चतुर्थ स्कंध - अध्याय नववा
श्री मत्स्वच्छंदानंदानी रचिलेल्या प्रसिद्ध देवी भागवतसाराचा मराठी अवतार म्हणजे प्रस्तुत ‘ श्री देवी विजय ‘ ग्रंथ होय.
श्रीसरस्वत्यैनमः । गोवत्सगोपबाळसहित । कृष्णखेळेवनांत । शिधोर्याकाढोनीबैसत । मंडलाकारभोजना ॥१॥
मध्येंबैसलेकृष्णगौर । शिधोरीदेतीपरस्पर । भातभाकरीउसळीमधुर । दहीलोणीलोणची ॥२॥
आनंदेंकरितीभोजन । मायावेशेंजनार्दन । ब्रह्मदेवेंतयापाहून । विचारीतमानसीं ॥३॥
प्रार्थिलामीनारायण । तोचिअसेकीहाकृष्ण । करावेंयाचेपरीक्षण । म्हणोनिविंदाण आरंभिलें ॥४॥
वत्सेंसर्वगुप्तकेलीं । स्वर्लोकीनेऊनठेवलीं । मुलेंम्हणतींदूरगेलीं । वत्सेंकृष्णाआणिवेगें ॥५॥
तुझीआजपाळीअसे । बैसलासकेवीआळसें । ऐकुनिकृष्णजातसे । रामसहितशोधाया ॥६॥
हाकामारितीवत्सांसीं । गूराख्यापरीशब्दसरसी । काळयागोर्यातांबडयासी । धोर्यामोत्यादीनवाणें ॥७॥
परीवत्सेंकोठेंनदिसतीं । दोघेआलेमागुती । तवबाळासीहीनदेखती । दोघावांचूनकोणीनसे ॥८॥
कृष्णेंचरित्रपाहून । विचारेंकळलीखूण । विधिचरित्रजाणून । चरित्रदाखवींआपुलें ॥९॥
जैशीमुलेंतैशींवासुरें । जेवींवस्त्रेतेवीअलंकारें । काठयादावींस्वभावादिसारे । स्वयेंनटलापरमात्मा ॥१०॥
सायंकाळींआलेघरीं । वत्सेंमुलेंनित्यापरी । नेणतीकोणीनरनारी । संकर्षणमात्रजाणें ॥११॥
एवंएकवर्षझाले । नाहीकोणीओळखिलें । रंचिनेंजेव्हांपाहिलें । जाणिलेंतेव्हांतत्वता ॥१२॥
कृष्णाचेचरणावरी । ब्रह्मायेऊननमस्कारी । म्हणेअपराधक्षमाकरी । मोहिलोंतुझ्यामायेनें ॥१३॥
वत्सेंमुलेंसमर्पूनी । श्रीकृष्णाज्ञाघेऊनी । विधीगेलानिजसदनीं । कृष्णबैसलापूर्ववत ॥१४॥
वत्सासहकृष्ण आला । मुलांऐसाभासझाला । क्षणएकवेळगेला । जाणतीमायानेणती ॥१५॥
ऐसेंचएकदांयमुनातीरीं । चेंडूफळीखेळतीसारी । डावआलाकृष्णावरी । पडिलाचेंडूयमुनेंत ॥१६॥
मुलेंकृष्णासीम्हणतीं । चेंडूआणमागुती । डावआलातुजवरती । फेकूनीचेंडूसुटेना ॥१७॥
निमित्तकरीतोभाषण । कदबीचढलाकृष्ण । करावेंकालियमर्दन । मनींविचारीतेधवा ॥१८॥
कटीकसिलापीतांबर । दंडठोकुनीसत्वर । उडीटाकीनंदकुमार । डोहांमाजीयमुनेच्या ॥१९॥
शिरलासपचिंघरीं । लाथहाणिलीपुच्छावरी । उसळोनीआलाकृष्णावरी । शतफणीचानागतो ॥२०॥
जयाचेसविषफूत्कार । सदाकढतासेंयमुनानीर । गगनींउडतांपक्षीअपार । पडतीजळोनीविषयोगें ॥२१॥
ऐसातोमहाविखार । कृष्णासिडंखीबहुवार । परीतोप्रभूसर्वेश्वर । विषबाधातयाकैची ॥२२॥
कृष्णेंतांडवरचिलें । फणीवरीनृत्यआरंभिलें । जेंजेंशिरउंचकेलें । स्वपदेंताडीनंदपुत्र ॥२३॥
पायींगर्जतीतोडर । पायपडेतालावर । तालधरितीस्वर्गींसुर । दाटीझालीविमानाची ॥२४॥
सतालनृत्याचाभर । काळियासबसेबहुमार । जीफणीउचलीवर । पदघातचूकेना ॥२५॥
एवंएकमुहूर्त । नृत्यकरीभगवंत । विव्हळसर्पअत्यंत । प्राणांतसमयपातला ॥२६॥
सर्पस्त्रियांनीस्तवन । केलेकृष्णाचेभक्तीन । तेव्हांहोऊनीप्रसंन । कृष्णसोडीसर्पाते ॥२७॥
तोसर्पकृष्णाज्ञेकरुन । गेलारमणद्वीपालागुन । शुद्धझालेसंपूर्ण । उदकतेव्हांयमुनेचे ॥२८॥
इकडेकृष्णबुडालाम्हणून । गोकुळीकळलेंवर्तमान । नंदादिगोपगोपीजन । धांवतीतेव्हांआक्रोशे ॥२९॥
यशोदादिगोपरिडती । गोपसर्वआक्रोशती । हाहाम्हणोनीपीटिती । ऊरमस्तकेंगोपिका ॥३०॥
गाईवासरेहंबरती । डोळांतयांच्याअश्रुवाहती । पक्षुपक्षीआहाळती । शोकसमुद्रउंचबळला ॥३१॥
ऐसेंजाणूनीहरी । स्वयेंनिघालाबाहेरी । यशोदेनेंधरिलाउरी । आलिंगिलानंदानें ॥३२॥
रोहिणीप्रभृतिगोपीजनीं । कृष्णचुंबिलाप्रेमानी । आनंदेंआलेस्वभुवनीं । कृष्णरामासमवेत ॥३३॥
गोपकन्यायमुनातिरी । कात्यायनीसीनिर्धारी । पूजितीत्यापरोपरी । पतीइच्छूनकृष्णाते ॥३४॥
परीक्षाथएकेदिवसा । कृष्णपातलायमुनेशीं । वस्त्रेंठेवूनतीराशीं । स्नानेंकरितीतरुणीत्या ॥३५॥
वस्त्रेंघेऊनीझडकरी । कृष्णचढलाकदंबावरी । पाहूनीलाजल्याभारी । जळाबाहेरनयेती ॥३६॥
माघमासअतिसीत । गोपीझाल्याकपित । म्हणतीकृष्णात्वरित । वस्त्रेंदेईआमुची ॥३७॥
कायकरिशीआमुचीथट्टा । लाविशींकुळाशीबट्टा । परनारीचियावाटा । केविजाशीलबाडा ॥३८॥
सांगूंआम्हींनंदाशी । शिक्षाहोईलतेव्हांतुजसी । देईसत्वरवस्राशी । पुरेआतांखोडीही ॥३९॥
कृष्णम्हणेकरितांव्रत । नग्नहोऊनीयमुनेंत । स्नानकरीतांदोषबहुत । व्रतसिध्धीनसेची ॥४०॥
तुम्हांसांगावयाहित । पातलोंमीत्वरित । करातुम्हींप्रायश्चित । सांगतोतैसेंनिश्चयें ॥४१॥
उदकाबाहेरयेऊनी । मुखसूर्याकडेकरुनी । दोनीहस्तमाथाजोडोनी । प्रार्थनाकरामित्राची ॥४२॥
वस्त्रेंदेईनऐसेंकरितां । नदेईमीभयदाखवितां । लाजसोडूननमस्कारितां । व्रतसिध्धीहोईल ॥४३॥
मधुरबोलऐकूनी । तन्मयझाल्यातेक्षणी । तैसेंचमगआचरोनी । वस्त्रेंनेसूनघरांगेल्या ॥४४॥
अनेकलीलागोकुळी । करीस्वयेंवनमाळी । मधुरवाजवीमुरली । मधुरवेषनटतसे ॥४५॥
मोरकुमुटमाथांविलसे । भाळीमृगमदतिलकदिसे । भोंवतेंचंदनरचिलेंसे । चित्रविचित्रबिंदूनीं ॥४६॥
डोळांभरलेंकाजळ । नाकींलोंबेमुक्ताफळ । दोहीकानींसोज्वळ । मणिकुंडलेंपतिपुष्पें ॥४७॥
वाकडेदिसतींकेशकुरळ । फाकडयाभ्रुकुटीतेजाळ । मुरलीचुंबीमुखकमळ । उभयकरीस्थिरावली ॥४८॥
कंठीडुलेवनमाळा । नानापुष्पेंतुळसीदळा । कृष्णाह्रदयाचालाभझाला । प्रफुल्लितशोभती ॥४९॥
आणीकहीआभूषणें । गुंजामणीज्याचेंलेणें । तयापुढेंलाजिरवाणें । महामणीरत्नादिक ॥५०॥
आंगरखाचढविलातंग । वरीदुपट्टारुळेसुरंग । आंतूनदिसेंसर्वअंग । शुद्धशामलकोंमलतें ॥५१॥
कटिकसलापीतांबर । वरीपायजमासुंदर । वरीकाच्यामनोहर । रक्तरंगकसियेला ॥५२॥
पाईवाळेसुंदर । घागर्यावाजतीमनोहर । कुंजवनींशामसुंदर । मनमोहनविहारी ॥५३॥
जोत्रैलोक्याचाकर्ता । पाताआणिसंहर्ता । षडगुणैश्वर्यभोक्ता । परमात्माजोनिरिच्छ ॥५४॥
ऐसाअसोनिभगवंत । योगमायेनेंकेलावेष्टित । शरत्फुल्लरात्रीदेखत । रमणोत्सुकमनझालें ॥५५॥
आश्वीनशुक्लपौर्णिमेशी । स्वच्छपूर्णदेखिलाशशी । प्रफूल्लीतदेखूनिवशानी । मदन अंगींसंचरला ॥५६॥
मनेंइच्छिलाविहार । मुरलीफुंकीमनोहर । जेवीगारुडीसुस्वर । पुंगीखेंसर्पमोही ॥५७॥
तेंवीगोपीसर्वतरुणी । मोहिल्याकृष्णेंनागिणी । सर्वमांत्रिकशिरोमणी । नवलकायमोहिता ॥५८॥
खपडतांचकानीं । स्वगृहींअसतांकामिनी । निःशंकचाललीउठोनीं । टाकूनीकर्महातींचे ॥५९॥
स्वपतीशीं वाढितांकोणी झांकापाककरितांसाजणी । पतिसवेंरमतातरुणी । उठोनीगेलीसवेग ॥६०॥
एवंसर्वनिघूनजाती । परीघरच्यासोनकळेकृती । मोहिलीसर्वांचीवृत्ती । मुरलीखेंतयाच्या ॥६१॥
एक्यास्वरोभिंनभिंन । सर्वांटाकिलेमोहून । तरुणींचेंकेलेंआकर्षण । मदनपाशेंकरुनिया ॥६२॥
तरुणपुरुषानिज आली । वृद्धांचीवृत्तीरंगली । मुलेंसर्वस्वस्थनिजलीं । मोहनास्त्रपसरलें ॥६३॥
एवंगोपीकुंजवनीं । पातल्यावेगेंचहूंकडोनी । कृष्णतयांशींपाहूनीं । कायबोलेतेंऐका ॥६४॥
मीआपलेंसंतोषें । मुरलीयेथेंवाजवीतसे । तुम्हींगृहसोडूनिकैसें । रात्रीकिमर्थपातला ॥६५॥
एकांतीमीपरपुरुष । तेथेंजाणेंमहादोष । स्वपतीटाकोनीविशेष । अन्यदृष्टिकरुंनये ॥६६॥
लळालुलावापांगुळा । मुर्खशाहणाथवाखुळा । सुरुपकुरुपआंधळा । मुकाबधिरनपूंसक ॥६७॥
दरिद्रीअथवाधनवंत । बळीअथवाअशक्त । परीपतीमुख्यदैवत । स्त्रियांसीजाणानिश्चयें ॥६८॥
लाजकुळाचीसोडुनी । आल्यातमर्यादातोडुनी । जावेगेंपरतोनी । घरांआपल्यागोपीनो ॥६९॥
वज्रसमवाक्य ऐकून । गोपीझाल्यादुःखमग्न । करुंलागल्यास्वयेंरुदन । पदांगुष्टेंखणितींभू ॥७०॥
ह्मणतींकृष्णामोहूनीमन । आतांसांगसीब्रह्मज्ञान । त्यागकरितांसत्यजाण । प्राणत्यागूंसर्वही ॥७१॥
निश्चयतयांचापाहुनी । कृष्णबोलिलाहांसोनी । चिंतानकरावीमनीं । पुरवीनमनोरथ ॥७२॥
षण्मासाचीकेलीरजनी । राधादिसर्वगोपीजनीं । रम्यमृदुयमुनापुलिनी । क्रीडाकरीरमेश ॥७३॥
हावभावनानाकळा । मानप्रीतीविरहडोळा । रुसणेंकपटहास्यलीला । नानाकृतीशृंगार ॥७४॥
रासरचनानृत्यगीत । चित्रभाषात्वराउचित । अनेकरसाउपजवीत । मदनपितास्वयेंतो ॥७५॥
ग्रंथहोईलविस्तृत । म्हणोनीअंबावदलीसंक्षिप्त । तप्तकरुनीगोपीप्रत । घरांपाठविल्याश्रीकृष्णें ॥७६॥
पुढेंदीपवाळीआली । इंद्रपूजानंदेरचिली । कृष्णेंतींनिवारिली । म्हणेगोवर्धनपुजावा ॥७७॥
आपुलोंमुख्यदैवत । ईश्वरहाचीपर्वत । गोधनासीप्रतिपाळित । पूजनकरणेंतयाचे ॥७८॥
कृष्णवाक्येंगोपसकळ । गोवर्धनपूजितीतात्काळ । कोपलातेणेंत्रिलोकपाळ । काळमेघसोडिले ॥७९॥
गजशुंडासमधार । वृष्टीवर्षेअपार । कृष्णेंउचलूनीधराधर । छायाकेलीगोकुळी ॥८०॥
सातदिवस अहिर्निश । अंगुलीवरीजगदीश । पर्वतीधरुनीअक्लेश । उभाअसेआनंदें ॥८१॥
इंद्रेंतेव्हांआठवेदिनीं । कृष्णपराक्रमपाहुनी । भयचकितकृष्णातेनमुनी । स्तुतीकरुनीप्रार्थितसे ॥८२॥
नेणताअपराधघडला । पाहिजेस्वामीक्षमाकेला । आज्ञाघेउनीमगगेला । स्वस्थानासीपुरंदर ॥८३॥
पर्वतठेऊनीभूतळीं । कृष्णसर्वांसहगोकुळीं । येऊनीराहिलावनमाळी । कौतुककरीअनेक ॥८४॥
तालवनींधेनुकासुर । हपटूनमारीहलधर । कृष्णवधीप्रलंबासुर । केशीदैत्यवधियेला ॥८५॥
वार्ताकंसेंऐकून । आलेंम्हणेसमीपमरण । धनुर्यागमिषकरुन । कृष्णरामापाचारिलें ॥८६॥
कंसखळमहाक्रुर । गोकुळींधाडिलाअक्रूर । त्यासीम्हणतीगोपीक्रूर । कृष्णनेतोमथुरेसी ॥८७॥
यशोदानंदरोहिणी । दुःखितझाल्यागौळणी । गोपपोळलेशोकाग्नी । राधापावलीसालोक्य ॥८८॥
असोरामकृष्णकिशोर । पातलेतेमथुरापूर । निघालेपहावयानगर । गोपवेषेंनटोनिया ॥८९॥
रजकमार्गीजातसे । कृष्णतयालागीपुसे । वस्त्रेंकोणाचीबहुवसे । स्वच्छकरोनीनेसीतूं ॥९०॥
उन्मत्ततोरजक । म्हणेकंसराज्याचीसंम्यक । तुम्हीकोणक्षुल्लक । गरजकायतुम्हांसी ॥९१॥
ऐकतांचिकृष्णेंतयाशीं । धाडिलावेगेंयमपुरीशी । वस्त्रेंघेऊनीसावकाशी । करितीदोघेधारण ॥९२॥
भयभीतझालेनागरिक । दोघेजातीनिःशंक । तवपातलीकुब्जाएक । दासीअसेकंसाची ॥९३॥
चंदनसुंगधीतचेहातीं । प्रेमेंलावीदोघांप्रती । कृष्णेंकेलीनवलगती । भक्तिपाहूनतोषला ॥९४॥
दोनीपायपायाखालीं । दाबूनीतीस उभीकेली । दोनबोटेंहनूखाली । लाऊनीवरीउडविले ॥९५॥
झटकाबसतांझालेनवल । त्रिवक्रातीझालीसरळ । रुपेंरतीचकेवळ । म्हणेकृष्णाघरींयेई ॥९६॥
तियेलागींआश्वासून । पुढेंचाललेदोघेजण । तवपुष्पकारेयेऊन । दिव्यहारसमर्पिल ॥९७॥
तयादेऊन इच्छित । पुढेंचालिलेत्वरित । रत्नमंडपदेखत । सुशोभितकंसाचा ॥९८॥
धनुष्यठेविलेंद्वारीं । कृष्णत्याचेतुकडेकरी । पातलेजोमहाद्वारीं । कुवलयापीडगजतेथें ॥९९॥
कंसाचियाआज्ञानुसारीं । माहतेंगजदोघांवरी । मारावयासत्वरप्रेरी । अतिउन्मत्तनेटानें ॥१००॥
रामेंओढोनिशुंडादंड । बळेंपाडिलागजप्रचंड । करोनीमस्तकदुखंड । प्राणघेतलातयाचा ॥१०१॥
उपडोनियादोनीदंत । एकएकदोघघेत । द्वाररक्षकांदिबहुत । दंतघायेंचूरकेले ॥१०२॥
दोघेहीशिरलेआंत । मल्लयुद्धापाचारित । लंब आणिमुष्टिकाप्रत । रामपाठवीयमलोका ॥१०३॥
प्रलंब आणिचाणूर । दोघाकरीकृष्णचूर । पाहूनीम्हणेकंसासूर । धराधरामारामारा ॥१०४॥
कृष्णेंचढूनीमंचावरी । कंसापाडिलेभूमिवरी । स्वयेंबैसोनीउरावरी । दडपूनीमामामारिला ॥१०५॥
सर्वयादव आनंदले । कृष्णरामाआलिंगिलें । मातापितरसोडविले । बंदींतूनश्रीकृष्ण ॥१०६॥
वंदिलेंदोघीदोघांसीं । माताआलिंगिउभयतांसीं । पान्हाफुटलादेवकीसी । तान्हयासीपाहतां ॥१०७॥
जननीचेंप्रेमलपण । सीमानसेविलक्षण । जीचितीसनकळेखूण । केविवर्णीलकवीतो ॥१०८॥
द्वादशवर्षींमौंजीबंधन । दोघांकरवीशूरनंदन । रोहिणी यशोदानंदादिजन । पाचारिलेतेसमई ॥१०९॥
असोएवंआनंदझाला । उग्रसेनपदीस्थापिला । संदीपानगुरुकेला । उज्जनीमाजीजाउनी ॥११०॥
चौसष्टदिवसांआंत । विद्याशिकलेसमस्त । गुरुपुत्र आणूनिदेत । दक्षणार्थकृष्णस्वयें ॥१११॥
रामकृष्ण आलेघरां । कंसस्त्रियाजातीमाहेरा । जरासंधाकंसस्वशुरा । वृत्तकळलसर्व ॥११२॥
अक्षौहिणीबाविस । प्रतीवेळींघेऊनयुद्धास । जरासंधयेईमथुरेस । परीतयाजयनाहीं ॥११३॥
जिंकिलाकृष्णेंसत्रावेळ । सैन्यसंहारिलेंसकळ । तेणेंमगकालयवनप्रबळ । कृष्णावरीधाडिला ॥११४॥
कृष्णेंसमुद्राभितरी । द्वारकानामेंजुनीनगरी । प्रजानेलीतेथेंसारी । गरुडवचनेकरुनिया ॥११५॥
तिचाकेलाजीर्णोद्धार । शोभेंजेवींदेवनगर । स्वयेंदोघेकिशोर । मथुरेमाजीराहिले ॥११६॥
तोंयवनमथुरेंपातला । कृष्णानिःशस्त्र पुढेंझाला । तोहिनिःशस्त्रधांवला । मारावयाकृष्णाशीं ॥११७॥
कृष्णशिरलाएक्याबिळीं । मुचकृंदनिजलामहाबळी । गुप्तठाकेवनमाळी । यवनतेथेंपातला ॥११८॥
निजलाजाणूनीकृष्णनाथ । यवनेंमारिलीलाथ । मुचकुंदनृपजागृत । जाहलापाहेंक्रोधभरें ॥११९॥
तयाचेदृष्टीकरुन । दग्घझालाकालयवन । मुचकृंदकृष्णासींनमून । तपोवनांगेलातो ॥१२०॥
बळिरामेंवधिलेंसैन्य । दोघेआलेपरतोन । द्वारकेमाजीजाऊन । अपारसुखभोगीती ॥१२१॥
दैवतनृपाचीसुता । रेवतीनामेंरामकांता । रुक्मिणीनामेंभीमाकसुता । कृष्णेंवरिलीबळेंची ॥१२२॥
देवीदर्शनापातली । राक्षसविधानेंपर्णिली । रुक्मयाचीफजीतिकेली । पांचपाटकाढिले ॥१२३॥
सत्राजितेंसूर्यस्तविला । स्यमंतकमणीलाधला । उद्धाजितेंगळांघातला । मुगयार्थगेलावनासी ॥१२४॥
सिंहेतयामारिले । जांबवानेसिंहावधिले । रत्नतेणेंबिळींनेलें । बांधिलेंपाळणामुलीच्या ॥१२५॥
आळीआलीकृष्णावरी । तेणेंमणिशोधार्थहरि । मागलाऊनीगुहांतरीं । जांबवानाच्याप्रवेशला ॥१२६॥
तेथेंरत्नदेखिलें । जांबवानासीरणकेलें । अठ्ठावीसदिवसझुंजले । ऋक्षराजसुरराज ॥१२७॥
थकलाजेव्हांऋक्ष । म्हणेतूंरामप्रत्यक्ष । तवरामचीदेखसमक्ष । नमनकेलेसाष्टांगें ॥१२८॥
म्हणेदेवाधन्यकेले । मनोरथमाझेपुरविले । बाहुकंडूशमविले । कृतार्थकेलेस्वामिया ॥१२९॥
एवंवदोनीसुमती । कन्यादिलीजांबवती । रत्न आंदणकृष्णाप्रती । बोळविलेप्रेमभरें ॥१३०॥
कृष्येऊनीगृहांप्रत । मणिसत्राजितादेत । कळतांसर्ववृत्तांत । लज्जितजाहलामानसीं ॥१३१॥
तयाचिसत्यभामासुता । रत्नासहदेतभगवंता । तैसीचमित्रविंदाकांता । कलिंदीलक्ष्मणाभद्रादि ॥१३२॥
अग्नजितीहीआठवी । कृष्णस्त्रियामुख्यविभवी । रुक्मिणीतीपुत्रप्रसवी । प्रदयुम्ननामतयाचे ॥१३३॥
बाळंतिणीचगृहांतून । शंबरेंनेलापुत्रचोरुन । शोकेघाबरायदुनंदन । स्तवनकरीतदेवीचें ॥१३४॥
पूर्वभवीमीधर्मनंदन । तुझेंकेलेंजेंसेवन । विसरलीसकीमजलागुन । भक्तिमाझीनसेकी ॥१३५॥
बाळनेलाचोरुन । माझाझालाअवमान । तुझाचनसेकींअपमान । भक्तवत्सलेदयाळे ॥१३६॥
ऐशागुप्तस्थळातून । येथेंचिमीहीअसून । बाळनेलामजलागुन । नकळेंमातेअद्यापि ॥१३७॥
तयाचीमाताशोककरी । मजलाहिदुःखभारी । सुखदुःखसीमासंसारीं । पुत्रप्राप्तीआणिनाश ॥१३८॥
यज्ञपूजाजपव्रत । करीनतवप्रीत्यर्थ । दाखवीजेमाझा सुत । जरीजीवंतदयेनें ॥१३९॥
नृपातेव्यासम्हणती । प्रत्यक्षयेऊनभगवती । म्हणेशोकनकीजेरुक्मिणीपती । पुत्रतुझाक्षेम असे ॥१४०॥
शापयोगेंशंबरासुर । घेऊनगेलातवकुमर । करुनत्याचासंहार । षोडशवर्षींयेईल ॥१४१॥
ऐकुनीदेवींचेंवचन । शोकटाकीयदुनंदन । जांबवतीम्हणेपतीलागुन । पुत्रनाहींमजलागी ॥१४२॥
उपमन्यूचेआश्रमीं । कृष्णजाऊनतयानमी । मंत्रघेऊनसंयमीं । मुंडीदंडीजाहला ॥१४३॥
केलेंशिवाचेंआराधन । षण्मासेंहरसुप्रसन्न । पार्वतीसहयेउन । वरदानदेतसे ॥१४४॥
म्हणेकृष्णाचिंतानकरी । सोळासहस्रपंन्नासनारी । लाभसीलसुखसंसारी । दशदशपुत्रएकिकीस ॥१४५॥
पार्वतीम्हणेकृष्णाशी । शतवर्षेंसुखभोगेशी । शेवटीनाकुशळाशी । होईलगांधारीविप्रशापें ॥१४६॥
अवश्यकदापिनटळे । शोकटाकिजेज्ञानबळें । निजधामाजासीकाळें । मागेंभिल्लहरितिस्त्रिया ॥१४७॥
एवंवदोनिगौरीहर । गुप्तझालेसत्वर । गृहींआलावसुदेवकुमर । नर्कासुरवधिलापुढें ॥१४८॥
सोळाहजार अठ्ठावन । स्त्रियाज्याच्याशोभन । पुत्रपौत्रादिसंतान । वाढलेंअपारकृष्णाचे ॥१४९॥
एवंहेंकृष्णचरित्र । श्रवणेंकरीपवित्र । हरिहरादिपरतंत्र । सुखदुःखभोगिती ॥१५०॥
स्वतंत्राएकभुवनेश्वरी । स्वयेंखेळनिर्माणकरी । स्वयेंचिपाळीसंहारी । निमित्तमात्रतिघेहे ॥१५१॥
तिचेचकरितांस्मरण । दूरकरीजन्ममरण । मानसीस्थिरावताचरण । भयनाहींकाळाचें ॥१५२॥
जरीमनुष्यत्वलाधले । विप्रत्वहीप्राप्तझाले । वेदशास्त्र अवलोकिलें । पूर्वपुण्येंकरुनिया ॥१५३॥
तरी सदगुरुचेचरण । धरावेंजाऊनिशरण । एकमनेकींजेंसेवन । विषयसर्वठाकावे ॥१५४॥
जरीगुरुकृपाहोईल । तरीचज्ञानठसावेल । अंबातेव्हांदयाकरील । धन्यमगसंसारी ॥१५५॥
श्रोतींकीजेसावचित । अंबासेवावीत्वरित । अवसर ऐसानयेत । देहांतरजाहलिया ॥१५६॥
हाचतुर्थस्कंदपावन । व्याससांगेनृपालागुन । सूतऋषीसीकरीकथन । तेंचिवदलीईश्वरी ॥१५७॥
पंचेचाळीसशतोत्तर । भागवतींश्लोकसुंदर । वर्णनकेलेभाषांतर । स्कंदचौथासंपविला ॥१५८॥
इतिश्रीदेवीविजये । चतुर्थस्कंदेनवमोऽध्यायः ॥९॥ स्कंदसमाप्त
इति श्रीदेवीविजये पूर्वार्धेचतुर्थस्कंदः समाप्तः
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP