नवम स्कंध - अध्याय सहावा

श्री मत्स्वच्छंदानंदानी रचिलेल्या प्रसिद्ध देवी भागवतसाराचा मराठी अवतार म्हणजे प्रस्तुत ‘ श्री देवी विजय ‘ ग्रंथ होय.


श्रीगणेशायनमः । धर्मध्वजाचीभामिनी । माधवीनामेंतरुणी । तीसहतोगंधमादनी । रतझालाआरामी ॥१॥

दोघेहीयुवासुंदर । सुखेंकरितीविहार । देवाचेशतवत्सर । भाननाहींतयाशीं ॥२॥

रावतेव्हांसावधझाला । म्हणेकाळबहूतगेला । गर्भधरीवेल्हाळा । शतवर्षेमाधवी ॥३॥

वाणीशापेकरुन । अंशरुपेरमाजाण । माधवीगर्भीयेऊन । कन्यारुपेंप्रगटली ॥४॥

कार्तिकपूर्णाशुक्रवारी । शुभलग्नग्रहचारी । सर्वबांधवामोदकरी । रमाप्रत्यक्षयेतसे ॥५॥

चंद्रकांतीमंदझाली । ऐसीप्रभाफांकली । बहुगर्वाहानीकेली । रुपलावण्येंजियेच्या ॥६॥

नीलस्निग्धपाहूनकेश । लाजलेकृष्णफणीश । केशमध्येंभांगास । प्रयागशोभानातळे ॥७॥

पाहूनियासिदुरबिंदू । लाजावलास्वयंइंदु । भाळींतिलककुंकुमबिंदु । पाहतांलाजेमंगळ ॥८॥

कर्णांतरेखिल्याभ्रुकुटी । कामकार्मुकहिंपुटी । नेत्रशोभागोमटी । मृगनेत्रझांकले ॥९॥

नयनांतीलबाहुली । कज्जलेंतीचर्चिली । मनोभ्रमरेंझांपघातिली । प्रतिबिंबदेखतां ॥१०॥

सरळपाहेनिनासिक । लाजूनपळालेशुक । वदनपाहूनिनिष्कलंक । शरच्चंद्रलाजला ॥११॥

कपोलाचीपडिलीप्रभा । दर्पणाचीकायशोभा । अधराचिझळकेआभा । अरुणतेव्हांहतगर्व ॥१२॥

पाहुनीयादंतपंक्ती । हिर्‍याचीहरलीकांती । डाळिंबाचीफिटलीभ्रांती । रंगपाहतांविडयाचा ॥१३॥

जेव्हांबोलेमधुरस्वर । पिककरितीमौनाचार । हस्यपाहतांसुकुमार । फुल्लपद्मेंलाजती ॥१४॥

वाकडेजेपाहणें । मूर्खहोतीशाहणे । मदनासीलाजिरवाणे । होय उपमेवांचुनी ॥१५॥

कंठाचीपाहूनकांति । शंखकरीमनींखंती । स्तनद्वयपाहतांलाजती । सहस्रपत्रकळ्याज्या ॥१६॥

हस्तपाहूनकोमल । लताशींपडलेंभुरळ । करपाहूनरातोत्पळ । मनीसशंकलाजले ॥१७॥

उदरपाहूनकोमल । दर्दुरहोतीविव्हळ । जंघापाहूननिर्मळ । रंभाहोतीलाजिर्‍या ॥१८॥

आरक्तदेखतांपादतल । लाजेगुलाबाचेफुल । नखेंपाहूनितेजाळ । रविकिरणेंविराली ॥१९॥

वस्त्रेंभूषणेंलेइली । साक्षाद्रमाच अवतरली । तुलनानसेचिरुपागळी । तुलसीनामयाकरितां ॥२०॥

उपजतांचिथोरझाली । प्रकृतीच अवतरली । बदरीवनासीगेली । तपालागीसवेग ॥२१॥

सर्वलोकींवजिंली । अनिवारतीगेली । देवाब्दलक्षतेकाळीं । महातप आचरिलें ॥२२॥

ब्रम्हाझालाप्रसन्न । मागम्हणेवरदान । तुलसीतेव्हांनमस्कारुन । सविनयबोलिली ॥२३॥

पूर्वींअसतांगोलोकीं । कृष्णाचीमीप्रियसखी । तयासीरमतांसुखी । पाहिलेंमजराधेनें ॥२४॥

गोविंदासिभर्सिले । मजलागीशापिलें । मनुष्यत्वप्राप्तझालें । शापयोगेंपितामहा ॥२५॥

कृष्णेंसांगीतलेंगुज । मदंशदेवचतुर्भुज । प्राप्तहोईलतेथेंतुज । ब्रम्हवरेकरुनिया ॥२६॥

पतीतोचिनारायण । लाधोविधेमजलागुन । परीइच्छितेंमाझेंमन । द्विभुजकृष्णसंभोगा ॥२७॥

तवप्रसादेवांछित । पूर्णमाज्ञेंनिश्चित । राधायोगेंकेवींघडत । अघटिघडवींदयाळा ॥२८॥

विधिम्हणेऐकतुलसी । सुदामागेपकृष्णाशी । गोलोकींततोतुजशी । वांछितहोताभोगाया ॥२९॥

नझालेंत्याचेमनेप्सित । राधायोगेंभयचकित । जातिस्मरेतुजसत्य । ठावेंअसेंवृत्तहें ॥३०॥

राधाशापेतयाशी । जन्मझालेदनुवंशी । शंखचूडनामत्याशी । दुजानसेतत्सम ॥३१॥

शूरवीरमोठाधीर । कांतदांत उदार । ज्ञानींमानीदानवेश्वर । पतीसांप्रततोचितुझा ॥३२॥

शापयोगेंवृक्षरुप । होसीलभारतीअनुप । कृष्णासहसुखरुप । विहरसीलवृंदावनीं ॥३३॥

तुझ्यापत्रावांचून । सांगनोहेविष्णुपूजन । नैवेद्यनकरीग्रहण । पत्रावांचूनश्रीहरी ॥३४॥

राधेचाघेहामंत्र । षोडशाक्षर अतिपवित्र । जपतांयाशींअहोरात्र । राधेसमहोसीतूं ॥३५॥

कृष्णासहरासमंडळी । क्रीडसीलचिरकाळी । मद्वरेंतुजतेवेळीं । नपाहेकदातीराधा ॥३६॥

एवंदेऊनवर । उपदेशूनमनुवर । गुप्तझालादेववर । आनंदझालातुलसीते ॥३७॥

करुनीदिव्यभोजन । तपश्रमगेलेहिरोन । मंचकांवरीकलेंशयन । सुखेंकरुनतेसमई ॥३८॥

ह्रदईस्फुरलामदन । विव्हलझालीतेक्षण । तवविधीआज्ञेकरुन । शंखचूडपातला ॥३९॥

तोहीयूनदेखणा । शूरधीरशाहणा । सन्मुखयेऊनभाषणा । आरंभिलेंतयानें ॥४०॥

कोणाचीतूंइंदुवदनी । किमर्थराहिलीसवनीं । दासतुझाहामानुनी । भाषणकरीपिकस्वरे ॥४१॥

वाक्यतयाचेऐकून । सस्मित आणिनम्रवदन । मारीतयावामलोचन । भाषणकरीतेंवेळीं ॥४२॥

धर्मध्वजाचिमीसुता । वनींराहेतपाकरितां । तूकोणजायपरता । प्रयोजनकाय असें ॥४३॥

कुलोत्पन्नाकामिनी । जनींवनींएकाकिनी । कुलीनतिजसीपाहुनी । नभाषतीऐकिलें ॥४४॥

असत्कुलींउत्पन्न । लंपटजोज्ञानहीन । त्याचेचंचळतेंमन । कामिनीशींदेखतां ॥४५॥

नारीविषघटाकार । दर्शनमात्रेचिमधुर । उन्मत्तवाचासुंदर । अंतरीकपटजियेच्या ॥४६॥

स्वकार्यांचेंसाधन । होयतोंवरीआधीन । अंतरसदामलीन । मुखमात्रदेखणें ॥४७॥

स्त्रीचेंगहनचरित । पुराणींदोषवर्णित । स्त्रियामनींनाहींप्रीत । शत्रुमित्रतेथेंकैचा ॥४८॥

बाहेरलाजदाखवी । एकांतींनांवेठेवी । वरिसाधुताबरवी । वांछाअंतरीसंभोग ॥४९॥

ऐश्यास्त्रियांचाविश्वास । नकरिकदाप्राज्ञपुरुष । विषयहाकेवळविष । त्याचेस्थळव्याळीही ॥५०॥

शंखचूडबोलेंतिशी । तूंजेंसर्वबोलशी । लटिकेंनसेंसर्वदेशी । सत्यहीपूर्णनसेंहें ॥५१॥

सर्वांचेअतिमोहन । स्त्रीसकरीविधीनिर्मांण । दोनप्रकारत्याचेजाण । सत्यासत्यभेदानें ॥५२॥

प्रकृतीचेपांच अंश । स्त्रीरुपजेंतदंश । निर्दोष आणियशस्य । सर्वमंगलरुपतें ॥५३॥

सर्वांतहेंउत्तम । रजोरुपतेमध्यम । भोग्य असेकामिकाम । स्वर्वेश्यादिजाणिजे ॥५४॥

तमोरुपतेंअधम । तेथेंनकीजेसंभ्रम । कुलीनासीनुपजेकाम । देखतांकदातयाशीं ॥५५॥

विरंचीचेआज्ञेवरुन । शंखचूडमीआलोंजाण । प्रेमेंतुझेंपाणिग्रहण । करीनसर्वजाणसी ॥५६॥

एवंतियेसीबोलून । सवेकेलेंपाणिग्रहण । झालातीशींरममाण । रसवेत्तारसिकेशी ॥५७॥

नगींनगींवनींवनीं । क्रीडाकरीसकामिनी । एकमनवंतरसुखानीं । रमलासुखेंराजेंश्वर ॥५८॥

पूर्वीचतेणेंदेवजिंकिले । स्थानभ्रष्टसर्वझाले । विधिहरासह आले । वैकुंठलोकांतेधवा ॥५९॥

विष्णुशीदेवप्रार्थिती । वृत्तसर्वकळविती । हरिबोलेतयाप्रती । जाणतोशंखचूडा ॥६०॥

कृष्णासखोगोलोकीं । सुदामागोपतदंशकी । विरजासंगेकृष्णमुखी । राधाकरीनिंदेते ॥६१॥

कृष्णसखातोप्रेमळ । राधेवरीकोपेतत्काळ । राधासख्यातयेवेळ । ताडनकरितीतयाशी ॥६२॥

तोहीतयाकरीताडन । स्वयेंकरीतसेरुदन । राधातेव्हांकोपोन । दानवहोयम्हणेत्यासी ॥६३॥

तेव्हांतोअतिदुःखित । कृष्णापासीगेलारडत । राधाहीतयासमजावीत । कोठेंजातोम्हणूनी ॥६४॥

श्रीकृष्णेंराधिकेशी । समजाविलेंपरियेशी । सत्यकरावयातववाणीसी । क्षणार्धएकजाऊदे ॥६५॥

क्षणार्धमात्र अवसर । तेथेंतेंचिपृवीवर । होतेंएकमन्वंतर । शापयोगेंपातला ॥६६॥

तोहासुदामासाच । कृष्णभक्तमहाउंच । दीधलेतयासीकवच । कृष्णांकितश्रीष्कृणें ॥६७॥

तेणेंजाहलाअजिंक । पतिव्रतेमाजीअधिक । तुलसीस्त्रीरतिरुपक । गोपीतिहीगोलोकी ॥६८॥

नष्टहोतांपतिव्रत । शंखचूडाप्राणघात । ब्रम्हाएवंनिर्मीत । मृत्युत्याचादेवान्य ॥६९॥

विप्ररुपमीकरुन । कवचत्याचेआणीन । त्याचेस्त्रिसीछळीन । भोगीनतीसकपटानी ॥७०॥

शिवेंघेऊनिमाझाशूल । युद्धीमारावातोप्रबळ । एवंवदोनीविश्वपाळ । शूलदेतशंकरा ॥७१॥

सर्वदेवगेलेस्थानी । वटमूळींतोशूलपाणी । चंद्रभागातटीबैसोनी । चित्ररथाधाडिले ॥७२॥

शंखचूडाचेनगर । महेंद्रभुवनाकार । साततयासीप्राकार । पांचयोजनविस्तीर्ण ॥७३॥

लांबीत्याचीदशयोजन । वनोपवनेंशोभन । पशुपक्ष्याहीसंकीर्ण । वापीकूपतडागादी ॥७४॥

सतखणीनंवखणी । घराच्यादिव्यवळचणी । पुष्पदंतदूताग्रणी । नगरांतरीप्रवेशला ॥७५॥

मध्येंदेखिलाराजवाडा । बाराकक्षासुरवाडा । उभारिलादिव्यहुडा । रक्षकतिष्ठतीसर्वत्र ॥७६॥

शत्रुसतेअतिदुर्गम । इतर सर्वांसीस्रुगम । शुलहस्तगतक्लम । दुतद्वारींतिष्टती ॥७७॥

दूताशीसांगतांवृत्त । चित्ररथातेनरोधित । ऐकतांचिरणवृत्त । आनंदतीशूरते ॥७८॥

एवंतोपुष्पदंत । प्रवेशलाराजसभेत । सर्वावयवसुकांत । शंखचूडदेखिला ॥७९॥

बैसलासेसिंहासनी । शोभलसेवस्त्राभरणी । सुगंधहारचंदनी । स्वर्णछत्रवरीशोभे ॥८०॥

तीनकोटीपार्षदगण । सेवितिरम्यभूषाभरण । शतकोटीआणिक अन्य । शस्त्रापाणीशोभती ॥८१॥

सकल ऐश्वर्याचिशोभा । सकळसौंदर्याचागाभा । सकळतेजस्व्याचीप्रभा । एकवटलीयेथेंची ॥८२॥

एवंनृपवरादेखोन । दूतबोलेमृदुवचन । शंकरदूतमजजाण । शिववाक्य ऐकिजे ॥८३॥

तुझ्याभयेवरुन । देवगेलेविष्णुसशरण । शिवासीशूलदेऊन । प्रेषिलासेनारायणें ॥८४॥

देवराज्यदेवादेईजे । अथवायुद्धासियेईजे । उत्तरमजसांगिजे । कायवंदूशंकरा ॥८५॥

ऐखतांचितेणेंहासोन । जाप्रभातींयेईन । सांग उमेशालागुन । वदुनीदूतविसर्जिला ॥८६॥

दूतआलपरतोन । शिवाकथिलेंवर्तमान । स्कंदादितेव्हांप्रथमगण । शिवाजवळीपातले ॥८७॥

वीरभद्रनंदीविशालाक्ष । वाणसुभद्रपिंगलाक्ष । विकंपनविकृतीविरुपाक्ष । काळकंठकुटीचर ॥८८॥

विकटदीर्घदंष्ट्रकपिल । ताम्रलोचनआणिबाष्कल । रणश्लाघीउन्मत्तबल । दुर्जयदुर्गमकालजिव्ह ॥८९॥

कीर्तिमुख आणिबलभद्र । चंडतैसाबलिभद्र । अष्टभैरव आणिरुद्र । एकादशपातले ॥९०॥

अष्टवसूद्वादशभानू । चंद्रतैसेसूर्यसूनू । विश्वकर्माहुताशनू । कुबेर इंद्रजयंत ॥९१॥

नलकुबेरवायूवरुण । बुधमंगलईशान । धर्मशनींपंचबाण । देवसैन्यपातले ॥९२॥

चंडाआणिउग्रदंष्ट्रा । कैटभीआणिकोटरा । भद्रकालीभयंकरा । पातलीतेथेंप्रत्यक्ष ॥९३॥

रत्नविमानीबैसली । रक्तवस्त्रनेसली । रक्तपुष्पमाळागळीं । गातनाचतहसतसे ॥९४॥

चक्रगदापद्मदर । खड्गचर्मचापशर । भक्तासिजेअभयकर । भयप्रददुष्टासी ॥९५॥

एकयोजनविशाळ । जिव्हाकरीलळलळ । हातींकपालवर्तुळ । एकयोजनखोलजे ॥९६॥

त्रिशूलेंस्पर्शिलेंगगन । शक्तीलांबएकयोजन । मुदगरमुसलभीषण । खेटपट्टिशपरिघादि ॥९७॥

विष्णुवरुणहुताशन । गांधर्वब्राम्हनारायण । गारुडवायूजृंभण । पर्वतवज्रसर्पास्त्रे ॥९८॥

माहेश्वरदंडमोहन । पाशुपततैसेंपर्जन्य । नागपाशसुदर्शन । अव्यर्थादिसर्व अस्त्रें ॥९९॥

तीनकोटीयोगिनी । भूतेंप्रेतेंडाकिनी । ब्रम्हराक्षसशाकिनी । वेतालयक्षराक्षस ॥१००॥

किन्नरचारणघेउनी । विकटगणकोटीतीनी । स्कंदसर्वाचासेनानी । पित्याजवळीपातला ॥१०१॥

दुतजातांचिसभेंतून । नृपेंसभाविसर्जुन । अंतःपुरीजाऊन । रणवृत्तसांगेप्रियेशी ॥१०२॥

ऐकतांचिरणवृत्त । तुलसीझालीशोकान्वित । हेंकायवदसीकांत । वियोगकेवींहोतसे ॥१०३॥

आहारविहारभाषण । करीराजेंद्राएकक्षण । तूंप्राणाचाहीप्राण । विनापराधेकांत्यजिशी ॥१०४॥

वाक्यप्रेमपाहून । नृपवरेंकेलेंभोजन । कांतेसीस्वांकीबसून । समजावीतमहाज्ञानी ॥१०५॥

कांतेशोकाचेंकारण । काययेथेंउत्पन्न । योगवियोगकालेंकरुन । दैववशेंहोतसे ॥१०६॥

कोणपतीसंबंधकैचा । फांसापडलामोहाचा । अज्ञानटाकोनीमनोवाचा । सावधपाहेविचारुनी ॥१०७॥

तूंकृष्णाचीकामिनी । तदर्थतपसीबदरीवनीं । अन्यजन्माघेऊनी । लाधसीलविष्णूते ॥१०८॥

गालोकींजाशील । कृष्णासवेरमशील । तेथेंमजपाहशील । व्यर्थशोककासया ॥१०९॥

कृष्णदत्तदिव्यज्ञान । पावलाजेथेंभांडीखन । तेंकथिलेंतुलसीलागुन । टाकिलाशोकतियेनें ॥११०॥

एवंशंखचूडतियेशी । रममाणझालानिशी । प्रातःकाळींचयुद्धाशीं । शिवासमीपपातला ॥१११॥

तीनशतेंआणिवीस । श्लोकरम्यभागवतास । वर्णिलेंतुलसीचरित्रास । प्राकृतयेथेंअंबे ॥११२॥

श्रीदेवीविजयेनवमेषष्टः ॥६॥  

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP