नवम स्कंध - अध्याय तिसरा

श्री मत्स्वच्छंदानंदानी रचिलेल्या प्रसिद्ध देवी भागवतसाराचा मराठी अवतार म्हणजे प्रस्तुत ‘ श्री देवी विजय ‘ ग्रंथ होय.


श्रीगणेशायनमः । गंगाशापेसरस्वती । अंशरुपेंभारती । नदीझालीपुण्यवती । स्वयेवैकुंठीनिवसेपै ॥१॥

भरतवर्षांत आली । भारतीनामपावली । ब्रम्हलोकांगेली । ब्राम्हीनामतेणेंगुणें ॥२॥

वागदेवीम्हणोनिवाणी । सरादिकींविष्णुचारिणी । सरस्वतीतेणेंगुणी । तीर्थरुपापवित्रा ॥३॥

सगराचेउद्धारार्थ । गंगेसीप्रार्थीभगीरथ । तिचावेगसहनार्थ । हरप्रार्थिलाभगीरथें ॥४॥

वाणीशापेकरुन । अंशरुपेंगंगाजाण । भारतीआलीतेथून । शिवजटेंतराहिली ॥५॥

रमाहीनदीजाहली । पद्मावतीनामपावली । स्वयेंवैकुंठीराहिली । अंशेंझालीनदीरुप ॥६॥

पुनःस्वकलेकरुन । धर्मध्वजाचिकन्याजाण । तुलसीनामेंचारुगुण । वृक्षझालीशापयोगें ॥७॥

पांचसहस्रवत्सर । होतांकलीचीसाचार । शापमुक्तसत्वर । तिघीजातीवैकुंठा ॥८॥

काशीआणिवृंदावन । हीदोनक्षेत्रेंसोडून । आणिकसर्वतीर्थेंनिघून । तयासवेजातील ॥९॥

दशसहस्रहोतावत्सर । शालिग्रामशक्तीशंकर । जगंनाथदेवसत्वर । टाकूनिजातीभारता ॥१०॥

साधूशंखपुराण । वेदश्राद्धकर्मतर्पण । देवपूजागुणकीर्तन । शास्त्रेंआणिवेदांगे ॥११॥

संतधर्मसत्यव्रत । तपतैसेंग्रामदैवत । उपोषणादिप्रायश्चित । सवेंजाईलतयांच्या ॥१२॥

वाढेलतेव्हांवामाचार । खोटेंकपट अनाचार । तुलसीरहितपूजाप्रकार । प्रवर्तेलतेसमईं ॥१३॥

शटदांभिकक्रूर । मनीमोठाअहंकार । हिंसक आणिचोर । होतीलसर्वदुरात्मे ॥१४॥

स्त्रीआणिपुरुष । एवढाभेदजातीस । सुखहोयविवाहास । गुणमिळतीसर्वही ॥१५॥

बापेंमिळविलेंधन । नदेईंपुत्राएककण । पुत्राचेतैसेंच आचरण । जोमिळवीतोचिधनी ॥१६॥

जारिणीहोतीसर्वनारी । स्त्रीवशपुरुषनिर्धारी । सत्तानाहींगृहांतरी । आज्ञेवांचूनतियेचे ॥१७॥

पतीसकरितीनिर्भत्सन । समोरबोलतांताडन । करितीस्वामित्व आपण । दास्यत्वयेतपुरुषाशी ॥१८॥

सासु आणिस्वशुर । दास्यत्वत्यांनिरंतर । मेहुणेंअथवाजार । गृहकर्मींमुख्यते ॥१९॥

भार्येकडीलजेंगोत । बधुमित्रादिम्हणवीत । विद्याबंधुकिवास्वगोत । भाषणकैचेंतयांशीं ॥२०॥

जातिभेदमुळीचनसे । संध्यासुत्रमगकैचें । म्लेंच्छाचारह्रदईंवसे । म्लेंच्छविद्याअभ्यासती ॥२१॥

कोणीस्वयंपाककरिती । कोणीपाणभरेहोती । कोणीपत्रेंपोंचविती । उदरार्थधावुनिया ॥२२॥

बैलावरीस्वयेंबसती । अनृतसदाबोलती । पीकनसेधरेप्रती । वृष्टीनसेयथाकाल ॥२३॥

वृक्षानयेतीफळें । स्त्रियासनहोतीबाळें । दूधनसेगाईखाले । घृतकैचेंतेधवा ॥२४॥

दंपत्यांतनसेप्रीती । बलहीनसर्वनृपती । करयोगेंप्रजापीडिती । महानद्याकोरडया ॥२५॥

क्षुद्रनदीओढेखोरीं । पाणीअसेंगव्हरीं । धर्महीनवर्णचारी । पुण्यकैचेंतेसमईं ॥२६॥

लक्षामाजीकोणीएक । असेनसेवापुण्यक । कुत्सित आणिकुरुपक । नारीनर उपजती ॥२७॥

नदींतिरींसरोवरीं । पिकेंहोतीलसरासरी । नपिकेपृथ्वीकदांसारी । मेघोदक अभावे ॥२८॥

कितीग्राम आणिपुर । शून्यहोतीलभयंकर । ग्रामांत अरण्येंसाचार । करदुःखेनासेप्रजा ॥२९॥

रोगभयचोरभय । अन्गिभयमृत्युभय । राजेतेव्हांनिर्दय । नाशएवंप्रजेचा ॥३०॥

सोळावर्षींवलीपलित । महावृद्धवीसवर्षांत । अष्ठवर्षीरजोयुक्त । वृद्धहोषोडशी ॥३१॥

वर्षासहोयप्रसूत । क्वचित्पतिपुत्रान्वित । वंध्याविधवाबहूत । कलींमाजीनृपाळा ॥३२॥

कन्याविक्रयसर्वकरिती । मातास्त्रीआणियुवती । कन्याभगिनीजारप्राप्ती । धनघेतीसर्वही ॥३३॥

कीत्यर्थकरितीदान । नदिलेम्हणतीमागुन । दिलेंलेंघेतीहिरोन । देववृत्तीब्रम्हावृची ॥३४॥

कन्यास्नुषाकिंवाभगिनी । विचारकैचाअगम्यगमनीं । टाकूनएकमातृयोनी । विहारकरितीयथेच्छ ॥३५॥

लाक्षालोहोदिरस । विप्रकरितीविक्रयास । भक्षितीतेशूद्रान्नास । विचारकैचातयाशीं ॥३६॥

जारिणीवारजस्वला । कुष्टयुक्ताजरीअबला । शिरेसुखेंपाकशाला । ब्राम्हणाचेगृहांत ॥३७॥

एवंप्रवर्तेलकली । म्लेंच्छघालितीधुमाळ । कोणीशुद्धविप्रकुळीं । कलंक्यावतारहरीचा ॥३८॥

एकहस्तमात्रतरु । मनुष्येंअंगुष्टांकारु । तेव्हांहोय अवतारु । म्लेंच्छनाशीलत्रिदिनीं ॥३९॥

साहादिवसपर्यंत । शुंडाधारीमेघवर्षत । सर्वपृथ्वीप्राणिरहित । शून्यहोततेसमयी ॥४०॥

सूर्यतापेकरुन । पृथ्वीजायशोषून । कृतयुगहोयमागुत्यान । धर्मपूर्णतेधवा ॥४१॥

लेशनसेअधर्माचा । पूरवाहेसत्याचा । चतुष्पादधर्मसाचा । चारीवर्ण अतिशुद्ध ॥४२॥

त्रेतामाजीत्रिपादधर्म । द्वापारींअर्धधर्म । कलियुगीएकपादधर्म । लोपशेवटींधर्माचा ॥४३॥

सोळातिथीसातवार । दिवारात्रीआठप्रहर । साठघटीसाचार । अहोरात्रजाणिजे ॥४४॥

पंधरातिथीपक्षएक । दोनपक्षमासएक । दोनमासऋतुएक । अयनएकतीनऋतू ॥४५॥

अयनेंहोतांदोन । एकवर्षहोयपूर्ण । देवाचातोएकदिन । अहोरात्रजाणिजे ॥४६॥

तीनशेसाठमनुष्ययुग । देवाचेतेंएकयुग । एकहत्तरजैंदेवयुगें । एकतेव्हांमन्वंतर ॥४७॥

इंद्रायुष्यप्रमाण । मन्वंतरासमान । अठ्ठावीस इंद्रप्रमाण । अहोरात्रविधीचे ॥४८॥

शतवर्षेंएवंपूर्ण । ब्रम्हदेवापातजाण । पृथ्वीहोयतेव्हांलीन । उदकामाजीनारदा ॥४९॥

प्राकृतलयम्हणतीयासी । लयहोयहरिहरीशी । लयतेव्हांप्रकृतीसी । ब्रम्हलीनातेहोय ॥५०॥

एवंलयाचाजोकाल । अंबेचेंनिमिषकेवळ । निमिशांत अनंतवेळ । घडीमोडीब्रम्हांडें ॥५१॥

तेसाक्षातूब्रम्हरुपिणी । प्रकृतीहीतिजपासुनी । कृष्णादिसर्वमुळीहूनी । जननीएक आद्याती ॥५२॥

सावित्रीतीवेदजननी । तपलीतीगंधमादनी । मगजाहलीकृष्णपत्नी । एकांतस्थाप्रियाते ॥५३॥

तपकेलेंकृष्णांदिकी । धन्यझालेतीलोकीं । विराटवर्णिलाजोकी । जलामाजीबैसला ॥५४॥

त्याचेझालेऐसेंमन । बैसेसर्वांगव्यापून । तेणेंझालीधराजाण । आधाररुपासर्वांसी ॥५५॥

तीजेव्हांनिमग्नजळीं । वराहरुपेंविष्णूबळी । धरास्थापिलीतेव्हांजळी । कमळापरीहरीनें ॥५६॥

सुंदरवेषकरुन । तीशीझालारममाण । मंगळजाहलातीपासून । ग्रहश्रेष्ठभौमतो ॥५७॥

मगकेलेंपूजन । धरेसीदिलेंवरदान । ब्रम्हादिकींकेलेंस्तवन । धरादेवीचेंप्रेमाने ॥५८॥

जयदेवीजलाधारें । जलशीलेमातेधरे । जयप्रदेसर्वांधारे । जय आम्हांदेईजे ॥५९॥

यज्ञवाराहकामिनी । मंगलेमंगलजननी । मंगलसर्वत्रदायिनी । सर्वज्ञेतुजनमोस्तु ॥६०॥

पुण्यबीजेपुण्यमये । पुण्यदेतूपुण्यप्रिये । पुण्यगृहेपुण्याश्रये । पुण्यकीत्यैंनमोस्तू ॥६१॥

सर्वसहनकारिणी । क्षमानामधारिणी । शांतिमयेअक्रोधिनी । वसुमतीनमोस्तु ॥६२॥

सस्याढ्येसस्यदायिनी । सस्येशीसस्यहारिणी । सस्यात्मिकेसस्यवासिनी । सर्वार्थदेनमोस्तु ॥६३॥

भूमिपालेनमस्कृते । भूम्नेभौमेसुशोभिते । भूमिपालेसुखोदभूते । भूमिदेवीनमोस्तु ॥६४॥

एवंकरुनस्तवन । देवपावलेवरदान । जोकरीस्तोत्रपठन । भूमिदानपुण्यतया ॥६५॥

संध्यापूतजोब्राम्हण । तयादेतांभूमिदान । शिवलोकींतयास्थान । रेणुसंख्यावत्सरे ॥६६॥

ग्रामभूमिसस्यदान । करितांदेवीपुरीस्थान । हेंचिकरिताहरण । कालसूत्रेअक्षई ॥६७॥

दोनशेंतीनसुश्लोक । भूमिदेवीचेंकथानक । अंबाबोलेसम्यक । तृतीयोध्यायसुरसजो ॥६८॥

श्रीदेवीविजयेनवमेतृतीयः ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP