चतुर्थ स्कंध - अध्याय सातवा
श्री मत्स्वच्छंदानंदानी रचिलेल्या प्रसिद्ध देवी भागवतसाराचा मराठी अवतार म्हणजे प्रस्तुत ‘ श्री देवी विजय ‘ ग्रंथ होय.
श्रीगणेशायनमः । शाप आणिमायाबल । विष्णुअवताराचेंमूळ । निमित्तमात्रकेवळ । भारावतरणव्यासम्हणे ॥१॥
कायनवलतियेशीं । नाचवीविधिहरिसीं । नीटपाडिलागर्भवासीं । लोकप्रभूभगवान ॥२॥
विष्णुकरीरामावतार । देवझालेवानर । धन्यधन्यतेचिनर । जेसेवितीअंबेसी ॥३॥
जीचेभक्तीचालेशांश । तयाचाहीसूक्ष्म अंश । तयाचाहीसहस्रांश । मिळतांचीमुक्तकरी ॥४॥
ऐसीतीदयासागर । कोणनसेवापामर । भुवनेसीसकृदोच्चार । भुवनत्रयदेतसे ॥५॥
मांपाहीऐसेंह्मणतां । ऋणीहोयजगन्माता । कुळगोत्रमातापिता । तीचएकसर्वस्वें ॥६॥
विद्याविद्यरुपिणी । तिचएकभवानी । विद्यारुपेंमोक्षदानी । बंधनरुपाअविद्या ॥७॥
यमुनातीरींमधुवन । होतेंमधुदैत्याचेगहन । त्याचापुत्रनामेंलवण । राक्षसतेथेंवसतसे ॥८॥
गोद्विजातेपीडाकरी । विप्रगेलेअयोध्यापुरी । रामासिम्हणतीलवणमारी । दुःख आम्हांबहुअसे ॥९॥
मगरामाज्ञेकरुन । तयामारीशत्रुघ्न । मधुपुरीवसविलीतेण । राहिलातेथेंराज्यकरी ॥१०॥
पुष्कर अक्षपुत्रदोन । पदींस्थापीशत्रुघ्न । राम अवतारापासून । मथुराजाणजनमेजया ॥११॥
पुढेंबहुकालेंकरुन । सूर्यवंशझालाखंडन । यादवराहिलेयेऊन । शूरसेनराज्यकरी ॥१२॥
कश्यपतयाचेउदरीं । शापयोगेजन्मकरी । वसूदेवनामेनिर्धारी । गावृत्तीकरीशापयोगें ॥१३॥
राज्यकरीउग्रसेन । तयाचाकंसनंदन । अदितीदेवकीझालीजाण । कन्याशापेदेवकीची ॥१४॥
तीकन्यावसुदेवाशी । देवकदेईअतिहर्षी । वरापोंचविताघरांशीं । रथींसारथीकंस असे ॥१५॥
देवकीअसेकंसभगिनी । ह्मणोनीकंसहर्षमानी । स्वारीकाढिलीथाटानीं । जावयाचीकसानें ॥१६॥
तवझालीआकाशवाणी अष्टमदेवकीगर्भानी । कंसातुझीप्राणहानी । होईलजाणनिश्चयें ॥१७॥
ऐकतांचिकंसखवळे । केशधरोनीओढीबळें । खड्गकरोनीमोकळे । सिद्धझालाशिरच्छेदा ॥१८॥
लोकसर्वनिवारिती । खलनायकेभ्रांतमती । वसुदेवाचेसेनापती । कंसासवेंकरितीरण ॥१९॥
परीतोनायकेदुष्ट । पुत्रहोतांचिकरीनष्ट । देईनतुजनिश्चयें ॥२०॥
सत्य ऐकोनिकंस । सोडीतेंव्हांदेवकीस । वधुवरेपोंचवीघरास । कंस आलामाघारा ॥२१॥
कालेंकरुनदेवकीसी । पुत्रझालादशममासी । वसुदेवघेऊनतयाशी । कंसाघरींपातला ॥२२॥
उत्पन्नहोतांचिसुत । वसुदेवनेईत्वरित । पाहूनिलोकस्तवीत । धन्यसत्याह्मणतीते ॥२३॥
कंसपाहुनिबाळ । झालातोहीदयाळ । वसुदेवसत्त्याचेंफळ । दयाउपजेखलाशी ॥२४॥
धन्यह्मणेवसुदेवा । बाळसुखेंसांभाळावा । मजदीजेजीआठवा । शत्रुमाझातेवढाची ॥२५॥
ऐकतांतयाचेंवचन । वसुदेवबाळाघेऊन । देवकीसदेघरांयेऊन । संतोषलीदोघेही ॥२६॥
तवनारदयेऊनकंसाशी । ह्मणेराजनीतिनजाणशी । लोमविलोमसंख्येशी । सर्व आठवेपुत्रक ॥२७॥
नजाणसीदेवमाया । टपलेतेतुजमाराया । अंशेंअवतारकरुनिया । घाततुझावांछिती ॥२८॥
नंदांदिसर्वयादव । अंशेंअवतरलेदेव । विश्वासयांचानठेव । कदांकाळींकंसातू ॥२९॥
एवंलाऊनीकळी । नारदगेलातपोबळी । उपदेशहोतांतात्काळी । मगकायविचारावें ॥३०॥
आधींचसर्पकोपला । इतक्यांतपुच्छिताडिला । किंवाघराअग्नीलागला । घृतओतिलेंतयांमाजी ॥३१॥
आधींचनयेपोहणें । वरीकंठीदगडबांधणें । समुद्रांमाजीटाकणें । तेवीझालेंकंसासी ॥३२॥
तत्काळतेणेंजाऊन । बाळघेतलाहिरुन । शिळेवरीआपटून । दुष्टकरीबाळहत्या ॥३३॥
कारागारींदोघांसीं । बंदीघातिलेवेगेशीं । स्वयेंरक्षीअहर्निशी । रक्षकठेविलेबहुत ॥३४॥
उपजतांचिबालकाशी । आपटूनघेईप्राणाशी । सहाबाळेंअतिसाहसी । वधिताझालाकंसतो ॥३५॥
ऐकूनिपुसेभूप । बाळांचेंकाय असेंपाप । नारदेंहेंमहापाप । केवींकरविलेंबळेंची ॥३६॥
पापकर्ताकरविता । समभागीशास्त्रपाहता । नारदेंजाणुनीतत्वता । केवीकेलेंपातक ॥३७॥
व्यासह्मणेंनृपासीं । पापकैंचेनारदासी । असत्यनाहींवाचेसी । देवकाजींतत्पर ॥३८॥
कलह आवडेतयाशी । कळीलाऊनबहुवशी । जीवमुक्ततोसुखेशी । कौतुकपाहेंसर्वदा ॥३९॥
बाळांचेंऐकवृत्त । मरीचीचेसहासुत । उर्णाभार्येपासूनहोत । धर्मविचक्षणचतुरते ॥४०॥
काममोहेंकन्येपाठीं । ब्रम्हाधांवेभोगासाठीं । पाहूनीहंसतींहिंपुटी । सहाजणतेधवा ॥४१॥
क्रोधेंविधीशापित । उत्पन्नव्हादैत्यकुळांत । झालेहिरण्यकशिपवशांत । कालनेमीपुत्रते ॥४२॥
पूर्वजन्मीचेअसेंभान । तैकेलाधाताप्रसन्न । इच्छितघेऊनीवरदान । घरांआलेबलिष्टते ॥४३॥
हिरण्यकशिपुकोपला । म्हणेतुम्हींटाकिलेंमला । शरणगेलारंचिला । टाकिलेंमीहीतुम्हांशीं ॥४४॥
जावेंआतांपाताळांशीं । बहुवर्षेंकरानिद्रेशी । वर्षींवर्षींगर्भांशीं । प्राप्तव्हावेंदेवकीच्या ॥४५॥
कालनेमीतुमचापिता । कंसहोऊनीतत्वता । ममशापेंतुम्हींजन्मता । सवेंचीतुम्हांवधील ॥४६॥
शापयोगबाळांसी । मृत्युजाहलासहाजणासीं । अंशेकरुनगर्भासी । फणीश्वरपातला ॥४७॥
योगमायेकरुन । देवीओढीबळान । रोहिणीउदरीनेऊन । गर्भठेविलाअंबेने ॥४८॥
गर्भाचेकेलेंकर्षण । तेणेंनामसंकर्षण । पंचममासोंगर्भपतन । ऐकूनकंससंतोषला ॥४९॥
देवकार्याथमुरारी । शापयोगेंआलाउदरी । कंसजपेपरोपरी । वैरीहाचिम्हणूनिया ॥५०॥
देवांशतैसेराक्षसांश । कोणकोणपुसेनरेश । व्याससांगेतयास । श्रोतींसादर ऐकावे ॥५१॥
कश्यपांशवसुदेव । देवकीअदितिसंभव । शेषतोचिबलदेव । नारायणकृष्णतो ॥५२॥
धर्मापासावयुधिष्ठिर । वायुअंशवृकोदर । इंद्र आणिनर । अंशद्वयेंकिरीटी ॥५३॥
अश्विनीकुमारापासून । नकुलसहदेवदोघेजण । सूर्यांशझालावीरकर्ण । धर्म अंशेंविदुरझाला ॥५४॥
बृहस्पतीगुरुद्रोण । यमरुद्रकाम क्रोधजाण । अश्वत्थामाचौघांपासून । समुद्रझालाशंतनू ॥५५॥
गंगाभार्यातेणेंगुणें । महाभिषहीअंशपणें । उभयात्मकशंतनूजाणें । वसुअंशभीष्मतो ॥५६॥
देवकतोगंधर्वराट । मरुदगणांशविराट । हंसदैत्यधृतराष्ट्र । अरिष्ठपुत्रजाहला ॥५७॥
मरुदगणाचेपुन्हादोन । कृतवर्माकृपब्राम्हण । कलियुगतोदुर्योधन । द्वापरशकूनीजाणपा ॥५८॥
बुधांशदोनयादव । सुवर्चाआणिप्ररुदेव । वरुणझालाद्रुपदराव । सनत्कुमारप्रद्युन्न ॥५९॥
धृष्टद्युम्नतोहुतांश । द्रौपदीतीरमांश । शिखंडीतोराक्षस । भीष्मवधाकारणें ॥६०॥
द्रौपदीचेपांचसुत । विश्वदेवसंभवत । सिद्धिअंशेंकुंतीहोत । धृतीजाणमाद्रीशी ॥६१॥
मतिअंशेगांधारी । कृष्णस्त्रियादेवनारी । राजेसर्व अंशधारी । राक्षसांश इंद्रमतें ॥६२॥
प्रल्हादपिताशिशुपाल । प्रल्हादतोचिजाहलाशल्य । विप्रचित्तीदैत्यप्रबल । जरासंधजाहला ॥६३॥
कालनेमीकंसजाण । केशीहयशिरादारुण । अरिष्टजोबलिनंदन । ककुद्मीमारिलागोकुळीं ॥६४॥
अनुर्हाददैत्यखल । धृष्टकेतुनृपप्रबळ । भगदत्ततोबाष्कळ । लंबजाणिजोप्रलंबा ॥६५॥
धेनुकझालासेखर । वाराह आणिकिशोर । तेचिमुष्टिकचाणूर । बलिकन्यापूतना ॥६६॥
अरिष्टजोदितिसुत । कुवलयगज उन्मत । बलीचाजोसुत । बकासुरतोचिपै ॥६७॥
नर आणि नारायण । दोघेंअसूनीविद्यमान । कलांशेंतेकृष्णार्जून । जाहलेभारहराया ॥६८॥
विधीजैंप्रार्थीहरि । दोनकेशदेतमुरारी । शुभ्रशेषकृष्णहरी । अंशदोघेंविष्णूचे ॥६९॥
हेंअंशाचेअवतरण । करीतीजेपठणश्रवण । सर्वपापाचेनाशन । होयसुखसंसारीं ॥७०॥
पाचऊनदोनशत । कृष्णावतारचरित । अंशावतरणसांगत । प्राकृतयेथेंपरांबा ॥७१॥
देवीविजयेचतुर्थेसप्तमः ॥७॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP