चतुर्थ स्कंध - अध्याय दुसरा

श्री मत्स्वच्छंदानंदानी रचिलेल्या प्रसिद्ध देवी भागवतसाराचा मराठी अवतार म्हणजे प्रस्तुत ‘ श्री देवी विजय ‘ ग्रंथ होय.


श्रीगणेशायनमः । ऐकूनीबोलेजन्मेजय । वाटेपरम आश्चर्य । देवहीकरीतिअनय । धर्मकोठेंस्थिरावे ॥१॥

चतुष्पादधर्म असे । सत्यशौचदयाऐसे । चतुर्थतोदानविलसे । पुराणज्ञवदताती ॥२॥

सत्वांशदेवबोलिले । तेंचअसत्यआचरिलें । धर्मआस्थानवहिलें । कोठेंकृष्णावर्णिजे ॥३॥

कष्णेंकपटकरुनी । नाशिलेभीष्मादिकरणीं । जरासंधादिछळूनी । मारिलेपांडवेंकृष्णमतें ॥४॥

विष्णूस्वयेंवामन । बळिछळीलाकपटान । बोलिजेतेथेंकायअन्य । धर्मकोठेंसांगिजे ॥५॥

व्यासह्मणतीभूपती । त्रिगुणेंभरलीजगति । तेतिघेंएकत्रनांदती । महामायेचीकरणीही ॥६॥

देहझालाधारण । भरलेतेव्हांतीनगुण । ऐसासमर्थआहेकोण । गुणातींतसर्वदा ॥७॥

गुणकरितीविकार । मोहपावतीहरिहर । इतरतेथेंपामर । मोहाकेवींजिंकिती ॥८॥

गुणातींतवैखानस । निर्माणकेलेंउपमेस । गुणातीतताअन्यास । सर्वदाकदानघडेची ॥९॥

धर्माचेस्थानसत्य । तयानबाधेअनृत । बळीनेंपाळिलेंसत्य । जिंकिलेतेणेंविष्णुशी ॥१०॥

त्रिविऋमजोभगवान । अनृतेंझालालघुवामन । अद्यापिद्वारींदासहोऊन । चाकरझालाबळीचा ॥११॥

राजाजाणयासंसारीं । गुणकेलेमनविकारी । गुंतलेंतेंविषयाकरीं । बलिष्टझालीइंद्रियें ॥१२॥

स्वार्थशिलाबांधिलीउरी । बुडेजायवासनासागरीं । पापपुण्यातोनविचारी । षड्वैरीघालितीझाला ॥१३॥

नजाणेंमगकृताकृत । स्वार्थींईर्षापुढावत । द्वेषचित्तींउपजत । आशातृष्णापसरती ॥१४॥

संकल्पविकल्पाचाघोळ । मनावरीचढेमळ । अहंकारहोयप्रबळ । उपदेशनठसावे ॥१५॥

प्राप्तहोतांचिवैभव । दंभमानमोहगर्व । तुच्छमानीजगसर्व । शाहणाएकमीचपै ॥१६॥

म्याकरुनउद्योग । प्राप्तकेलेसर्वभोग । निर्दाळिलाशत्रुवर्ग । पराक्रममाझाची ॥१७॥

माझेसुतमाझीदारा । माझेंगृहमाझापसारा । माझेंचिआज्ञानुसारा । सर्वलोकवागतसे ॥१८॥

तयाचेकरावयारक्षण । अकर्महीकरीआपण । दैववशेंनासतांजाण । दन्यकरीबापुडा ॥१९॥

विषयाशानाहींजिरली । दरिद्रदशावोढवली । पापमतीअंगिकारिली । विषयसुखार्थदैन्यभरें ॥२०॥

एवंभावदेवादिकासी । उपजवीमायाबहुवशी । जगत असेंतिचेंवशी । अणुपासूनब्रम्हांड ॥२१॥

सत्वगुणीअसतीअमर । द्रोहकरितीपरस्पर । तपस्वीपाहतांपुरंदर । विघ्नकरीआशेनें ॥२२॥

यासीनाहींयुगकारण । जेथेंनिर्मलसत्वगुण । तेचिसत्ययुगजाण । द्वापरजाणरजोगुणें ॥२३॥

कलीतोचितामस । कृतयुगगुणातीतास । कारणएकमहामायेस । जाणनरेंद्रानिश्चयें ॥२४॥

विधीचेंह्रदयांतून । धर्मझालाउत्पन्न । सत्यवादीतोब्राम्हण । वैदिकधर्मआचरे ॥२५॥

दक्षकन्यादहाजणी । स्रियाकेल्याविवाहूनी । चारपुत्रतयालागुनी । परमतेजस्वीजाहले ॥२६॥

हरीकृष्णनरनारायण । योगाभ्यासीदोघेंजण । ब्रम्हज्ञानीअनुभवीपूर्ण । हरिकृष्णजाहले ॥२७॥

हिमाचलींकरोनिस्थान । बैसलेनरनारायण । देवाचीसहस्त्रवर्षेंपूर्णं । परमतप आचरिले ॥२८॥

विष्णवांशतेदोघेऋषी । परब्रह्मरुपमानसीं । तपतेजेंतिनीलोकास्री । तापवितीसूर्यासम ॥२९॥

इंद्रेंपाहूनत्यांचेंतप । मनीकरीतसेसंताप । विघ्नार्थनिघेस्रुरभूप । ऐरावतोरुढतो ॥३०॥

येऊनीतयांचेसमोर । म्हणेइच्छितमागावर । अलभ्यअदेयदुष्कर । पुरवीनम्हणेतूमचे ॥३१॥

परीतयांचेंनचळेंध्यान । निश्चलझालेबुध्धीमन । कदांनुघडितीनयन । कचेंभाषणमौनावले ॥३२॥

तयांचेदृढपाहून । मायारचीसहस्रनयन । वातवृष्टीअतिदारुण । चमचमाटविजांचा ॥३३॥

कडकडाटमेघगर्जती । व्याघ्रसिंहआरोळ्यादेती । महासर्पफुत्कारिती । जवळीतयांचामायिक ॥३४॥

परीतेमहामुनी । महामायाठसलीमनी । निश्चलअसतीबंधूदोनी । खिन्नझालादेवराजा ॥३५॥

परतआलामंदिरीं । मनोंआपुलेंचिंताकरी । कायकरावेंनिर्धारी । भयेंलोभेंनचळले ॥३६॥

वाणीकाममायाबीज । लाधलेजयामूख्यगुज । कांहींनचलेंतेथेंकाज । देवीभक्तअजिंकते ॥३७॥

ऐसेंचिंतीनानापरी । शांतीनसेचीअंतरी । मदनासीतेव्हांपाचारी । अप्सराआणिवसंता ॥३८॥

शक्रम्हणेपंचशरा । माझेंकामींकीजेत्वरा । सवेंघेऊनीवसंताप्सरा । कांतेसहजायवेगें ॥३९॥

तेव्हांबोलतसेमदन । एकदेवीभक्तावांचून । त्रिलोकांसीमोहीन । उपायतेथेंनसेमाझा ॥४०॥

सूतसांगेऋषीसी । पाहूनइंद्राचेआग्रहासी । सर्वांसहहिमाद्रीसी । कामदेवपातला ॥४१॥

प्रथमपातलावंसत । शोभितकेलापर्वत । वृक्षानवपल्लवयेत । सुकोमलरक्तते ॥४२॥

सर्ववेलींअंकुरती । प्रेमेंवृक्षाआलिंगिती । प्रेमरोमांचदोघांयेती । कोमललघुकेसरे ॥४३॥

वनश्रीनामेंकामिनी । समस्तश्रृंगारकरुनी । हातीकमळघेउनी । वननोवरावरियेला ॥४४॥

तालतमालहिंताल । वंशखर्जुरीपूगीफल । आम्रकदंबनारिकेल । फलपुष्पेंविराजतीं ॥४५॥

दाळिंबनारिंगअननस । पेरुंतुतेंफणस । खिरण्याचारोळयाफालस । आडूजंबीरफलाढय ॥४६॥

एलालवंगजातीफल । मरीचीमधूकरंभाफल । कर्मरंगशेवतीसीताफल । फलाढयरसाळशोभतीं ॥४७॥

बकूलमांदारपारिजात । चाफामुचकुंदप्रफुल्लित । स्थलकमलेंसुवासीत । बिल्ववृक्षफूलले ॥४८॥

मोगराशेवंतीजाई । मालतीचमेलीजुई । गोकर्णीकन्हेरचाफाभुई । प्रफुल्लहोऊनीराहिले ॥४९॥

नागवेलीद्राक्षवेली । ठाईंठाईंमंडपींझाली । गगनचुंबितवृक्षांवली । सभोंवारशोभल्या ॥५०॥

शालअशोकतिंतिणी । वटपिंपळाच्यादाटणी । देवदारधूपचंदनीं । वनकेलेंसुवासित ॥५१॥

वापीतटाकसरोवर । निर्मलोदकेंसुंदर । पद्मेंफुललीमनोहर । अनेकजातींशतपत्रें ॥५२॥

तयाकमलांमाझारी । बैसल्याभ्रमरांच्याहारी । नानापक्षीवृक्षावरी । नरमादीएकत्र ॥५३॥

शुकमयूरकोकील । बयामैनाचिमण्यालाल । रावेपारवेस्वरकोमल । करितीतेथेंप्रेमभरें ॥५४॥

हंसकारंडचक्रवाक । गरुडघारीगृध्रकाक । घुबडपिंगळेचासबक । ठाईंठाईंक्रीडती ॥५५॥

अनेकवृक्षअनेकलता । अनेकपुष्पेंफलेंभरिता । अनेकपक्षीपशुव्राता । वर्णितांमितीनयेची ॥५६॥

तिलोत्तमादिदेवनारी । हावभावकळाकूसरी । नृत्यगायनमधुरस्वरीं । आरंभिलेमोहक ॥५७॥

रतीसहकुसूमशर । आकर्णओढूनीपंचशर । वेधकरीमानसांतर । ऋषिवरांच्यातेधवा ॥५८॥

नरआणिनारायण । विस्मितझालेपाहून । वसंतरतीअप्सरामदन । सन्मुखपाहिलीकामसेना ॥५९॥

रंभातिलोतमासुकेशी । पुष्पगंधामनोरमेशी । श्वेताप्रमद्वराघृताची । गीतज्ञाचारुहासिनी ॥६०॥

चंद्रप्रभासोमाकोकिला । अंबुजाक्षीविद्युन्माला । पाहेऐशासहस्त्रसोळा । पनासअधिकतयावरी ॥६१॥

नमस्कारुनीऋषीशी । छलेंकरितीभाषणासी । नम्ररुपेंसावकाशी । गातीसन्मुखयशातें ॥६२॥

ऐकुनीझालेप्रसंन । भगवान्नरनारायण । हेंइंद्रकृत्यजाणून । किंचिदूगर्वजाहला ॥६३॥

तपोबलदाखवीन । म्हणोनकेलेऊरुताडन । प्रगटलीअतीरुपवान । उर्वशीनामेअप्सरा ॥६४॥

सोळासहस्त्रपन्नास । उत्पंनकेल्यासेवेस । अनेकसामुग्रीबहुवस । हास्यविनोदेसेविती ॥६५॥

वैभंवंतयाचेंपाहून । देवांगनागेल्यामोहून । मगआरंभिलेंस्तवन । नारायणाचेंतेकाळीं ॥६६॥

ऐकतांतयांचेस्तवन । झालेंदोघेहीप्रसन्न । म्हणतीमागावरदान । मनेप्सितजजेअसे ॥६७॥

हेंन्यावेउपायन । इंद्राकीजेसमर्पण । पुनः कोणातपाविघ्न । नकरीऐसेसांगाव ॥६८॥

तेव्हांत्याम्हणतीअंगना । तुजटाकूनीनारायणा । नजाऊंआम्हीइंद्रसदनां । सेवाकरुंयेथेंच ॥६९॥

झालासजरीप्रसन्न । पतीहोयआम्हांलागून । केल्याअंगनाउत्पन्न । स्वर्गींजावोततववाक्यें ॥७०॥

ऐकतांचिवाक्यऐसें । पश्चात्तापमनींवसे । म्हणेआतांकरुंकैसे । तपभगहोईलकी ॥७१॥

हांसतीलसर्वऋषी । जरीकोपकरावायांशी । दुजाएकशत्रूसी । मानसींठावदणेंपडे ॥७२॥

एवंजाहलाउदास । कळलेंतेव्हांनरास । म्हणेकदांनकीजेकोपास । अहंकारेंठगविलें ॥७३॥

पूर्वींऐसेंचिझाल । तपसर्वव्यथगेल । प्रल्हादासीयुद्धकेल । क्रोधयोगेकरुनी ॥७४॥

सूतसांगेशौनका । ऐकूनीऐशाव्यासवाक्या । नृपकरीतेव्हांशंका । पुढिलियेअध्यायी ॥७५॥

त्रेसष्टवरीएकशत । श्लोकवर्णिलसुरसगीत । नरनारायणासीछळीत । इंद्रतेव्हांलोभानं ॥७६॥

देवीविजयेयचतुर्थेद्वितीयः ॥२॥  

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP