नवम स्कंध - अध्याय पांचवा
श्री मत्स्वच्छंदानंदानी रचिलेल्या प्रसिद्ध देवी भागवतसाराचा मराठी अवतार म्हणजे प्रस्तुत ‘ श्री देवी विजय ‘ ग्रंथ होय.
श्रीगणेशायनमः । वेदवतीचेदिव्यचरित्र । नारायणसांगेपवित्र । नारदासिअतिचित्र । श्रवणेंकरीसुखातें ॥१॥
मनुमुख्यदक्षसावर्णी । सुतत्याचाब्रम्हसावर्णी । तयाचाधर्मसावर्णी । रुद्रसावर्णीसुतत्याचा ॥२॥
तत्पुत्रदेवसावर्णीं । त्याचातोइंद्रसावर्णी । तोमोठावैष्णवाग्रणी । वृषध्वजपुत्रत्याचा ॥३॥
तोमोठाशिवभक्त । तिरस्कारीसर्वदैवत । शिवत्याचेघरीराहत । तीनयुगेंदेवांची ॥४॥
भक्तिवश्यमहेश्वर । नेणेंभक्तदुराचार । वात्सल्यकरीनिरंतर । पुत्राहूनविशेषें ॥५॥
भाद्र्पदीलक्ष्मीपूजन । माघमासींपंचमीदिन । करितिदेवपूजन । सरस्वतीचेआदरें ॥६॥
रावकरीअनादर । तेणेंकोपलामिहीर । शापदीधलादुस्तर । भ्रष्टश्रीहोयम्हणे ॥७॥
वृत्त ऐकतांचिहर । भक्तापराधेकोपेंफार । शूलघेऊनभयंकर । धाविनलासुर्यावरी ॥८॥
आलापाहुनस्मरारी । भयेंपळालातमारी । कश्यपाशीनमस्कारी । म्हणेवाचीवमदगुरी ॥९॥
पाठीआलापुरहर । पुत्रासहतोमुनिवर । पळालावेगेंसत्वर । शरणगेलाचतुरानना ॥१०॥
तयाचेवाक्य ऐकून । दोघांसहविधीतेथून । वेगेंवैकुंठांजाऊन । वृत्तसांगेहरिसी ॥११॥
अभयदेतनारायण । स्थीरव्हाआतांतिघेजण । भयनाहींहरापासून । रिघतांमाझेंपाठीशीं ॥१२॥
तोहीदेवसर्वेश्वर । संतभक्ताचेमाहेर । भक्तवत्सलशंकर । भक्तापराधेंकोपला ॥१३॥
शिव आणिसुदर्शन । प्रियमजप्राणाहून । तेजस्वीतयासमान । आहेकोणदुसरा ॥१४॥
कोटिसूर्यकोटिरंचि । लीलामात्रेंजोरची । दुज्याससमतात्याची । करवेलकेवींसांगिजे ॥१५॥
सदाह्रदईंमाझेंध्यान । करितोमीहीसदाचिंतन । भेदमानीजोकृपण । काळसूत्रेंत्याकरितां ॥१६॥
एवंजोंहरीबोलत । तोंशिवपातलातेथ । वृषारुढत्रिशूलहस्त । रक्तनयन उग्रात्मा ॥१७॥
वृषावरुन उतरला । नारायणतेणेंनमिला । वरचेवर उचलिला । आलिंगिलाश्रीरंगें ॥१८॥
विधिकश्यप आणिमित्र । शिवपदवंदितीपवित्र । स्तुतीकरीविधिपौत्र । शंकराचीभक्तिनें ॥१९॥
बैसविलादिव्यासनी । विष्णूनेंतेव्हांसन्मानुनी । श्वेतचामरेकरुनी । विष्णुपार्षदसेविती ॥२०॥
अमृततुल्यगोडवचन । हळूंचपुसेनारायण । कायकोपाचेंकारण । येणेंकिमर्थजाहलें ॥२१॥
शिवम्हणेमाझाभक्त । तयाचंडकरशापित । तेणेंकरावयाघात । तपनाचाधांवलों ॥२२॥
तोआलातुजजवळी । भयनाहींचकदाकाळीं । परिवृषध्वजासशापबळी । केवींआतांकरावें ॥२३॥
शिवासीम्हणेंनारायण । येथेंजाहलाएकक्षण । परीभूवरीकाळमान । एकवीसयुगेंगेलेसें ॥२४॥
वृषध्वजपावलामरण । तत्पुत्ररथध्बजजाण । तोहीपावलामरण । हतश्रीककालयोगें ॥२५॥
त्याचेसुतदोघेजण । धर्मध्वजकुशध्वजजाण । हतश्रीतेममभजन । लक्ष्मीसेवाकरिताती ॥२६॥
लक्ष्मीप्रसादकरुन । होतीलतेश्रीसंपन्न । तवभक्तगेलामरुन । जाईंआतांशकरा ॥२७॥
एवंविष्णूबोलून । सभाकेलीविसर्जन । सर्वपावलेस्वस्थान । शिवसूर्यमुनीविधी ॥२८॥
लक्ष्मीचेजाहलेंवरदान । दोघेझालेश्रीमान्य । पुत्रराज्यऋद्धीधन । प्राप्तझालेंदोघांसी ॥२९॥
कुशध्वजामालावती । रमणीअसेरुपवती । रमांशेंकन्यातिजप्रती । झालीदिव्यसुरुपा ॥३०॥
बहुकालेंमालवती । झालीमोठीज्ञानवती । परिजन्मतांचिकन्येप्रती । ज्ञान असेंअदभुत ॥३१॥
वेदम्हणेजन्मघेतां । वेदवतीनामतत्वता । सवेंचहोऊनसुस्नाता । द्वादशवर्षाजाहली ॥३२॥
सर्वजनींनिवारिली । परीतेपुष्करागेली । महत्तप आचरली । मन्वंतरसमग्र ॥३३॥
श्रमनसेतियेशी । धष्टपुष्ठजैशीतैशी । वाणीऐकेआकाशीं । जन्मांतरीहरिभर्ता ॥३४॥
पुन्हाकरीतपदारुण । तेथेंपातलारावण । मोहलारुपपाहून । करधारिलातियेचा ॥३५॥
वेदवतीनेंकोपून । केलेंतयाचेस्तंभन । हातपाय आकडून । गेलेंतेव्हांदुष्टाचे ॥३६॥
रावणदेवीस्तवकरी । देवीतयामोकळीकरी । कन्याम्हणेतुझेंघरी । येऊननाशीनकुळासह ॥३७॥
एवंतयाबोलून । देहगेलीटाकून । तीचपुढेंधरेंतून । सीतानामेंजाहली ॥३८॥
श्रीरामसाक्षातहरी । तयासीतीसीतावरी । दैवयोगेंवनांतरीं । रामआलासीतेसह ॥३९॥
अग्नीहोऊनब्राम्हण । रामासीसांगेयेऊन । आतांहोईलसीताहरण । दैवयोगेंअवश्य ॥४०॥
देवीमजपाठविले । सीतारक्षीनयोगबळें । छायारुपएकवेगळे । तुजसमीपठेवीपा ॥४१॥
वाक्य ऐकतांतैसेंकेलें । रामेपरीकोणानकळें । पुढेंपरीक्षेचेवेळें । रामाग्नीसपुसेछाया ॥४२॥
माझीकायव्हावीगती । रामाग्नीतेव्हांसांगती । तपकीजेपुष्करांति । स्वर्गलक्ष्मीहोशीलतूं ॥४३॥
तीगेलीक्षेत्रपुष्कर । तप आचरलीदुष्कर । देवाचीवर्षेंसाचार । तीनलक्षपर्यंत ॥४४॥
तीजेव्हांतपकरी । कामातुरामागेंवरी । पतिदेऐसीवैखरी । पांचवेळावदती ॥४५॥
भोळावरदशंकर । दिधलाछायेसीवर । पांडवपतीमनोहर । तुजहोतीलपांचहे ॥४६॥
शिववरेंछायासती । द्रौपदीझालीविख्याती । स्वर्गलक्ष्मीझालीअंती । रामाग्नीच्यावरदानें ॥४७॥
वास्तवसीतावेदवती । घेऊनरामतियेप्रती । अयोध्येचाझालानृपती । अकरासहस्रवत्सरे ॥४८॥
सुखेंहरीसारमून । लक्ष्मीमाजीझालीलीन । रामहीसर्वांघेऊन । वैकुंठासीपातला ॥४९॥
हेंवेदवतीआख्यान । नारदासांगेनारायण । तुलसीकथानिरुपण । अतःपरजाणिजे ॥५०॥
चारवेदजिव्हेवरती । तीचजाणावेदवती । कलांशेंसाक्षात्प्रकृती । पद्मांशदेवीवरदाही ॥५१॥
हेंसुरस आख्यान । जोकरीश्रवणपठण । विद्यायशधनधान्य । प्राप्तहोयतयाशीं ॥५२॥
पंचदशोपरीशत । वेदवतीचेचरित । अंबाबोलेप्राकृत । रसभरितकथेसी ॥५३॥
श्रीदेवीविजयेनवमेपंचमोध्यायः ॥५॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP