भाग २ - लीळा २११ ते २२०

प्रस्तुतचे भागात श्रीचक्रधरस्वामींचे सेंदुरणीस आगमन झाल्यानंतर भटोबासांस ईश्वरप्रतीत होऊन स्वामींचे खडकुलीस प्रयाण होईपर्यंतचा इतिवृतांत आला आहे.


लीळा २११ : मासरौहीं अवस्थान
मग गोसावी मासरौळांसि बीजें केलें : देव्हारचौकीए अवस्थान दीस तीन : तथा मासु एकू : तेयातें एक ब्राह्मणाचें भानवस होतें : तेथ भक्तजना लागि अन्न निफजे : गोसावीयां लागि ताट ए : पुर्वे विहीरिचीये पाळि आंबा : तेथ विहरण होए : पिंपळगांवी वसति : भोगवर्धनीं रामीं वसति : सेलवडे बामेश्र्वरीं वसति : आनवांबनिं अवस्थान : गावां उत्तरे बन : तेथ गुढरू आंबा होता : तेया तळिं गोसावीयांसि अवस्थान : दीस वीस : तथा पाखू : उदयाची बनकर हात पावो धुवावेया एति : हातुपाए धुति : पांच पांच आंबे : प्रतदीनी गोसावीयांसि दर्शन करिती : ॥

लीळा २१२ : देमती अंबग्रासू
गोसावीयांसि आंबेयातळि आसन : गुढरू आंबा : तेयाचे आंबे खाली लोंबति : गोसावी देमाइसातें ह्मणीतलें : ‘देमती : ऐसेया निजावें : आं करावा : लवकरि आंबा तोंडी रीगैल’ : ऐसें गोसावी दाखविलें ॥

लीळा २१३ : तथा भिक्षान्न प्रशंसा
एकुदीसीं देमाइसें झोळीया धुवावीया पाटासि गेलीं : अन्न उरले होतें : तें पाटीं पुंजा केलें : मागील कडुनि गोसावी तेथेंचि बीजें केलें : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘हे कोणें गा केलें’ : ‘जी जी : देमाइसीं झोळी धुतली’ : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘देमती ऐसें कां केलें’ : ‘जी जी : खाती बापूडे मासे’ : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘देमती जैसीं तुह्मीं तैसे पोरे : हे तुमची महीमा’ : ऐसें गोसावी सीक्षापण केलें : ॥

लीळा २१४ : तथा राहावणें
एकूदीसा बाइसां आणि देमाइसा भांडण जालें : मग बाइसी ह्मणीतलें : ‘बाबा : दवडावीया : भांडती असति’ : मग उदियांचि देमाइसें गोसावीयांचेया पुजावसरा आलीं : पुजावसर जाला : मग देमाइसातें गोसावी पाठौं आदरिलें : देमाइसीं वोवीया दोनी ह्मणीतलीया : ‘‘पाउलें ह्मणीतलें : न करीती हरी : कवर्णे परी : जावों आह्मी ॥१॥ : तुझां चरणीं : रंगलें मन : काइसीया कान्हा : पाठविसी ॥२॥ तुझेनि वेधें : असों संभ्रभीतें : निर्वीकारा जोगीयाचें : चीत कैसें निष्ठुर : ॥३॥’’ मग सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘देमती : तुह्मां मासु दीसु असों देइजैल’ : (शोधु) तथा ‘देमती : एथ तुह्मां असों आवडैल तवं असों दीजैल’ : (रामेश्र्वरबास) हे लीळा एथ : ॥ (परशरामबास) गणपतिमढीं ॥

लीळा २१५ : द्रीढ पुरूखु आयागमनीं आंब्रवेचानुवाद
आंबे बहुत सांचले : बाइसीं पुसीलें : ‘बाबा : आंबे बहुत सांचले : काइ करू’ : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘बाइ : द्रीढपूरूखु जरी येती : तथा एत : तरि आंबेया वेचु होए’ : ॥

लीळा २१६ : उपाध्या भेटि
तवं उपाधे परमेश्र्वरपुरूनि आले : गोसावी क्षेमालिंगन दीधलें : तेहीं दंडवतें घातलीं : श्रीचरणा लागले : पुढां बैसले : मग गोसावीयां पूढें सांधों आदरीलें : निगाले तेथौनि श्रीप्रभूचे भेटीवरि सांधीतलें : श्रीप्रभु आंबेयाचा प्रसादु दीधला : या उपरि सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘नेणिजे श्रीप्रभुची लीळा’ : मग गोसावी आपुलीए पांती रसू घालविति : प्रसादु देति : मध्यें बाइसांकरवि आंबे देवविति : मागुतां विळीचां रसू वाढविति : ऐसें गोसावी तृप्तपर्यंत आंबे खावविलें : सराए केली : ॥

लीळा २१७ : संसारू मोचकू
एकू दीसीं गोसावी वीहरणा बीजें करीत असति : सवें भक्तजनें असति : तवं एका आंबेयाचे आंबे : वरि तैसेचि असति : आणि खालि तैसेचि असति ते दैखोनि भक्तजनीं पूसीलें : ‘जी जी : हे आंबे अवधे काढीत असति : तरि या आंबेयाचे आंबे कोण्ही काढीति ना : नेति ना’ : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘हा आंबा संसारूमोचकू : तथा मोचकू गा’ : ‘संसारमोचकू ह्मणीजे काइ जी’ : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘आंबा  खाइजे : आणि संसारापासौनि मूचीजे’: मग भक्तजनीं बनकरातें पूसीले : हां गा : हे आंबे अवघे उतरिता : तरि या आंबेयाचे आंबे नूतरा तें काइ’ : तेंही ह्मणीतलें : ‘हे आंबे खाए तेयासि ज्वरू ए : याचे आंबे पाखीरूवेंहीं न खाति’ : ‘तरि हे काइ कीजति’ : ‘ना : हे मीठ मोहरीयांतु दाटीजति : मग एरे वरीखीचे एरें वरीखें खावों एति’ : मग तेयां साच मानलें : ॥

लीळा २१८ : (लखुबाइसाते ‘आपुली वाटी धुवा’ म्हणणें)
गोसावी चारनेरा बीजें करीत असति : ऐसा मार्गी कव्हणे एके ठाइं गोसावी आसनीं उपविष्ट असति : देमाइसें लखुबाइसें जेवीली : देमाइसें वरि वाटी सांडौनि गेलीं : देमाइसें तेयाची वाटी घेउनि निगों बैसलीं : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘देमती : हे वाटी ठेवा’ : गोसावी लखुबाइसातें ह्मणीतलें : ‘बाइ : वाटी धुवा’ : मग तीयें आपुली वाटी घेउनि गेली : तीयें दीउनि लखुबाइसें देमाइसासि आपुली वाटी धों नेदीति : ॥

लीळा २१९ : देमाइसासि जाडी ठेववणें
एकुदीसीं गोसावी मार्गीं बीजें करीत असति : तवं देमाइसाचे डोइए लखुबाइसाची जाडी देखीली : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘देमती : हे जाडि कवणाची’ : ‘जी जी : हे लखुबाइसांची’ : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘ठेवा’ : तवं मागीला कडौनि एकाइसें आलीं : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘बाई : जाडि वाहावेना : तरि एकू कडीवळ कां खडाना : मग तेंही आपुली जाडि घेतली : तीयें दीउनि आपुली जाडि देमाइसां घेओं नेदीति : ॥

लीळा २२० : चारनेरीं वसति : मार्तंड रोगा उपावो
मग गोसावी चारनेरा बीजें केलें : पूर्वाभिमुख लिंगाचे देउळ : तेयाचां आंगणीं पींपळु : तेथ गोसावीयांसि आसन : बाइसा गोसावीयांसि अखंड वीनवीति : ‘अवघेयांसि बाबा कांहीं करींति : परि या मार्तंडासि कांहींचि न करौति : ते अखंड खोवीतेंचि असति’ : तीये दीसीं सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘मार्तंडा गावांतु जा : भिक्षा करूनि या : एथ अठरा घास भिक्षा संपादा : तुमचे अठरा रोग धाडीजति’ : (परशरामबास) ॥ : तेहीं ह्मणीतलें : ‘हो कां जी’ : म्हणौनि तेहीं दंडवतें घातली : श्रीचरणा लागले : (शोधु) आपुलेनि श्रीकरें गोसावी झोळीयेसि गांठी घातलीया : झोळि दीधली : मग गांवातु गेले : ते आपुलिए मामिचिया घरा गेले : तेहीं पाय धुतलें : उटिलें : न्हाणीलें : उन्हतिन जेउं सूदलें : मग निजैले : भिक्षा अवसरीं उठीले : ‘मामी तुमतें कांहीं भातु असे : तरि घेउनि या’ : ‘भातु काइ कराल’ : ‘तुम्हां काइ तेणें : आणां पां’ : ‘सांधा ना का : काइ गोसावी बीजें केलें असे’ : ‘ना हो’ : ‘कटकट गा भास्करा : सांघतेति कां : तरि मीं गोसावीयां कारणें उपाहारू निफजवीतीयें’ : ‘ना तें काहीं न लगे : भातु आणां’ : तेहीं भातु रांधीला : झोळी भरिली : गोसावीयापासि घेउनि आले : गोसावीयांसि झोळी दृष्टपूत केली : मग सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘मार्तंडा : हें अन्न एकें घरिचें ऐसें दीसत असे’ : ‘ना जी : गांवीं एकचि पेव काढीलें : सारिखेचि जोन्हळे : अवघां घरि सारिखाचि भातु’ : या उपरीं बाइसीं ह्मणीतलें : ‘काइ बाबा : एथ काइ याची मायबहिण असे : मा ते घालिल : बापुडें उदास भीक्षा करूनि आले’ : गोसावी उगेंचि राहीले : तवं ते मागील कडौनि : ताक : मिठ : भाजी : ऐसे घेउनि आलीं : गोसावीयांसि दंडवतें घातलीं : श्रीचरणा लागलीं : बैसलीं : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘बाइ : अन्न अपार धाडीलें’ : तेंही ह्मणीतलें : ‘जी जी : काइसा भातु’ : मागील अवघेंचि सांधीतलें : गोसावी बाइसाची वास पाहिली : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘बाइ : ऐसा असे मुर्ख तुमचा भार्तंडु’ : मग बाइसीं घागरा बांधला : ‘पोरा : तुज कारणे बाबातें उरोधिले’ : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘एथौनि ह्मणीतलें तें करीतेति तरि तुमचे रोग धाडिजेति : मार्तंडा इतुले दीस आपुले हीताहीत नेणा : परि ऐसें कां होइल : पसेयाचें पाइलिये कां एइल’ : ॥ गोसावीयांसि तेथ वसति जाली : ॥

N/A

References : N/A
Last Updated : June 26, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP