चतुर्थ स्कंध - अध्याय चवथा

श्री मत्स्वच्छंदानंदानी रचिलेल्या प्रसिद्ध देवी भागवतसाराचा मराठी अवतार म्हणजे प्रस्तुत ‘ श्री देवी विजय ‘ ग्रंथ होय.


श्रीगणेशायनमः । प्रल्हादबैसलनृपासनी । देवाशींपीडिद्वेषानीं । युद्धकरितीक्रोधानी । शतवर्षेंपर्यंत ॥१॥

देवांचाझालाजय । पदींस्थापूनिस्वतनय । स्वयेंसेविलाहिमालय । प्रल्हादतप आचरे ॥२॥

राजाझालाविरोचन । संग्रामकरीदारुण । देवींजिंकिलातयालागून । विष्णुबलेंकरुनिया ॥३॥

राज्यभ्रष्टदैत्यजाहले । शुक्राचार्याशरणगेले । आश्रयेंमगनिर्भयझाले । आश्वासिलेंगुरुनी ॥४॥

देवीऐकिलेंवृत्त । विष्णुसहयुद्धासियेत । शुक्रासीतेथेंदेखत । सुरसर्वपरतले ॥५॥

शुक्रम्हणेअसुरांप्रती । तुम्हांमारितोरमापती । तादृशमंत्रसंपत्ती । नसेबळमजसत्य ॥६॥

मीजाऊनशिवापाशीं । आणितोंआतांविद्येशी । मगतीदेईनतुह्मांशी । नचलमगविष्णुचे ॥७॥

तोंवरीकीजेसामदान । स्वस्थ असावेंमार्गलक्षून । एवंतयासीसंबोधून । काव्यगेंलाकैलासां ॥८॥

दैत्येंआणिलेप्रल्हादासी । तोसामकरीदेवासी । म्हणेन्यस्तशस्त्रदैत्याशीं । मारणेंहेंअनुचित ॥९॥

तपकरितीहेसांप्रत । धरिलेंयाणींसाधुवृत्त । ऐकूनीऐसीमात । वैरटाकिलेंदेवानी ॥१०॥

कश्यपाश्रमींदैत्यराहिले । इकडेशुक्रेंकायकेले । येऊनीशंकरानामिले । विनयपूर्वबोलिला ॥११॥

मंत्रविद्यामजद्यावी । जीदेवासीपराभवी । मनींशंभूऐसेभावी । देवरक्षणम्याकीज ॥१२॥

कठिणसांगावसाधन । जेणेंजाईलपरतोन । ऐसेंमनीविचारुन । देवदेवबोलिला ॥१३॥

पायवरीखालीशिर । करुनीपिशीलकणधूर । पूर्णसहस्त्रवत्सर । तरीचपावसीमंत्राते ॥१४॥

नमस्कारुनीशिवाशी । शुक्र आचरीतपाशी । सदाराहेशांतमानसीं । देवावृत्ततेंकळलें ॥१५॥

दैत्यांचेदंभजाणिले । शस्त्रपाणीधाविन्नल । पाहुनीदैत्यभयपावले । म्हणतीदेवांतयेवेळां ॥१६॥

न्यस्तशस्त्र आम्हांसी । वचनेंदेऊनीविश्वासी । पातलाकेवीवधासी । सत्यत्यागिलेंकिमर्थ ॥१७॥

देवम्हणतितुम्हींकपटी । शुक्राचेरिघालापाठा । गुरुमंत्रविद्येसाठीं । प्रेरिलाकीछळानें ॥१८॥

शत्रूचेंछिद्रपाहून । मारणेंधर्मसनातन । युद्धकीजेसावधान । जीवेंमारुंतुह्मांशी ॥१९॥

ऐकुनीदेवाचेंवचन । दैत्यकरितीपलायन । काव्यमातेसिआलेशरण । अभयदिधलेंतियनें ॥२०॥

देवपाठींचधांवती बलाबलकांहींनपाहती । जाऊनदैत्याशींमारिती । आश्रमांमाजीसवेग ॥२१॥

शुक्रमाताकरीवारण । परीनायकतीदेवगण । तेव्हांतियेनेंकोपून । निद्रासवेगप्रेरिली ॥२२॥

निद्राभरेंदेवगण । पडलेमूकहोऊन । निद्रित इंद्रापाहून । तयाविष्णुपाचारी ॥२३॥

म्हणेशक्राममशरीरीं । वेगेंआतांप्रवेशकरी । प्रवेशलाइंद्र अंतरीं । सावधजाहलासवेग ॥२४॥

दोघांसावधपाहून । भ्रुगुपत्नीबोलेवचन । तुम्हांदोघाभक्षीन । तपोबळेंआतांची ॥२५॥

तिनेंआपुलेयोगबले । इंद्राविष्णूस्तब्धकेलें । पाहूनसर्वाआश्चर्यगमलें । तप अपारवर्णिती ॥२६॥

इंद्राम्हणेनारायणा । इचीनकरीकरुणा । घातकीजेसत्वरप्राणा । नातरीगिळीलदोघांसी ॥२७॥

इंद्रवाक्य ऐकून । स्मरेविष्णुसुदर्शन । दयाकृष्णेंटाकून । कंठछेदिलातियेचा ॥२८॥

देवझालेसावधान । जयम्हणतीमधुसूदन । परीदोघेझालोंखिन्न । स्त्रीवधेंइंद्रविष्णू ॥२९॥

स्वस्त्रीवधपाहून । कोपलाभ्रुगुभगवान । म्हणेदुष्टतूंमधुसूदन । अकृत्यकेवींआचरिलें ॥३०॥

विप्रस्त्रीवधविचार । बरवानसेमानसांतर । तोतूंप्रत्यक्षसंहार । शक्रार्थ आजीकेलासी ॥३१॥

तुजम्हणतीसत्वगुणी । तोकेवीतमोगुणी । शापघेईममवाणी । जन्मांतरेंभोगिसी ॥३२॥

कीटादिकदुष्टयोनीं । पावसीलसत्य अवनी गर्भवासादियातनीं । ममशापेंबहुसाल ॥३३॥

ऐसेंभ्रुगुबोलिला । सवेंचीउठवीस्त्रियेला । पाहूनित्याच्यातपोबला । आश्चर्यकरितीसर्वही ॥३४॥

धडाजोडिलेंशिरकमळ । हातींघेऊनियाजल । म्हणेसमग्रधर्मानिर्मळ । जरीजाणतोआचरितो ॥३५॥

सत्यशौचसर्ववेद । जरीह्रदईंवसोनिर्वेद । सत्येंतयाचाअखेद । सजीवहोईप्रियेतूं ॥३६॥

एववाक्यवदोन । जलकेलेंसिंचन । तत्काळझालीसचेतन । निद्रितजेवीजागतसे ॥३७॥

कृष्णम्हणेशापेकरुन । अवतरेहानारायण । असोइंद्रंविचारकरुन । कायकेलेंऐकावें ॥३८॥

शुक्रासीहोतांसिद्धमंत्र । दैत्यहोतीलस्वतंत्र । एकांतीकरुनियामंत्र । स्वकन्येसीबोलावी ॥३९॥

इंद्रम्हणेजयंती तुजदीधलेशुक्राप्रती । सेऊनीप्रेमेंसत्पती । देवकार्यकरावें ॥४०॥

आज्ञाम्हणूनीनिघाली । तपस्थळींपातली । सेवाकरीबहुकाळी । पातिव्रत्येंतिष्ठतसे ॥४१॥

ऋषीकरीधूम्रपान । अंगिस्वेदहोय उत्पन्न । जयंतीकदलीदलघेऊन । पालवीतमदुहस्ते ॥४२॥

सुवासितस्वच्छसीतल । प्राशनार्थठेवीजल । पक्वरसिकमधुरफल । भक्षणार्थठेवीतसे ॥४३॥

कोमलदर्भकुसुमेंआणी । शय्यारचीपल्लवानीं । हळूंहळूंवाराव्यंजनी । समयोचितकरीतसे ॥४४॥

इंद्रठेवींगुप्तदुत । शुक्राचेपाहेवृत्त । सहस्त्रवर्षींउमांकांत । वरदेततयासी ॥४५॥

जेंगुप्त अवाच्यवृत्त । त्रैलोक्यांमाजीवर्तत । पाहसीलतेंसमस्त । माझेंकृपेउशनातूं ॥४६॥

अवध्यहोयसर्वांभूतीं । सर्व प्रजेचाहोसीलपती । एवंवदोनीगौरीपती । अंतर्धानजाहला ॥४७॥

तपजेव्हांपूर्णझालें । जयंतीसविचारिले । तूंकोणकांश्रमकेले । इच्छिलेंमागदेईन ॥४८॥

जयंतीह्मणेह्रदगत । जाणसीमाझेमनोगत । तथापितोसांगह्मणत । शुक्राचार्यातियेशी ॥४९॥

तीम्हणेमीइंद्रकुमरी । जयंतीनामेंअवधारी । पितासमर्पींस्वामीकरी । स्वधर्मेंरमूंइच्छितें ॥५०॥

भार्गवह्मणोतियेशीं । दशवर्षेंरमेमजसी । अलक्ष्यदोघेभूतमात्राशी । धर्मपत्नीकरीन ॥५१॥

व्यासह्मणेनृपवरा । तिजसह आलाघरां । पाणीग्रहणकरुनीत्वरा । रमलातिशींअलक्ष्य ॥५२॥

गुरुआलाऐकून । दैत्य आलेधांऊन । परीशुक्रानपाहून उदासझालेसर्वही ॥५३॥

पाहुनीयाअवसर । गुरुसम्हणेपुरंदर । कांहींयुक्तीकरुनसाचार । दैत्यठकवीबृहस्पते ॥५४॥

शुक्ररुपेंगीष्पती । पाचारीतदानवांप्रती । तेसर्वयेऊनीनमिती । प्रत्यक्षदिसभार्गव ॥५५॥

गुरुमायातेनेणती । जवळीबैसलेबहुप्रीती । कुशलसर्वहीपुसती । श्रमलेफारगुरुवर्या ॥५६॥

निर्भयझालेदानव । गुरुमायाअभिनव । ह्मणेप्रसन्नकरुनीमहादेव । मंत्रविद्यालाधलो ॥५७॥

तेंतत्वविद्यागुज । तुम्हांउपदेशीनचोज । पूर्णझालेंतुमचेकाज । भयकायदेवाचे ॥५८॥

ऐकतांऐसेंवचन । व्यासापुसेपरीक्षितनंदन । एवंतयासीछळून । देवगुरुकायकरी ॥५९॥

सर्वविद्येचासागर । नमितीज्यासिसर्वसुर । तोहीकरीकपटाचार । धर्मनिर्णयकर्ताजो ॥६०॥

सत्याचेंकरितांसेवन । तयाहोयब्रह्मज्ञान । वाक्पतीजरीअनतवचन । कोणहोयसत्यवक्ता ॥६१॥

सर्वजंतूचिकायगती । कोठेंधर्माचीस्थिती । कोठेंकीजेप्रतीती । मान्यवाक्यकोणाचे ॥६२॥

हरिब्रह्माशचीकांत । कामक्रोधेंसंतप्त । छलकर्मींसर्वरत । देवमुनीसर्वही ॥६३॥

व्यासह्मणेनृपासी । पुनःपुनःतेंचपुससी । कामनाडिलेंसर्वांशीं । ब्रह्माविष्णुशिवादिका ॥६४॥

पंचवीसापासून । सर्वझालेनिर्माण । आयुष्यांतीसर्वमरण । पावतीअवश्यभूपते ॥६५॥

ब्रम्हाहोतानिद्रित । नासतेहेंसर्वजगत । पुनःहोताजागृत । रचिमागुतेनित्यतो ॥६६॥

शतवर्षींत्याचाक्षय । कोणीनाहींअक्षय्य । कोणीनाहींअव्यय । देहधारीदेखिला ॥६७॥

दुर्लभतेमुक्तसंग । षडरिपुचाकेलाभंग । आनंदेंडुल्लेअभंग । धन्यतोचिसंसारी ॥६८॥

अंबदयेवांचून । निःसंगहोयकोण । तिचेकरितांआराधन । सुखसोपानसुखाचे ॥६९॥

असोदैत्यादेऊनीविश्वास । गुरुबोधीतसेत्यांस । ह्मणेअहिंसामुख्यधर्मास । जाणातुह्मीनिश्चयें ॥७०॥

जैनधर्मातेउपदेशी । स्वयेंकरीयज्ञनिंद्येशी । वंचिलेंतेणेंदैत्याशी । दहावषपर्यंत ॥७१॥

शुक्रम्हणेभार्येशीं । दहावर्षेंझालीरतीशी । जाणेआतांयाज्यापाशीं । पुनःयेईनम्हणेतो ॥७२॥

तिचानिरोपघेऊन । येऊनपाहेभ्रुगुनंदन । आपलेंरुपघेऊन । बृहस्पतीबैसला ॥७३॥

मानसीतोआश्चर्यकरी । पाहुनिकपटकूसरी । शुक्रदैत्यासिपाचारी । म्हणेमीआचार्यतुमचा ॥७४॥

हाअसेवाचस्पती । ममरुपेंतुम्हांप्रती । ठकवितोहाकपटमती । सोडातयासीशुक्रसांगे ॥७५॥

गुरुम्हणेहाचिगुरु । शैलूषममरुपधारु । विश्वासत्याचानकाकरुं । छलकरायापातला ॥७६॥

गुरुमायेनेंमोहित । दैवत्यांचेविपरीत । हाचिगुरुनिश्चित । काव्याम्हणतीतूंकपटी ॥७७॥

दहावर्षापासून । आम्हांशिकवीतसेज्ञान । तूंकोणगुरुरुपान । पातलासीम्हणतीते ॥७८॥

वाक्य ऐकतांकठीण । काव्येंशापिलेदैत्यगण । पराभवालनिश्चयान । पावालफलसत्वरी ॥७९॥

काव्यगेलानिघून । दैत्यशापदग्धजाणून । स्वयेंगेलानिघून । इंद्रापासीबृहस्पती ॥८०॥

म्हणेपुरंदराकार्यझालें । शुंक्रतयांशींशापिले । मीहीतयांत्यागिलें । झालेदैत्यनिराधार ॥८१॥

ऐकूनगुरुचेंवचन । इंद्रेंगुरुसीपुजून । शस्त्रास्त्रेंसिद्धहोऊन । दैत्यावरीचालले ॥८२॥

अठठावीसश्लोकदोनशत । शुक्रबृहहस्पतींद्रचरित । भ्रुगुशापविष्णूसीदेत । वर्णनतेचियांत असें ॥८३॥

देवीविजयेचतुर्थस्कंदेचतुर्थोध्यायः ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP