य तोंड गच्च घरा। वाढवेळ घरिताम थारा । तुम्ही अंतराल निज घरा ॥४॥
रामदासाचा निज गडी । तो पात्नवितो पैलथडी । तो देतो विवेक सांगडी । तो मारूं देत नाहीं बुडी ॥५॥
१५५६
( राग-कानडा; ताल-दीपचंदी )
समज दे देवदेवा । करिन मी सर्व सेवा ॥ध्रु०॥
बहुरूपीं मन तल्लिन जालें । अंतर तें चुकलें ॥१॥
अंतररूपीं अनंत लीळा । नेणें विघी कमळा ॥२॥
समजल्यावरि भक्त चि होणें । उत्तम तें लक्षणें ॥३॥
१५५७
( रग-असावरी; ताल-तेवरा; चाल-धन्य-धन्य हरीजन० )
कळत नाहीं कळत नाहीं कळत नाहीं लीळा || येणें सायासें हें अनयासें होतें जातें अवलीळा ॥ध्रु०॥
भूगोळ केला गुप्तचि जाला पाहतां दीसत नाहीं । जेणॆं केलें ते दीसत जातें त्यास विवंचून पाहीं ॥१॥
ढोवळा ज्ञाने ढोवळ ज्ञानें देव केंवी दिसताहे । सूक्ष्म द्दष्टी करून पाहे तरी कांहीं एक लाहे ॥२॥
दास म्हणे रे झाड ढोवळें बीज तें मूक्ष्मरूपी । तैसाचि कर्ता सूक्ष्म आहे कांहीं एक सत्यस्वरूपी ॥३॥
१५५८
( चाल=धर्म जागो० )
सारासार विचारावें । काय असार त्यागावें । सार तें काय घ्यावें । खरें करून द्यावें ॥ध्रु०॥
पिंडींचे देह चारी । ब्रह्मांडींचे देह चारी । अष्ट देह निरसितां । अवघी होते बोहरी ॥१॥
दिसतें तें नासतें । सद्य प्रचिती येते । उपजतें तें मरतें । सर्व होतें आणि जातें ॥२॥
दास म्हणे अचळ । तेथें नाहीं चंचळ । परब्रह्म तें निश्चळ । सार तेंचि केवळ ॥३॥
१५५९
( राग-सिंधाकाफी; ताल=धुमाळी; चाल-अलभ्याचा हा लाम० )
वेघु मज लागलासे मनीं । निरुपणीं श्रवणमननीं । अखंडित हेत जनीं वनीं । जनवन नाढळे विजनीं ॥ध्रु०॥
सारासार विचार पाहणें । सार तेंचि वळखोनि राहणें । दुरीपरी ते जवळीं च लाहणें । सुखदु:खें विवेकें साहणें ॥१॥
एकलाचि सर्व करीतसे । दुजा येथें पाहतां न दिसे । पुरावीण पुरुष तें कैसें । आम्ही कोण पहाना आमासें ॥२॥
दास म्हणे ओळखितां बरें । यथातथ्य सांगतों मी खरें । हरीविण कोण रे दुसरें । निवेदनीं निर्गुणीं वास रे ॥३॥
१५६०
( राग-कल्याण ; ताल-दीपचंदी; चाल-अरे नर० )
बहु जन स्वप्रमरें भरलें । कैसेंनि उद्धरलें ॥ध्रु०॥
जागेपणाहुनि दुल्लभ जालें । नेणों कांहीं लाधलें ॥१॥
जागें होतां व्यार्थचि गेलें प्राणी ह्ळु पडिलें ॥२॥
दास म्हणे तैसें सकळ कांहीं । जाणतिय हरिलें ॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : May 20, 2011
TOP