अध्यात्मपर पदे - भाग ५
श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा आणि भारुडे रचून इतिहास घडविला आहे
१५९१
( राग-काफी; ताल-दीपचंदी. )
फलकट मानवी मन हें । होइल जाइल तें ॥ध्रु०॥
असारा त्युजुनी सार विचारीं । काय बराडीसें ॥१॥
सत्य कल्पना भासत नाना । होय तनाना जी ॥२॥
दासा म्हणे मज भासत आहे । नासत जाय कसें ॥३॥
१५९२
( चाल-रामीं रंगलें मन० )
निश्चळीं चंचळ निश्चळेना रे । चंचळीं निश्चळ तें चळेना रे ॥ध्रु०॥
चंचळीं निश्चळ निवडावें रे । निश्चळासीं विवेकें जडावें रे ॥१॥
आमाळ अंत्राळ एक जालें रे । निश्चळीं तें चंचळ उडालें रे ॥२॥
दास म्हणे होइल जाईल रे । पंचमूतें काळ खाईल रे ॥३॥
१५९३
( राग-सिंधकाफी; ताल-दादरा; चाल-विषयीं विरक्तपण० )
रामरूपीं हिंडतोसी तें तरी तुजपासी । तया कासयासी चुकलासी ॥ध्रु०॥
जवळी चुकलें धन असोनि कांचन । व्यर्थ चि सीण वांयावीण रे ॥१॥
अत्यंत निकट परि जाहलें दुरिच्या दुरी । आतां तरी सोय घरीं रे ॥२॥
रामदास सांगतसे तुज चि जवळी असे । तुजला न दिसे काय करूं रे ॥३॥
१५९४
( राग-मालकंस; ताल-त्निताल. )
त्या देवाचें दर्शन घे घे ॥ध्रु०॥
सकळहि द्दश्य टाकुनि पाहतां निरलंबिं राह्तां । प्राणापान ऊर्ध्वचि पाहतां आनंदभुवनिं मन रिघे ॥१॥
आदि अंत ना मध्य जयाला ज्यापासुनि ओंकार निघाला । नेति म्हणे वेद जयाला ब्रह्मा विष्णु रुद्र तिघे ॥२॥
निगमागोचर सत्ता ज्याची सहज लीला तयाची । अंडज जारज स्वेदज उद्भिज ज्या प्रमुपासुनि निघे ॥३॥
रमदास म्हणे शुन्याकार रूप नाहीं त्यासि आकार । परब्रह्म तें निर्विकार अंतरबाह्य अवघें ॥४॥
१४९५
( राग-सोहनी; ताल-धुमाळी. ) काय जालें रे कोठें गेलें रे । जीव उतावेळ भेटावयास रे ॥ध्रु०॥
केलें तें दिसतें सर्व ही रे । कर्ता पाहतां कोठें नाहीं रे ॥१॥
कुशळ चपळ सर्व जाणे रे । करणी देखतां सुख बाणे रे ॥२॥
प्रगट शरिरें चालवितां आहे रे । दास म्हणे विवंचून पाहे रे ॥३॥
१५९६
( राग-असावरी; ताल-धुमाळी. )
गगनीं भरल मानसा । जालें उदास । पाहावया मुख्य तो ईश । ईश जगदीश ॥१॥
विधिगोळ निर्माण केला । कोठें रे गेला । न दिसे पाहतां एकला । सर्व पुरला ॥२॥
बहु रंग बहुत रूप । रूप अरूप । बहुत गुणांचे साक्षेप । नाहीं विक्षेप ॥३॥
धुंडितां धुंडितां शिणलों । विस्मित जालों । जवळी देवासि चुकलों । निभ्रांत जालों ॥४॥
सकळ करी तो अंतरीं । जगदांतरीं । दास म्हणे बरें विवरीं । सद्दढ घरीं ॥५॥
१५९७
( राग-सारंग; ताल-धुमाली. )
एक देव तो अनंत रूपी । तेणें गुणें बहु दे प्रतापी ॥ध्रु०॥
देवदेवता अंतर्यामीं । एक देव नाना गुणघामीं ॥१॥
नाना भजनपूजन घेताहे । जाणीवरूप विचारून पाहे ॥२॥
एक वात हा चंचळरूपें । चालवितो बहुवीध स्वरूपें ॥३॥
एक तेज सकळां घटिं आहे । स्थावर जंगम शोधुनि पाहें ॥४॥
एक तोय बहु वृक्ष जीववी । मुळागें सकळांसि पाववी ॥५॥
लक्ष चौर्यांशी मेदप्राणी । त्या सकळां जीववितें पाणी ॥६॥
एक महीवरी सकळ होतें । दास म्हणे हें सेवट जातें ॥७॥
१५९८
भोग भोगितों जगदांतरें । तिहीं लोकींची शरीरें । देव देवता लहान थोर रे रे० । एक भोगितो सकळांतरें ॥ध्रु०॥
गणपति पाहूणे आले । सिद्धलाडूसी मोद्क केले । तूपासाखरेनें घोळले रे रे० । भक्त जेवितां धाले रे ॥१॥
सरस्वती घरासी आली । नाना उपचारें पुजिली । बहु प्रकारें भोजनें धाली रे० । भक्तमंडळी ते निवाली रे ॥२॥
घरा आला चतुरानन । सांग पूजा विधिविधान । नाना प्रकारें भोजन रे रे० । तृप्त जाहले भक्तजन रे ॥३॥
आदिविष्णु रमेसहित । आला पाहुणा अकस्मात । देव दिव्यान्न जेवित रे रे० । भक्त पाहूनि जाले संतृप्त रे ॥४॥
आला पाहुणा महादेव । उमेसहित योगीराव । केला नैवेद्य लाउनि जीव रे० । तेणें संतोषला सदाशिव रे ॥५॥
घरा आली तुळजामाता । तो आनंद नये सांगतां । मानवली उत्तम जेवितां रे रे० । ते मुळींची कुळदैवता रे ॥६॥
क्षेत्नपाळ पाहुणे आले । नाना रसें संतुष्ट जाले । थोर उपचारीं पूजिल रे रे० । देवभक्त आनंदले रे ॥७॥
खंडेराव पाहुणे आले । कांदे मरीत रोडगे केले । तेल आवडीनें जेविले रे रे० । फार भंडार उधळिलें रे ॥८॥
देव मोळे शंकर साघे । त्यांसी मानले अंबिल कांदे । देव विभूतीनें आनंदे रे रे० । बेल धोतर्यानें फार बोघे रे ॥९॥
केण्याकुंजिर्याची भाजी मोगे । कळण्याकोंडयाचे रोडगे । देव नरसिया तेंचि मागे रे रे० । भक्त थोडे भक्तीस जागे ॥१०॥
देव मारुति पाहुणा आला । दहि वडे माळा ढीग केला । आनंदें मुमुःकार केला रे रे० । रामसेवका वर दिधला रे ॥११॥
१५९९
( चाल-साधुसंतां मागणें० )
ऐसा आहे तो विचारून पाहें रे । पाहें पाहें पाहोनि सुखी राहें रे ॥ध्रु०॥
आत्माराम सकळां घटिं आहे रे । प्रचितीनें रोकडा सिद्ध पाहें रे । आत्म्याविण शरीर कैचें राहे रे । तेणेंविण तें कांहींच न राहे रे ॥१॥
चारी खाणी चौर्यांशी लक्ष योनी रे । जनीं वनीं भुवनीं त्निभुवनीं रे । जेथें तेथें राहे पुरोनि रे । जवळीच तो चुक्ला आहे मनीं रे ॥२॥
आत्मा देव प्रत्यक्ष आहे रे एक रे । एक देव चालवी अनेक रे । अवतारी अवतरले ब्रह्मादिक रे । सर्व कांहीं हा तयाचा विवेक रे ॥३॥
युगानुयुगें एक चि आत्मा देव रे । तेणेंविणें अवघेंचि होत वाव रे । त्याचा अवघाचि प्रगटला स्वभाव रे । नाना देव त्या अंतरींचा देव रे ॥४॥
दास म्हणे सावधान बरें व्हावें रे । जगदांतरा अंतरें पुरवावें रे । त्याचें करणें कोणासि नव्हे ठावें रे । लटिकें वाटे तरि संताला पुसावें ॥५॥
१६००
( चाल-असा धरिं छंद० )
लागली बत्ती । ती कशि रे विझवूं पाहाती ॥ध्रु०॥
बत्ती लागली दारूला । दारूसगट बुधला गेला । धुर अस्मानीं दाटला । नये तो पुढती ॥१॥
बत्ती लागली तोफेला । पुढें धणीच उमा केला । काय भीड त्या तोफेला । उडउनि देती ॥२॥
बत्ति लाविली कर्पूरा । ज्योतिस्वरूप मरला सारा । आला मुळिंचीया घरा । न राहे रती ॥३॥
ऐसी सद्गुरु माउली । दासा बत्ती लाउन दिधली । निजा वस्तु ते दाविली । स्वयंम ज्योति ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : May 20, 2011
TOP