चतुर्थ स्कंध - अध्याय पहिला

श्री मत्स्वच्छंदानंदानी रचिलेल्या प्रसिद्ध देवी भागवतसाराचा मराठी अवतार म्हणजे प्रस्तुत ‘ श्री देवी विजय ‘ ग्रंथ होय.


श्रीगणेशायनमः ॥ श्रीअंबिकायैनमः ॥ वासनाजालजोंवरी । जन्ममरणतोंवरी । वासकरणेंमातृउदरीं । बहुकष्टजन्मघेतां ॥१॥

मातेचाप्रसवशीण । मरणाहूनिकठीण । जन्मायेऊनीआपण । कष्टविलेंमातेशी ॥२॥

तेंसर्वविसरुन । मुखींघालीतसेस्तन । प्रेमेंकरीरक्षण । कृपणजेवीधनाते ॥३॥

विष्ठाआणिमूत्र । ओकारीतीअपवित्र । देहींपडतांअणुमात्र । जीनकरीकंटाळा ॥४॥

सदाकडियेवागवी । लेंकुरातेस्वच्छठेवी । डोल्हार्‍यांतडोलवी । ऐकवीसुस्वरगायन ॥५॥

दृष्टीहोतांतयाशी । बोलावितेदेवऋषी । तनधनप्रेममानसीं । बाळाकारणेंतीवेंची ॥६॥

एवंकरीपालन । सदाचिंतीकल्याण । मुर्खपंडितसमान । दुष्टसाधूकेवीअसो ॥७॥

ऐसीअसेहीमाता । हीचिमुख्यपरदेवता । वेददेतीअनुमता । सर्वशास्त्रेंपुराणें ॥८॥

नलगेजियसभजन । नलगेजियेसपूजन । नकोजीसपादसेवन । आज्ञापालन इच्छी ॥९॥

केवळनत्रासमोर । ऐसम्हणेनिरंतर । ऐसीजीदयासागर । महदभाग्येंलाधिजे ॥१०॥

बाळपणींमरेमाता । तारुण्यांततेवीकांता । वृद्धपणींमृत्युसुता । महापापेंलाभहा ॥११॥

मातावाटपाहेघरीं । आपणहिंडेदारोदारीं । मातेशींजोतिरस्कारी । मुखत्याचेनपाहवें ॥१२॥

मातेचाकेलाअव्हेर । दुजानाहींपापीनार । यावच्चंद्रदिवाकर । महानर्कतयासाठीं ॥१३॥

मातेचेजेउपकार । फेडीनम्हणेकुमर । उपायनाहींनिर्धार । लक्षजन्मीघडेना ॥१४॥

मातृगयापुत्रेंकेली । ऋणमोळीउतरली । यतिरुपेंभिक्षायांचिली । ऋणमुक्तशास्त्रह्मणे ॥१५॥

परीहाअथवाद । अनुभवेंहोयअनुवाद । जीवतादीधलाखेद । गयावर्जनकासया ॥१६॥

स्वयेंझालासंन्यासी । भिक्षामागतांमातेसी । तीतोंदुखावेंमानसीं । भोगत्यागपुत्राच्या ॥१७॥

जगत् गुरुसाक्षातूशकर । मातेसीठकऊननिर्धार । सनासघेतलासाचार । दुःखपावलीतीजननी ॥१८॥

मातेचेंफेडायारिण । सुलभउपायसेसान । नोल्लंघावें कदांवचन । यावज्जीवमुलानें ॥१९॥

मातेचेंकरितांसेवन । सर्वदेवसुप्रसन्न । भोगमोक्षाचेनिधान । मातृसेवनजाणिजे ॥२०॥

तेंनाहींममभाळीं । अभाग्यामाजीमहाबळीं । असोध्याऊनह्रदयकमळीं । भागवतविचारुं ॥२१॥

चतुर्थस्कंदचरित । गोडकथारसभरित । जनमेजयव्यासाप्रत । प्रश्नकरीऐकाते ॥२२॥

वसुदेवाचेउदरीं । स्वयेंअवतरलाहरी । देवपूज्यतोकारागारीं । केविपडलाकसाच्या ॥२३॥

बंदीमाजीजन्मझाला । गोकुळासीकेवीनेला । बंदकांनसोडविला । कृष्णतेथेंचईश्वरे ॥२४॥

दोघांचेकायदुरित । देवहीतयानवारीत । कंसययातिकुलजात । असोनिबाळेंकेवींमारी ॥२५॥

बाळांचकायपातक । जन्मतांचिकंसघातक । कन्याकोणबोलेवाक्य । निष्ठोनिगेलीआकाशीं ॥२६॥

अष्टभुजातीजाहली । सर्वदेवेंपूजिली । विंध्याचलींराहिली । कोणसांगास्वामिया ॥२७॥

महाऋषीतपोधन । आश्रमींअसतांनरनारायण । तयाचेअंशकृष्णार्जुन । केविजाहलेस्वामिया ॥२८॥

कृष्णगार्हस्थ्यभारी । प्रद्युम्ननेलातस्करी । नेणेंसाक्षान्मुरारी । आश्चिर्यकेवींसांगिजे ॥२९॥

कृष्णेंहरिलाभूभार । कांननाशिलेतस्कर । जेयेऊनीपार्थासमोर । भार्यानेल्याकृष्णाच्या ॥३०॥

दुःखपावलेपांडव । कोठेंगेलेंयज्ञवैभव । कोणपापेंअभिनव । द्रौपदीसकष्टते ॥३१॥

पांडवतेसदाचारी । ममपितात्याचेउदरीं । तोविप्रहेळनाकरी । नवलकायकथनकीजे ॥३२॥

सूतसांगेऋषीसी । व्याससांगेनृपासी । रायाकायतूंविचारिसी । कर्मगतीगहनही ॥३३॥

त्रिगुणेंविश्व आकारल । कर्मसूत्रेंव्याप्तकेलें । कर्मैचदेहादिजाहलें । कारणकर्मकार्यजग ॥३४॥

ब्रम्हादीयांतगुंतले । तेथेंकांहींउपायनचले । कर्मयोगेंजन्मझाले । मरणजन्मपुनः पुनः ॥३५॥

कर्माचेभेदतीन । संचिताप्रारब्धक्रियमाण । एकेकाचेभेददोन । शुभाशुभप्रकारे ॥३६॥

जेंबहुजन्मार्जिंत । तेंम्हणवेसंचित । जेवींगृहीठेवनिघत । म्हणतीवाडवडिलांची ॥३७॥

पूर्वजन्मीं जें केले । प्रारब्धतेंम्हणविलें ॥ वासनायोगेंसांठवलें । भोगाविणसरेना ॥३८॥

घडेजेंसांप्रतकाळीं । क्रियमाणम्हणतीसकाळीं ॥ सांठवितें अंतकळी अहंममतेचिनीयोगें ॥३९॥

एवंदेहींगुंढाळला । मायाबळेंवेष्टिला ॥ ब्रह्मेंशानहरीला । कर्मवशवागण ॥४०॥

सूर्यचंद्रतारागण । इंद्र अग्नीयमवरुण ॥ कर्मपाशींगुंफिलेंजाण । राहटीनित्यसेविती ॥४१॥

मत्स्यादिरुपेंअपार । विष्णुकरीवेरझार ॥ गर्भदुःखसहेदुस्तर । पराधीनम्हणूनिया ॥४२॥

चुकोदेवागर्भवास । मुनीकरितीसायास ॥ टाकनिशय्यारमेस । गर्भवासकोणभोगी ॥४३॥

निश्चयेंजानृपती । नकळेकोणाकर्मगती ॥ दयाकरीलभगवती तरीचहोयमोकळा ॥४४॥

कृष्णकथापावन ऐकसांगतोसावधान ॥ कश्यपाचाअंशजाण । वसुदेवगोवृत्ती ॥४५॥

वरुणशापेंकश्यप । वसुदेवझालागोप ॥ अदितीसुरसासुरुपे । कश्यपस्त्रियाबहिणीह्या ॥४६॥

शापयोगेंमनुष्ययोनी । झाल्यादेवकीरोहिणी ॥ विष्णुअवतारबहुकारणी । भ्रुगूशापेहोतसे ॥४७॥

यज्ञार्थतोकश्यपमुनी । वरुणाचीधेनुआणी ॥ बहुमागेप्रार्थूनी । नेदीपुन्हाकश्यप ॥४८॥

पाशीगेलाब्रम्हसदन । सांगीतलेंवर्तमान ॥ गोपालहोयम्हणून । तयाशापिलेंम्हणेतो ॥४९॥

अप्पतीचेंवाक्य ऐकून । विधीऋषीसपाचारुन ॥ म्हणेतूंऐसासुजाण । अन्यायकरिसीकिमर्थ ॥५०॥

लोभाचेकायमहिमान । पापाचेंहेंमूळकारण ॥ नटाकवेकश्यपान । इतरकायशक्यतें ॥५१॥

धन्यधन्यतेंचिमनीं । लोभनसेज्यांचेमनी ॥ शापवदपद्मयोनी । भार्यासहगोपहोय ॥५२॥

तसीचदितीअदितीस । शापदेईशोकवश ॥ उत्पंनहोतांपुत्रास ॥ सातजणांनाशहोवो ॥५३॥

सूतसांगेशौनकासी । नृपविचारीकारणासी ॥ व्याससांगीकथेशी । चित्रचरित्रपरिसिजे ॥५४॥

दक्षकन्यादोनअसती । दितीआणिअदिती ॥ कश्यपस्त्रियाबहुप्रीति । उत्तमरुपिणीदोघींही ॥५५॥

महासमर्थंलोकेश्वर । अदितीपुत्रपुरंदर ॥ दितीप्रार्थीतैसाकुमर । कश्यपासीतेकाळीं ॥५६॥

मुनीजाहलातियेशींरत । सांगीतलेंपयोव्रत ॥ म्हणेकरितांहेंनिश्चित । सुतहोईलशक्रसा ॥५७॥

दितीकरीव्रतधारण । पवित्रकरीआचरण ॥ भूमीवरीकरीशयन । शुचिस्मितासतीती ॥५८॥

गर्भआलापूर्णतेशीं । तेजचढलेंदताशीं ॥ दुःखजाहलेंअदितीशी । गर्भपाहूनीसवतीचा ॥५९॥

बोलाऊनीजवळीसुत । सांगेतयशीमनोगत ॥ तुजलागीशत्रूहोत । दितीगर्भींतेजस्वी ॥६०॥

कांहींयुक्तीकरुन । गर्भाचेकरीनाशन ॥ शत्रूसकायउपेक्षून । पुढेंबहूतजडावे ॥६१॥

तिजपाहतांमानसीं । चैननसेंजिवाशी ॥ त्वराकरीशत्रुनाशी । जरीइच्छिशीप्रियमाझें ॥६२॥

इंद्रेंवचनऐकिलें । मनींकपटकल्पिलें ॥ दितीशीजाऊनीवंदिलें । नम्रबोलेकपटपटूं ॥६३॥

घटभरिलाविषाचा । वरीथरपायसाचा ॥ सर्पदेहथंडसाचा । परीअंतरींविषदंत ॥६४॥

बोकाएकसंतझाला ॥ कंठीशोभेकपालमाला ॥ पाहुनीमुषकांविश्वासआला ॥ अंगावरीलोळती ॥६५॥

जातीजेव्हांबिळांत । शेवटल्यासगटकावित । तेवीदितीसिबोलत । इंद्रकायपरिसिजे ॥६६॥

व्रतयोगेंमातेतुशीं । कष्ठहोतींबहुवशी ॥ पातलोंमीसेवनाशी । सेवासांगमजलागी ॥६७॥

वडिलाचेकरितांसेवन । अक्षय्यगतीपावेन ॥ भेदनाहींमाझेंमन । अदितीशपथमजअसे ॥६८॥

एवंतिजविश्वासिले । बैसोनियापायधरिले ॥ हळूंहळूंतेणेंचुरिले । अतिप्रीतीदाविली ॥६९॥

बहूतहोतीतीश्रमली । वचनेंविश्वासपावली । सेवायोगेंसुखावली । झोंपीगेलीतेधवा ॥७०॥

इंद्रेंपाहतांचिनिद्रित । सूक्ष्मरुपेंवज्रसहित । योगबलेंतो उदरांत । शिरुनिगर्भाकापिले ॥७१॥

गर्भखंडेंकेलींसात । परीतींसजीवरडत । हळूंचतयांशींसांगत । रुदनतुम्हींनकीजे ॥७२॥

एकेकाचेसातसात । पुन्हाकापीपविनाथ । एकुणपन्नासजाहलेमरुत । जागृतझालीदक्षसुता ॥७३॥

गर्भछेदनतीसकळलें । अदितीकृत्यजाणिलें । दोघांसहीशापिले । कोपयुक्तहोऊनी ॥७४॥

म्हणेइंद्राकेलाछळ । नासोराज्यतुझेंसकळ । पावसीदुःखबहुकाळ । स्वकर्मफलभोगावें ॥७५॥

अदितीतुवांहेंकरविलें । सातवेळगर्भाकापिलें । मरोततुझींसातबाळें । काराभोग अन्यभवीं ॥७६॥

ऐकूनमिरीचिनंदन । तीचेकरीशांतवन । तुझपुत्रडंद्रासमान । होतीलसर्व इंद्रसखे ॥७७॥

ब्रह्मवरुणाचियाशापें । अन्यजन्मींभोगूंपापें । देवकीहीदितिशापें । कारागृहींराहिली ॥७८॥

चौसष्टवरीश्लोकशत । कश्यपादकाशापहोत । तेंचरित्रअसयांत । लोभमाहात्म्यवर्णिलें ॥७९॥

श्रीदेवीविजयेचतुर्थस्कंदेप्रथमोध्यायः समाप्तः ॥१॥ 

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP