नवम स्कंध - अध्याय दुसरा
श्री मत्स्वच्छंदानंदानी रचिलेल्या प्रसिद्ध देवी भागवतसाराचा मराठी अवतार म्हणजे प्रस्तुत ‘ श्री देवी विजय ‘ ग्रंथ होय.
श्रीगणेशायनमः । नारदम्हणेनारायणा । संक्षेपेंवर्णिलेव्याख्याना । हेंचिविस्तरेदयापूर्णा । सर्वसाड्गसांगावे ॥१॥
नारायणतेव्हांनारदासी । व्याससांगेजन्मेजयासी । सूतसांगेऋषिसी । श्रोतीतेंचिपरिसिजे ॥२॥
आत्माखदिशाकाल । गोलोक आणिंविश्वगोल । वैकुंठप्रकृतीमूळ । नित्यजाणसर्वही ॥३॥
पावकातजीदहनशक्ती । चंद्रामाजीशोभाकांती । रवीमाजीप्रभाज्योति । नित्यजेवीऐक्यत्वें ॥४॥
तेवींहीप्रकृती । ब्रम्हामाजीविलासती । आत्माईश्वरसृष्टीप्रती । इचेयोगेजाहला ॥५॥
जरीनसेलसुवर्ण । केवींहोयभूषण । कुलालमृत्तिकेवांचून । केवींघटकरुशके ॥६॥
तेवींप्रकृतिवांचून । जगत्केवींनिर्माण । आत्मानिर्विकारपूर्ण । तिजवांचून अशक्यहें ॥७॥
ऐश्वर्य आणिपराक्रम । मिळेजीपासूनपरम । याकरितांशक्तिनाम । परांबेचेयौगिक ॥८॥
ज्ञानऋद्धीसंपत्ती । यशबलईशध्रुती । सर्व ऐश्वर्यभक्ताप्रति । देत आणिस्वरुपा ॥९॥
तेंसर्वतिजप्रती । आहेम्हणोनभगवती । तिच्यायोगेंआत्म्याप्रती । भगवान्पदमिळाले ॥१०॥
इच्छामयतोनिराकृति । तिचेयोगेंतोसाकृती । तयासीचयोगीघ्याती । तेजोमयजगदात्मा ॥११॥
तोचब्रम्हानंदईश्वर । तेजोरुपींसाकार । वयजयाचेकिशोर । मेघःशामपरमात्मा ॥१२॥
कमललोचनसुंदर । मौक्तिकाभदंतमनोहर । माथाचूडशोभेमयूर । मालतीमाल्यशोभनतो ॥१३॥
पीतपीतांबरनेसला । गळांशोभेवनमाळा । दोनभुजाकरकमळा । मुरलीशोभेअभिनव ॥१४॥
सर्वलोकांचाईश्वर । राधिकेचाप्राणेश्वर । स्वतंत्रसुखीपरात्पर । सर्वमंगलश्रीकृष्ण ॥१५॥
ब्रम्हदेवाशतवर्ष । तेजयाचेनिमेष । हाचिआत्माचिदाभास । परब्रम्हकृष्णहे ॥१६॥
भक्तिआणिसेवन । देईतेणेंनामकृष्ण । सर्वबीज आपण । कृष्णनामयाकरितां ॥१७॥
पूर्वाध्यायींवर्णिलें । वामांगस्त्रीरुपशोभले । दक्षिणांगपुरुषझाले । कृष्णतोचिपरमात्मा ॥१८॥
एवंअर्धनारीश्वर । स्त्रीरुप अतिसुंदर । पाहूनमोहलासत्वर । रासक्रीडाकरीतसे ॥१९॥
तोपुरुषतीप्रकृती । दोघेहीरममाणहोती । विधिदिनएकपुर्ती । रतिसमरजाहले ॥२०॥
कृष्णेंकेलेंवीर्याधान । देवीकरीगर्भधारण । मिथुनांतीश्रमपूर्ण । श्वासोश्चासशक्तीचे ॥२१॥
सुटलेतोंचिसमीरण । दशवायूत्यापासून । घर्मजलनिघालेंतूर्ण । अंडकटाहभरियेला ॥२२॥
तयापासाववरुण । वरुणानीवामांगांतून । शतमन्वंतरेंपूर्ण । गर्भधारणजाहले ॥२३॥
विश्वाचेजेआधार । डिंमप्रसवलीसुंदर । तप्तजेवीचामीकर । प्रकृतीनेंदेखिले ॥२४॥
कोपेंतिणेजलांतरी । अंडटाकिलेंसत्वरी । कृष्णेंपाहून अवसरीं । प्रकृतीसीशापिले ॥२५॥
तूंआणितवांशनारी । अपुत्रव्हावेंसंसारी । ममशापेंनिर्धारी । अनपत्य असोतुज ॥२६॥
प्रकृतीचेजिव्हेपासून । सरस्वतीझालीउत्पन्न । तीसकृष्णेंपूजुन । विष्णुलागीदधिली ॥२७॥
पुन्हातीचप्रकृती । प्रगटवीदोनशक्ती । वामांगांतूनरमेप्रती । दक्षिणांगांतराधिकां ॥२८॥
कृष्णेंहीएकचतुर्भुज । वामांगांतूनरुपसहज । प्रगटकरोनिचोज । लक्ष्मीवाणीतयालागी ॥२९॥
वैकुंठनामेंभुवन । गेलातेथेनारायण । तेणेंहीस्वांगापासून । जयादिगणनिर्मिले ॥३०॥
इंदिरेचेदेहांतून । दासीझाल्यानिर्माण । इकडेकृष्णरोमांतून । अनेकदासगोपते ॥३१॥
राधेचेदेहांतून । अनेकगोपीनिर्माण । झाल्याअनपत्यकारण । पुरुषशापेकरुनिया ॥३२॥
मूळप्रकृतीपासून । दुर्गाझालीनिर्माण । कृष्णेंतीसरत्नसिंहासन । देउनीयातोषविली ॥३३॥
कृष्णदक्षिणांगांतून । प्रगटझालीत्रिलोचन । दिगंबरविषभूषण । शुलायुधपरंतप ॥३४॥
दुर्गादेउनतयासी । कृष्णेंधाडिलाकैलासी । इकडेविष्णुनाभिपद्माशी । ब्रम्हाझालाउत्पन्न ॥३५॥
शतवर्ष्येंहोतांपूर्ण । विराटनिघालाअंडांतून । रुदनकरीक्षुधेन । मातृपितृत्यक्ततो ॥३६॥
षोडशांशकृष्णतेज । विराटझालातोअज । कृष्णवरेधृतीओज । अपारवैभवतयांचें ॥३७॥
एकएकरोमांतरीं । अनेकब्रम्हांडेभीतरीं । विधिहरेद्रांदिहरी । अनंतकोटिजयाच्या ॥३८॥
पातालादिब्रम्हलोक । ब्रम्हांडझालेंतेथेंएक । तयारीवैकुंठलोक । गोलोकतयावरी ॥३९॥
आधीसरस्वतीचेंपूजन । श्रीकृष्णेंप्रेमेकरुन । विष्णुशीकेलीसमर्पण । राहिलीतीवैकुंठी ॥४०॥
माघशुक्लपंचमीदिनी । पूजितीजीसदेवमुनी । कण्वशाखोक्तमंत्रानि । षोडशोपचारेकरुनिया ॥४१॥
सुवर्णाचीकरोनिगोळी । कवचकरुनिमंत्रबळी । गंधादिचर्चूनपुष्कळी । कंठामाजीधरितीते ॥४२॥
तियेचेंकरितीध्यान । सुस्मित आणिशुक्लवर्ण । कोटिचंद्रप्रभापूर्ण । शुक्लवस्त्रेंआभरणें ॥४३॥
वीणापुस्तकधारिणी । भक्तजिव्हाग्रवासिनी । सर्वविद्याप्रदायिनी । ज्ञानदातीशारदा ॥४४॥
मूलमंत्रेंकीजेपूजन । कवचकीजेधारण । वाल्मीकासीनारायण । उपदेशीगंगातिरी ॥४५॥
भ्रुगुदेतशुक्रासी । मरीचीदेतबृहस्पतीशी । ब्रम्हादेतभ्रुगुशी । अस्तिकाशीजरत्कारु ॥४६॥
विभांडकेंश्रृंगीस । कणाद आणिगौतमास । शिवकरीउपदेश । सूर्यदेईदोघांते ॥४७॥
याज्ञवल्क्यकात्यायन । सूर्यगुरुयाचाजाण । पाणिनिभरद्वाजालागुन । शेषदेतविद्येते ॥४८॥
तैशीचशाकटायनाशी । शेषदेतमनुशी । चारलक्षजपतयाशी । मंत्रसिद्धिहोतसे ॥४९॥
ब्रम्हदेवभ्रुगुशी । दिव्यकवच उपदेशी । नारायणेंनारदाशी । स्तववर्णिलादेवीचा ॥५०॥
गुरुशापेंदुःखित । याज्ञवल्क्यसूर्याप्रत । भावेकरुनशरणजात । सूर्यसांगेतयाशी ॥५१॥
सरस्वतीचेकरीस्तवन । तेव्हांहोईलशापशमन । मगतेणेंकरजोडून । स्तवनभावेआरंभिलें ॥५२॥
गुरुशापेंतेजहत । झालोमातेदुःखित । शरण आलोतुजप्रत । रक्षिआतांदयाळे ॥५३॥
विद्येचीनाहींस्मृती । पडलीसेमजभ्रांति । ज्ञानदेऊनमागुती । तारीआतांदयाळे ॥५४॥
परमाजीब्रम्हरुपिणी । ज्योतिरुपासनातनी । सर्वविद्यामहावाणी । भारतीतुजनमोस्तु ॥५५॥
विसर्गबिंदुमात्रास्वर । ककरादिक्षकार । अधिष्ठानजीअगोचर । कादिविद्येनमोस्तु ॥५६॥
एकादिनवपर्यंत । अंकरुपेंविराजत । सर्वसंख्यामूळदैवत । एकात्मिकेनमोस्तु ॥५७॥
स्मृतिबुद्धिदिज्ञान । ककल्पनेचेप्रतिभान । भ्रमसिद्धांतकारण । तमोनुदेनमोस्तु ॥५८॥
विधीसीसनत्कुमार । पुसेज्ञानाचाविचार । नसुचेतयासीउत्तर । कृष्णोपदेशस्तवीतूंते ॥५९॥
तेव्हांपावलाज्ञान । उत्तरदिलेंविधात्यान । धरेनेंपुसतांनारायण । मूकवतजाहला ॥६०॥
कश्यपवाक्येकरुन । तुझेंकेलेंस्तवन । सिद्धांतवदलाधरेलानुन । व्यासेंतुज आराधिलें ॥६२॥
कवींद्रत्वतैंलाधले । वेदाचेविभागकेलें । इंद्रेंशिवासीपुसिलें । स्मरुनीतुजशिवसांगें ॥६३॥
इंद्रेगुरुशीपुसिलें । शब्दशास्त्रसांगावहीले । तेव्हांतुज आराधिले । सहस्त्रवर्षपुष्करी ॥६४॥
मगपावलावरदान । इंद्राशीदिलेंशब्ददान । सरस्वतीतुजवांचून । जडमूकसर्वही ॥६५॥
एवंदोनीमुनिवर । नमनकरीवारंवार । रुदनकरीदुःखभर । अंबापावेतयाशी ॥६६॥
तयाशीदेउनीवर । गेलीस्वयेवैकुंठपुर । गंगाशापेंदुस्तर । नदीझालीसरस्वती ॥६७॥
एकदांवैकुंठभुवनी । गंगापद्माआणिवाणी । तिघीबैसल्यासंनिधानी । हरिसमीप आनंदे ॥६८॥
पाहूनविष्णुवदन । सकामागंगाहोऊन । हांसेमारीकटाक्षबाण । नारायणासीतेधवा ॥६९॥
तेपाहूनीनारायण । रवयेहस्यावलोकन । करीगंगेसीपाहून । शंकायुक्तईश्वर ॥७०॥
ऐसेंचरित्रपाहती । लक्ष्मीआणिसरस्वती । पद्मेनेंवरिलीशांती । वाणीक्षोभलीअतिशयें ॥७१॥
वाणीम्हणेगदाधरा । समतास्त्रियाशींनोवरा । करीजोसद्धर्मविचारा । विषमतायोग्यनसेही ॥७२॥
गंगापद्मातवप्रिया । तेणेंक्षमेकमलालया । प्राणत्यागीनयासमया । धिगजीवनवंचनें ॥७३॥
ऐकूनिक्रोधवचन । बाहेरगेलानारायण । गंगेवरीकोपुन । वाणीधावेंक्रोधभरे ॥७४॥
लक्ष्मीतियेसीनिवारी । वाणीसीधरिलेकरी । रमेसीशापीक्रोधभरी । नदीवृक्षहोयम्हणे ॥७५॥
गंगातेंव्हांकोपुनी । शापिलीतेव्हांमहावाणी । नदीरुपहोऊनी । भारतांमाजीरिघेतूं ॥७६॥
भारतीम्हणेगंगे । तूंहीयेसीममसंगे । एवंत्याशापयोगें । परस्परदुखावल्या ॥७७॥
आंत आलानारायण । शापादिसर्व ऐकून । कोपयुक्तस्वयेंहोऊन । वदेतेव्हांतिघींसीं ॥७८॥
धर्मध्वजाचेमंदिरी । अयोनिसंभवानारी । कन्याहोऊनीसुंदरी । तेथेंचिहोयवृक्षतूं ॥७९॥
मदंशमहासुर । शंखचूडदैत्यवर । तयाचीस्त्रीमनोहर । होवोनीमगमजवरिसी ॥८०॥
नदीहोयपद्मावती । पावनकरीपाप्याप्रती । तुवांजावेंसरस्वती । नदीव्हावेगंगाशापे ॥८१॥
मगजावेंब्रम्हसदनां । गंगेतूंहीशिवस्थाना । जावेंभारतीशापस्थानां । नकोयेथेंवास्तव्य ॥८२॥
भार्याअसोनीतीन । स्वभावत्यांचेभिन्नभिन्न । कलहनित्यदारुण । धिग्जीवनपुरुषाचे ॥८३॥
रमाअसेसदाशांत । तीचराहेसदायेथ । तुम्हीजावेत्वरित । ब्रम्ह आणिहरसदनां ॥८४॥
ऐकुनीऐसेंवचन । तिघीकरितीरुदन । लक्ष्मीतेव्हांपायधरुन । प्रार्थीतसेपतीशी ॥८५॥
वाक्यरमेचेंऐकिलें । तैंदोघीशीवदले । अंशेजाऊनवहिले । राहवेंयेथेंदोघींनी ॥८६॥
गंगाराहेशिवजटेंत । शापेंजावोधरेप्रत । पांचसहस्रवर्षेंकलींत । होतांयेवोमजपाशी ॥८७॥
एवंशापयोगेंपरस्पर । नद्याझाल्यापृथ्वीवर । पावनझालेपापीनर । स्पर्शमात्रेंजयांच्या ॥८८॥
पांच उणचतुःशत । श्लोक असतीभागवत । सारसंग्रहभाषेंत । केलेंयेथेंअंबेनें ॥८९॥
देवीविजयेनवमेद्वितीयः ॥२॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP