चतुर्थ स्कंध - अध्याय आठवा
श्री मत्स्वच्छंदानंदानी रचिलेल्या प्रसिद्ध देवी भागवतसाराचा मराठी अवतार म्हणजे प्रस्तुत ‘ श्री देवी विजय ‘ ग्रंथ होय.
श्रीगणेशायनमः । देवीकथापरमपवित्र । तयांमाजीकृष्णचरित्र । प्रसंगेंवर्णीशक्तिपौत्र । अभिमन्युपौत्रासी ॥१॥
श्रोतीसादरकीजेमन । कृष्णगाथाअतिपावन । संक्षेपेंयेथेंवर्णन । सविस्तरकृष्णखंडी ॥२॥
तेथीचाघेऊनिआधारा । किंचिद्वर्णिलासेविस्तार । श्रवणेज्याच्यादुःखभार । एकसरेनासती ॥३॥
देवकीगर्भीमुरारी । दिवसांमासातेजभारी । भारावतरणार्थहरी । वसेगर्भीशापबळें ॥४॥
सर्वदेवगुप्तयेती । प्रेमेंकरितीगर्भस्तुती । नवमासहोतांपूर्ती । प्रसवसमयपातला ॥५॥
कंसकरीतसेजतन । रक्षितीसदाअसुरगण । नीजनयेकंसालागुन । मनींठसलाआठवा ॥६॥
कारागृहकेलेंबळकट । प्राकार असतीतयाआठ । जडलीतयादृढकपाट । लोहकुलुपेंचढविली ॥७॥
सहस्रसहस्रराक्षस । रक्षितीएकएकद्वारास । सावधबैसलेअहर्निश । नग्नखड्गेघेऊनिया ॥८॥
दाहवामासश्रावण । अष्टमीआणिपक्षकृष्ण । रोहिणीअर्धरात्रीकृष्ण । चंद्रोदईप्रगटला ॥९॥
बाळाचेपाहूनिमुख । दोघांवाटलेंसुख । सवेंचिझालेंबहुदुःख । घातिलदुष्टम्हणूनी ॥१०॥
तवझालीआकाशवाणी । आलीवसुदेवाचेंकांनीं । वसुदेवापुत्रघेऊनी । सत्वरजाईंगोकुळां ॥११॥
बाळठेवीतिचेशयनीं । कन्येसियेघेऊनी । मीआपुलेंमायेनी । मोहिलेंसर्वरक्षक ॥१२॥
मोकळोंसर्वकपाटें । पाडिलेंसर्वनिद्रानेटें । तुजाईंमोकळयावाटें । त्वरेंयेईनिर्भय ॥१३॥
एवंऐकिलेंवचन । मोकळींद्वारेंपाहून । त्वरेंबाळासिउचलून । गमनकरीराजमार्गे ॥१४॥
नेणकोणीनागरिक । पूरवाहेयमुनोदक । परीआदिमायेचेंकौतुक । कटीमात्रझालीनदी ॥१५॥
वसुदेवगेलागोकुळीं । पूर्वींचमायागर्भीआली । त्याचवेळींप्रगटली । नेणेंयशोदानिद्राभरे ॥१६॥
स्वयेंचहोऊनिदासी । कन्यादिलीवसुदेवासी । बाळनिजवीयशोदेपासी । गुप्तझालीसत्वर ॥१७॥
परांबेचेकौतुक । नजाणतींब्रम्हादिक । पामरकायकंसएक । जाणूंशकेचरितहें ॥१८॥
वसुदेव आलाबंदिखानां । मंचकीठेविलीकन्या । पूर्ववत् कपाटादिबंधना । अनकदुंदुभीअवलोकी ॥१९॥
सावधझालेराखणार । तोंऐकतीरुदनस्वर । त्वरेंसांगतीसमाचार । कंसाम्हणतीपुत्रझाला ॥२०॥
ऐकतांचिधांवेखळ । वसुदेवाशींमागेबाळ । हाचिशत्रूकेवळ । देईसत्वरीम्हणेतो ॥२१॥
वसुदेवदुःखेंकरुन । कन्यादेईआणून । म्हणेनघेईइचाप्राण । पुत्रनाहींकन्याही ॥२२॥
कन्यापाहुनीकंस । विस्मयकरीमानस । आकाशवाणीनारदास । खोटेंपणकेवींहें ॥२३॥
दृढमाझेंकारागारी । वसुदेवकायकृत्रिमकरी । सावधरक्षक असतीद्वारीं । देवमायानकळेही ॥२४॥
कन्याअसोअथवासुत । निश्चयेंकरावाघात । म्हणोनिकन्यापाईंधरित । शिळेवरीमाराया ॥२५॥
तवतीनिष्टूनगेली । गगनोंउभीटाकली । कंसाप्रतिबोलिली । मेघगंभीरवाणीनें ॥२६॥
कायदुष्टामारुनिमज । प्रबलशत्रूझालातुज । मृत्युगिळीलसहज । उपायकांहींनसेची ॥२७॥
एवंकंसावदोनी । अष्टभुजातीमोहिनी । सुरेंपूजिलीयेऊनी । विंध्यपर्वतींस्थिरावे ॥२८॥
विंध्याचलींत्रिकोण । स्थलनिर्मूनीसुलक्षण । तीनरुपेंकरुनिसगुण । राहीलीतेथेंयोगमाया ॥२९॥
कालीलक्ष्मीसरस्वती । त्रिगुणातीपरंज्योती । बलिप्रियाकृपामूर्ती । भक्तवत्सलानिर्गुणा ॥३०॥
नंदगृहीप्रगटली । नंदानामपावली । भक्तकार्येसाधिली । करुणामयमूर्तिती ॥३१॥
असोकंसेंवाक्य ऐकिलें । मनचिंतेनेंपोळलें । सवेंचिदैत्यपाचारिले । आज्ञादेईतयांशीं ॥३२॥
पूतनावत्सधेनुक । प्रलंबकेशीव्योमबक । ग्रामीशोधूनबाळक । नाशकराम्हणतसे ॥३३॥
विष्णुअसेआपुलावैरी । त्याचेविप्रसहाकारा । धेनुदुग्धघृतेंकरीं । पोषणहोयदेवांचें ॥३४॥
गाईब्राह्मणवधावे । यज्ञादिकहोऊंनद्यावे । क्षीणसहजस्वभावें । देवहोतील अशक्त ॥३५॥
मगकरावादेवघात । निष्कंटकतेव्हांचिहोत । निघालेअसुरत्वरित । आज्ञावंदुनमस्तकी ॥३६॥
असोइकडेनंदाघरीं । पूर्वींचशेषजन्मकरी । तवपातलाश्रीहरी । पुत्रोत्सवनंदाते ॥३७॥
पुत्रझालाम्हणून । गोपिसांगतीनंदालागून । नंदेंबहुहर्षेंकरुन । द्रव्यभांडार उघडिलें ॥३८॥
पुत्राचेपाहिलेंमुख । चंद्रहीतेथेंअधोमुख । नंदाझालेंपरमसुख । जातकादिसर्वकेलें ॥३९॥
अपारवेचिलेंधन । याचकांवरीवर्षलाघन । जेथेंप्रगटेनारायण । उणेंकायमगतेथें ॥४०॥
पाचारिलागर्गमुनी । नंदेंतयातेपूजुनी । म्हणेप्रगटलेसुतदोनी । जातकवदेस्वामिया ॥४१॥
गर्गेकरुनिगणित । जातकतेव्हांवर्णित । आनंदलाह्रदयांत । विष्णुअंशजाणोनी ॥४२॥
मुनिह्मणेदोघेपुत्र । यांचेअपारचरित्र । धन्यभाग्यतुझेंगोत्र । पुत्र ऐसेप्रगटले ॥४३॥
वडिलपुत्राचेऐकवृत्त । अतिशयेंहाबलवंत । नामेंबलरामविख्यात । असुरनाशकरीलहा ॥४४॥
आकर्षणजहालेंगर्भांत । तेणेंसंकर्षणविख्यात । हलमुसलशस्त्रकरांत । धरीलम्हणोनीहलधरहा ॥४५॥
हाधाकुटातुझासुत । चरित्रयाचेअदभुत । वर्णावयाअशक्यहोत । किंचिततुजसांगतो ॥४६॥
कंसांदिकसकलदुष्ट । लीलामात्रेंकरीलनष्ट । पृथ्वीचेंसर्व अरिष्ट । दूरकरीलभारहा ॥४७॥
धर्माचेकरीलस्थापन । भक्ताचेकरीलपालन । होईलहाजगन्मोहन । नृपसर्ववंदिती ॥४८॥
सोळासहस्रपन्नास । आणीक आठस्त्रियायास । प्राप्तहोतीलबहुवस । संततिअपारजाणपा ॥४९॥
वसुदेवाचाहासुत । वासुदेवनामेंविख्यात । मनासर्वांचेआकर्षित । कृष्णनामयाकरितां ॥५०॥
असंख्यनामेंअपारगुण । विष्णुअवतारयासीजाण । शेषतोचिसंकर्षण । पूर्वपुण्येंलाधलासी ॥५१॥
एवंगर्गेकथिलें । नंदाचेंमनहर्षलें । दोघांपाळणांघातले । नामेंठेविलींउत्सवें ॥५२॥
नित्यउत्सवनंदाघरी । गोपीगातीसुस्वरी । गुप्तरुपेंस्वर्गनारी । नित्यगोकुळींराहतीत्या ॥५३॥
तवतीबालघातिनी । पूतनाआलीनंदसदनीं । अतिसुंदररुपकरोनी । प्रवेशलीराजवाडा ॥५४॥
स्तनांतरीविषठेविलें । वरीअतिमधुरबोले । पाहतांसर्वभुलले । रुपलावण्येंकरुनी ॥५५॥
आलीनीटयशोदेजवळी । म्हणेतूंभाग्याचिपुतळी । पुत्राप्रस उनीगोकुळीं । धन्यधन्यजाहलीस ॥५६॥
मनींधरोनियाआस । आलेंमीतवगृहास । पहावेंतुझेंपुत्रास । कडियेघ्यावेंम्हणोनी ॥५७॥
एवंमृदुवाक्येंकरुनी । यशोदेसीमोहुनी । कृष्णाघेतलेउचलोनी । कडियेखांदाखेळवी ॥५८॥
सवेंचिकरीचुंबन । प्रेमदाखवावरुन । म्हणेमनींतुजलागून । वधीआतांकंसारे ॥५९॥
यशोदेसीतेंनकळें । दूरगेलीकार्यबळें । अवसरपाहतांचिवेळे । पुतनासाधीस्वकार्य ॥६०॥
विषभरित आपुलास्तन । झडकरीमोकळाकरुन । कृष्णमुखींदेऊन । पान्हावलीविषपान्हा ॥६१॥
दोनीहस्तेंस्तनधरिला । कृष्णेंपिण्याआरंभकेला । क्षणनलागतांशोषिला । प्राणवायुतियेचा ॥६२॥
गात्रेंसर्वओढिलीं । तेव्हांदुष्टेशींव्यथाझाली । बाळाशीपरतांढकली । परीनसुटेतोचिकटला ॥६३॥
आक्रोशकरीराक्षसी । सोडीसोडीऐशावचनाशी । सत्यकरीतोह्रषीकेशी । सोडविलीभवबंधें ॥६४॥
मुखींधरिलास्तन । मानिलेतिजमातेसमान । पोंचविलीवैकुंठसदन । दयासागरेश्रीरंगें ॥६५॥
असोतीपूर्वरुपेंकरुन । पृथ्वीपडलीतरफडून । सवेचीसोडिलाप्राण । हातपायझाडूनिया ॥६६॥
कृष्णचिकटलासेस्तनी । हांसेखिदळेसुखानी । यशोदा आलीधाऊनी । घोरशब्द ऐकतां ॥६७॥
गोपगोपिसर्वमिळाले । प्रुतनापाहतांभ्याले । प्रेतजेव्हांओळखिले । स्वस्थजाहलेकिंचित् ॥६८॥
पाहिलाबाळतिचेंह्रदयीं । यशोदाधांवेउचलूनिघेई । प्रेमेंआलिंगूनीत्दृदयीं । रुदनकरीमायेनें ॥६९॥
पुत्रासीपाजिलेंस्तन । सवेंचिकरीलिंबलोण । म्हणेईश्वरेरक्षिलाप्राण । आजिमाझेंबाळाचा ॥७०॥
पूतनेचखिडेंकरुन । गोपेंकेलेंतिचेदहन । पुण्यकरीअपारधन । नंद आनंदेकरुनिया ॥७१॥
कांहींदिवसलोटत । तवशकटासुरयेत । बालभावेंमारुनीलाथ । कृष्णमारीदैत्याते ॥७२॥
सवेचितृणावर्त आला । अपारवायुतेव्हांसुटला । अंधकारबहुझाला । गोकुळांमाजीएकसरे ॥७३॥
दैत्येंकृष्णाउचलिले । उड उनीआकाशींनेले । अतिजडहोऊनीवहिले । कृष्णेंदैत्यदडपिला ॥७४॥
अतिभारेंभूमिपडला । असुरप्राणासिमुकला । नंदादिकांआनंदझाला । कृष्णमुखनिहाळिती ॥७५॥
कृष्णरामदोघेकुमर । रांगतीखेळतीसुकमार । गोपगोपीसुखसागर । पूर्वपुण्येंलाधलें ॥७६॥
कृष्ण अंगणींरांगत । मृतिकाघालीमुखांत । मुख उकलोनिमातापाहत । विश्वरुपदेखिलें ॥७७॥
एवंनानालीलाकरीत । दोघेंसर्वांसुखदेत । पांचवर्षांचेझालेसुत । गोपासवेंखेळती ॥७८॥
सवेंघेउनीगोपकुमार । वत्सेंचारीनंदकुमर । अनेकखेळमनोहर ॥७९॥
बकासुरपातलावनीं । बैसलामुखपसरोनी । कृष्णेंफाडिलाचोंचधरुनी । मुकलाप्राणातोटुष्ट ॥८०॥
अघासुरकृष्णेंमारिला । वत्सेंचारितांबत्सकाला । कृष्णेंखेळतांचिवधिला । धेनुकासुरतैसाची ॥८१॥
गोपबाळेंसवेंघेउनी । रात्रीजायगोपसदनीं । दहीदुग्धलोणीचोरुनी । स्वयेंखायखाऊंघाली ॥८२॥
नवनीतघेऊनहरी । स्वहस्तेमर्कटाचारी । गोपीयेतांपाहेदुरी । पळोनिजाईसत्वर ॥८३॥
गोपीयेऊनीगृहाशीं । कागाळीसांगतीमातेशी । कृष्णम्हणेखोटेंबोलशी । केव्हांआलोंघरांतुझ्या ॥८४॥
एवंअनेकचरित्र । करीकृष्णकोमलगात्र । मातामंथितादधिपवित्र । धरिलेयेऊनीखीते ॥८५॥
म्हणेमजदेईस्तनपान । यशोदादेईतयालागून । तवदुध उतलेंम्हणून । कृष्णाटाकूनीतीगेली ॥८६॥
कृष्णेंतेव्हांकायकेल । दधिभांडेफाडिलें । दहीताकसर्वसांडिलें । स्वयेंलोणीखातसे ॥८७॥
तवयशोदाबाहेर आली । दधिनाशेंतीकोपली । यष्टिघऊनीधांवली । पाहुनीपळालाकृष्णवेगें ॥८८॥
मागेंयशादाघांवे । परीकृष्णहातींनपवे । श्रमितपाहूनीसवें । गवसलादेवगुरु ॥८९॥
करुनियादीनवदन । कृष्णकरीरुदन । तीम्हणेतुजबंधन । करितेंआतांखोडकरा ॥९०॥
दावेंआणूनासत्वरी । उखळींबांधिलाहरी । आपणगेलीगृहांतरी । उखळासहकृष्णपळे ॥९१॥
नारदशापेंनलकूबर । यमल अर्जुनवृक्षथोर । मधूनजायदामोदर । ऊलूखल अडकलें ॥९२॥
कृष्णेंस्वबळेंकरुनी । वृक्षपाडिलेउपडोनी । दिव्यरुपतेहोऊनी । गेलेस्वर्लोकीनमूनिया ॥९३॥
धांवलेगोपशब्द ऐकून । कृष्णासीबांधिलेंपाहून । आश्चर्यकरितीसर्वजन । वृक्षकेवीतुटलेहो ॥९४॥
कृष्णासीसोडिलेंनंदें । उचलूनघेतलाआनंदें । यशोदाधांवलीखेदें । लिंबलोणकरीतसे ॥९५॥
त्रेपनश्लोकभागवत । श्रीकृष्णाचेचरित । प्राकृतेंअंबावर्णित । भक्तजनताराया ॥९६॥
चतुर्थस्कंदेअष्टमोध्यः समाप्त ॥८॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP