चतुर्थ स्कंध - अध्याय तिसरा
श्री मत्स्वच्छंदानंदानी रचिलेल्या प्रसिद्ध देवी भागवतसाराचा मराठी अवतार म्हणजे प्रस्तुत ‘ श्री देवी विजय ‘ ग्रंथ होय.
श्रीगणेशायनमः । नृपम्हणबादनारायणा । आश्चर्यवाटेमाझेंमना । प्रल्हाद आणिनारायणा । युद्धकिमर्थजाहलें ॥१॥
नारीअथवाधन । हेंयुद्धासीकारण । निस्पृहशांतनारायण । रणकिमर्थतयाशी ॥२॥
प्रल्हादहीमहासंत । तपव्यासीकेवीझुंजत । अहंकारनोहेंगलित । तरीतेंतपकासया ॥३॥
व्याससांगेनृपती । कार्यकेवीकारणाप्रति । टाकूंशकेलनिश्चिति । विचारुनीपाहेपा ॥४॥
कायहेंशरीरजाण । अहंकारयाचेकारण । भूषणकार्यहेमकारण । पृथकरुपेंवसेंकेवीं ॥५॥
घटाचेकारणमाती । रजताकारणशुक्ति । जगाकारण अहंकृती । देहधारीसुटेकेवी ॥६॥
नरहरीविष्णुरुप । मारिलाहिरण्यकश्यप । प्रल्हादकेलाभूप । पाताळीचाविष्णूनें ॥७॥
भ्रुगूचापुत्रच्यवन । करीतसेरेवास्नान । महाविषेनलाओढून । पाताळाशींच्यवनाते ॥८॥
ऋषीकराविष्णुस्मरण । निर्विषझालासर्पदारुण । प्रल्हादेंपाहिलातपोधन । अर्ध्यादिकींपूजिला ॥९॥
ऐकुनीयेण्याचेंकारण । तीर्थाचेपुसेंमहिमान । तत्वोपदेशींतयाच्यवन । तीर्थमहिमासंक्षेपें ॥१०॥
गंगायमुनासरस्वती । रेवाक्षिप्राचर्मण्वती । गोदाकृष्णावेत्रवता । शरयूभीमाचंद्रभागा ॥११॥
ख्यातगंडकीताम्रपर्णीं । सिंधूभद्रातापीवेणी । विहायसाशतद्रुतावाखाणी । इंद्रायणीभीमरथी ॥१२॥
पुष्करनैमिषकुरुक्षेत्र । काशीगयादिपवित्र । पावनकोणीचकरीना ॥१३॥
प्रल्हादनिघालातीर्थाशीं । पातलासवेंबदरिकाश्रमासी । यात्राकरितांवटच्छायेशी । धनुर्बाणपाहिले ॥१४॥
अनेकरुपींबहुशर । धनुष्येंअतिसुंदर । दोघेबैसलेसमोर । नरनाराय़णतपस्वी ॥१५॥
कोपेंबोलेदैत्येश्वर । तुम्हीदंभआरंभिलाथोर । मस्तकीठवूनीजटाभार । तपाचरणकरीतसा ॥१६॥
सवेंचिबाळगिताधनुर्बाण । ऐसेकैसेतुम्हीब्राम्हण । अधर्माचेआचारण । करीतांकेवीबुद्धिमंद ॥१७॥
धर्मसेतूचारक्षक । असतांमीसम्यक । केवीतुम्हीधर्मलुंपक । दंडयोग्यहादंभ ॥१८॥
ऐकूनीबोलेनर । दंभअसोवातपथोर । तुजकायअसेअधिकार । बडबडसीकिमर्थतूं ॥१९॥
तपआणियुद्ध । दोनीआम्हांसीद्ध । ब्राम्हतेजनेणसीमंद । मार्गेजायउगाची ॥२०॥
जेणेंइच्छावेंकल्याण । छळूंनयेतब्राम्हण । जरीअसेअभिमान । युद्धकरीबळपाहे ॥२१॥
व्यासम्हणेनृपती । युद्धादघेसिद्ध होती । शस्त्रास्त्रातेवर्षती । क्रोधभरेंतेधवा ॥२२॥
प्रल्हाद आणिनारायण । युद्धकरितीदारुण । अहारात्रक्रुद्धमान । भांडतीतेपरस्पर ॥२३॥
देवबैसुनीविमानी । पाहतीयेऊनीगगनी । आश्चर्यकरितीमना । स्तवीतीदोघांतधवा ॥२४॥
नारायणेंधनुष्यतोडिलें । प्रल्हादेंदुजेघेतलें । तेंहीतोडीतावहिलें । घेततीसरेप्रल्हाद ॥२५॥
घेतांचिधनुष्यहातीं । नारायणतोडीत्याप्रती । क्रोधेंफेकीपरिघाप्रती । छेदिलातोनारायणें ॥२६॥
गदाशक्तीसर्वतोडिलें । सहस्त्रवषयुद्धझालें । साक्षाद्विष्णुपातले । क्षमाकारणेंतेधवा ॥२७॥
प्रल्हादाससमजाऊनी । पाठविलास्वसदनीं । पुन्हातेदोघेमुनी । तपआचरतीअत्युग्र ॥२८॥
एवंक्रोधादीगण । देहीत्यांचेपराधीन । नरवाक्यातेंऐकून । नारायणशांतझाला ॥२९॥
मगदेवांगनासीबोले । येजन्मींआम्हीव्रतकेलें । ब्रम्हचर्यअंगिकारिलें । व्रतआमुचेनभंगावें ॥३०॥
येवेळींजाईजेस्वर्गीं । आम्हींअठ्ठाविसावेंयुगीं । देवकार्यार्थअवतरुंअंगीं । होऊंपतीतेव्हांतुमचा ॥३१॥
पृथकपृथकराजगृहीं । जन्मातुम्हींसर्वही । गार्हस्थ्यधर्मेंसर्वांसही । वरीननिश्चर्येजाणिजे ॥३२॥
व्यासम्हणेनृपती । एवंवदोनीत्यांप्रती । स्वयेंपुन्हातपकरिती । नरनारायणमहात्मे ॥३३॥
उर्वशीसहितदेवांगना । मदनादिसर्वसेना । प्राप्तझालेनंदनवनां । पुरंदरनमियेला ॥३४॥
उर्वशीतयासमर्पिली । वार्तासर्वकथनकेली । इंद्रवृत्तीसंतोषली । अतिआश्चर्यजाहले ॥३५॥
म्हणेधन्ययांचतपोबल । धैर्यशांतीहीअतुल । इच्छामात्रेंरचितील । ब्रम्हांडसहजतपोबळें ॥३६॥
आणीकहीकारण । विष्णुअवतारींसांगेन । भ्रुगुशापेंनारायण । महिवरीअवतरेल ॥३७॥
हेंनरनारायणाख्यान । परमचित्र असेंपावन । करितीजेंपठणश्रवण । ज्ञानप्राप्तीकरीतसे ॥३८॥
एकुणसाठश्लोकशत । प्रन्हादनारायणझुंजततेंचरित्रचमत्कृत । अंबाबोलेप्राकृती ॥३९॥
देवी. चतुर्थस्कंदेतृतीयाः ॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP