नवम स्कंध - अध्याय नववा
श्री मत्स्वच्छंदानंदानी रचिलेल्या प्रसिद्ध देवी भागवतसाराचा मराठी अवतार म्हणजे प्रस्तुत ‘ श्री देवी विजय ‘ ग्रंथ होय.
श्रीगणेशायनमः । नारदम्हणेनारायणा । वदेसावित्रीआख्याना । केवींकेलीआराधना । कोणीपूर्वीभारती ॥१॥
नारायणम्हणेमुनी । सावित्रीहीवेदजननी । प्रथमपूजिलीब्रम्ह्यानीं । वेदेंमगपूजिली ॥२॥
मगपूजिलीपंडिती । चौथापुजी अश्वपतीं । सर्वहीतेव्हांपूजिती । भारतांमाजीद्विजगण ॥३॥
गोलोकांमाजीविधीस । कृष्णोंदिलीसावित्रीस । तीनजायब्रम्हलोकांस । ब्रम्हातेव्हांस्तवीतसे ॥४॥
मगकृष्णेंउपदेशिलामंत्र । रंचिनेंजपिलापवित्र । माध्यंदिनोक्तस्तोत्र । चतुराननकरीतसे ॥५॥
सतचित आनंद । तयाचाजोमूलकंद । प्रकृतिब्रम्ह अभेद । रुपतुझेंसावित्री ॥६॥
हिरण्यगर्भजोविराट । तीचस्वयेतूंस्वराट । रविआणिहव्यवाट । रुपतुझेंसावित्री ॥७॥
नित्यजेंनिर्विकल्प । नुठेंजेथेंसंकल्प । नाथोरनाअल्प । रुपतुझेंसावित्री ॥८॥
नित्यतेंचिप्रियकर । स्वयेंनित्यनिर्विकार । नित्यानंदपरिकर । रुपतुझेंसावित्री ॥९॥
दूरहोय अमंगल । ऐसेंजेंसुमंगल । सर्वमंगलमंगल । रुपतुझेंसावित्री ॥१०॥
द्विजजातीचेंजीवन । द्विजासदांप्रसन्न । अजाअनेकजाद्विजाभान । रुपतुझेंसावित्री ॥११॥
वर्णसारमंत्रसार । वेदसारप्रणवसार । सर्वसारब्रम्हसार । रुपतुझेंसावित्री ॥१२॥
सर्वपापाचेदहन । सर्वापराधक्षमण । जन्ममृत्यूचेंशमन । रुपतुझेंसावित्री ॥१३॥
सुखकारकभयहारक । स्वर्गदायकमोक्षविधायक । सर्वजगन्नायक । रुपतुझेंसावित्री ॥१४॥
परात्परातूंचिदघन । होय आतांप्रसन्न । ऐकतांचिऐसेंवचन । पतित्वेंवरिलेंविधीसी ॥१५॥
विधीसहसत्यभुवनीं । गेलीतेव्हांवेदजननी । वेदांहीमगस्तवूंनी । प्रमाणवाक्यजाहलें ॥१६॥
ऋषीनीतेव्हांस्तविली । ज्ञानकळालाधली । अश्वपतीनेंस्तविली । सविस्तर ऐकतें ॥१७॥
भद्रदेशीचानृपती । नामेंजाण अश्वपती । पत्नीत्याचीमालती । महासतीसुंदर ॥१८॥
वंध्याझालीतीनारी । सावित्रीचेंध्यानकरी । फळनसेबहुवत्सरीं । दुःखितझालींतेधवा ॥१९॥
स्त्रीचेकरीसमाधान । स्वयेंपुष्करांजाऊन । सावित्रीचेआराधन । शतवर्षेंकरीनृप ॥२०॥
तरीप्रत्यक्षनझाली । आकाशवाणीवदली । जरीत्वांदशलक्षजपली । गायत्रीतरीभेटेल ॥२१॥
नृपजोंऐकेंसाचार । तवपातलापराशर । नृपेंपूजूनिसादर । बैसविलेंवरासनी ॥२२॥
ऋषीम्हणेअश्वपती । गायत्रीमहिमातुजप्रती । सांगतोऐकएकचित्ती । उपदेशीनसत्यत्वें ॥२३॥
उच्चारितांएकवार । पापनासेचारप्रहर । जपितांजीसदशवार । अहोरात्रपापनासे ॥२४॥
मंत्रजपिताशत । पापजळेंमासार्जित । सहस्रवारजोजपत । वर्षकृतपापनासे ॥२५॥
लक्षजपेंजन्मकृत । दक्षलक्षेंपूर्वार्जित । कोटिजपेंनाशहोत । सर्वजन्मपातकांचा ॥२६॥
दशकोटीमंत्रजपता । होयविप्रामुक्तता । इतरवर्णींहेचिजपतां । कल्पवरीतयानर्क ॥२७॥
त्रिकालसंध्योपासन । आजन्मकीजेद्विजान । नकरीतोशूद्रसमान । स्पर्शूंनयेतयांशी ॥२८॥
जोविप्रसंध्याहीन । पितरनघेतीत्याचेंअन्न । व्यर्थत्याचेपिंडतर्पण । नर्ककीटसमानतो ॥२९॥
एवंतयासीसांगून । गायत्रीतेउपदेशून । पराशरगेलानिघून । नृपकरीजपाते ॥३०॥
जपहोतांदशलक्ष । सावित्रीझालीप्रत्यक्ष । करुनीकृपाकटाक्ष । अभिष्ठत्याचेदेतसे ॥३१॥
कन्याप्रार्थीतवभार्या । पुत्रवांछिसीनृपवर्या । दोनींहीक्रमेंकरुनिया । प्राप्तहोतीलमद्वरें ॥३२॥
ऐसादेउनीवर । गुप्तझालीसत्वर । रावपातलास्वनगर । कृतकृत्यमानीतसे ॥३३॥
पूर्वीकन्याजाहली । चंद्रमुखीतेजागळी । जातकहर्षेतेवेळीं । नृपकरवीतियेचें ॥३४॥
सावित्रीनामठेविलें । नृपेंद्रव्यबहुवाटिलें । दोघेहीअतिआनंदलें । नागरीकसर्वही ॥३५॥
कन्याझालीउपवर । रुपलावण्याचीसागर । शीलगुणाचीआकर । अंशरुपेंसावित्री ॥३६॥
नृपम्हणेंकन्येलागून । तुजयोग्यवरपाहून । तूंचिपाहेशोधून । विवाहमगकरीनमी ॥३७॥
ऐसेंतिजसीबोधून । सवेदिलेवृद्धप्रधान । शिबिकांदिसर्वदेऊन । पाठविलीतियेशी ॥३८॥
देशोदेशीचेराजसुत । सावित्रीनाणीध्यानांत । ऋषिआश्रमींतेव्हांपाहत । द्युमत्सेनपुत्रासी ॥३९॥
अंध असेभूपती । राज्यभ्रष्टवनांप्रती । पुत्रतयाचासुकृती । सत्यवाननामत्याचे ॥४०॥
तयांकेलेंअवलोकन । सावित्रीआलीपरतोन । नृपाकळवींवर्तमान । नारदतेथेंतयेवेळीं ॥४१॥
ऐकतांचिऐसीमात । मुनीतेव्हांस्तब्धहोत । नृपमुनीसीपुसत । मुखविकारपाहूनी ॥४२॥
नृपम्हणेमुनिवरा । योग्यनसेकींनोवरा । मजसांगाकरुणाकरा । गुजकाय असेंतें ॥४३॥
नारदम्हणेनृपती । कायसांगुदैवगती । योग्यपरीतयाप्रती । आयुष्य अल्पबहुत ॥४४॥
एकसंवत्सरांतीं । मृत्युतयांनिश्चिती । अन्यनृपसुताप्रती । कन्यादेईंनृपाळा ॥४५॥
सावित्रीसम्हणेपिता । अन्यपाहेराजसुता । तीबोलेनृपनाथा । अन्यायकेवींसांगसी ॥४६॥
एकदांज्यामनेंवरिलें । मुख्यलग्नतेव्हांचिझालें । अन्यपुरुषांजरीचिंतिले । व्यर्थगेलेंसतीत्व ॥४७॥
परपुरुषींइच्छाकेली । तीस्त्रीहोयपुंश्चली । मीउत्पन्नदिव्यकुळीं । भलतेंकेवींघडेल ॥४८॥
एकसोडूनसत्यवान । सर्वपुरुषतुजसमान । सुखदुःखदैवाधीन । भोगणेंअवश्यसर्वांशीं ॥४९॥
तयासीदेईंमजत्वरित । जरीहोईलविपरीत । प्रवेशकरीनपावकांत । पतीसवेनिश्वयें ॥५०॥
वाक्य ऐकतांनिश्चित । रावपडलामूर्छित । हाहःकारतेव्हांहोत । राजमहालींदुःखानें ॥५१॥
मालतीनेमात ऐकिली । दुःखाग्नीनेंपोळली । बोधकरीततेवेळीं । नृपादिकानारद ॥५२॥
नृपाशोकनकरी । उपायसांगेननिर्धारी । आयुवाढेऐशीपरी । सावित्रीसीसांगतो ॥५३॥
मगसावित्रीचेंव्रत । सांगेमुनीसावित्रीप्रत । स्वस्थकरुनीसर्वचित्त । मुनीगेलाअन्यठायीं ॥५४॥
सखेदतेव्हांअश्वपती । कन्येसहवनाप्रती । विवाहविधानेंत्वरिती । कन्यादिलीसत्यवंता ॥५५॥
राव आलागृहांसी । सावित्रीराहेआश्रमासी । सेऊनसासुश्वराशी । पतिसेवातत्पर ॥५६॥
मनीतीचिंताकरी । कोणानकळवीबाहेरी । व्रतनियमेंआचरी । जेवीकथिलेंऋषीनें ॥५७॥
पितृआज्ञेकरुन । वनींजायसत्यवान । सासूबाईसविचारुन । सवेंगेलीसावित्री ॥५८॥
काष्ठार्थवृक्षीचढला । दैवयोगेंखालींपडला । सत्यवंताचाप्राणगेला । क्षणनलगतांसवेग ॥५९॥
सावित्रीतीमहासती । पाहिलेंतिनेंयमाप्रती । अंगुष्ठमात्रपुरुषपती । पाशेंबांधूननेतसे ॥६०॥
यमामागेचालिली । यमेंतिजलापाहिली । तिजसाबोलेमधुरबोली । साधुश्रेष्ठयमधर्म ॥६१॥
सावित्रीनवलकायकरिसी । देहासहितकोठेंयेशी । पतिसवेंगमन इच्छिशी । देहत्यागुनियेईजे ॥६२॥
पंचभूतांचेनश्वर । घेउनियाकलेवर । नप्रवेशेममपूर । असे एवंमर्यादा ॥६३॥
तवपतीचेंआयुसरलें । स्वकर्मपाहिजेंभोगिले । ममपुरासीकर्मबळें । पतीतुझाजातसे ॥६४॥
कर्मेंचहोयजन्ममरण । सुखदुःखस्वर्गादिजाण । शोकनर्ककर्माधीन । प्राप्तहोयजतुशी ॥६५॥
कर्मेंच इंद्रमित्रविधी । कर्मेंचजीवासर्वसिद्धी । कर्मेज्ञानसमाधी । चतुर्विधपुरुषार्थ ॥६६॥
हरिहरसूर्यगणेश । कर्मेंचपावेंवर्णेश । कर्मेचहोयमुनीश । म्लेंच्छनीचकर्मेची ॥६७॥
पशुपक्षीजलचर । क्षुद्रकृमीस्थावर । भूतपिशाच्चकिन्नर । सर्पादिककर्मेंची ॥६८॥
ऐकून ऐसेंवचन । सतीकरीयमस्तवन । भक्तियुक्तकरीप्रश्न । मृदुवाक्येंपतिव्रता ॥६९॥
कर्मम्हणजेकाय असें । कोणापासूनहोतसे । हेतुतयाकाय असें । कर्ताकोणतयाचा ॥७०॥
कोणदेहीदेहकोण । कायबुद्धीकैसेप्राण । भोक्ताभोगविताकोण । ज्ञानकैसेंअसेंतें ॥७१॥
कोण इंद्रियेंकायलक्षण । तयांच्यादेवतांकोण । केव्हांभोगसंपूर्ण । प्रायश्चित्ततेंकाय ॥७२॥
कोणजीव आत्माकोण । सर्वसांगिजेउघडोन । स्त्रीजातीमीअज्ञान । योग्यतूचिसांगावया ॥७३॥
यमम्हणेऐकसती । तोधर्मजोवेदगाती । वेदबाह्य अधर्मनिश्चित्ति । कर्मतेचीउत्कृष्ट ॥७४॥
अशुभतेंधर्मरहित । अमंगलवेदरहित । देवसेवाअनिश्चित । संकल्पहीनहोयजरी ॥७५॥
कर्माचेंकरीनिर्मूल । भक्तीउपजवीनिर्मल । द्विविधभक्तीचेंफल । हरिरुपवानिर्वाणदा ॥७६॥
निर्वाणएकतेचिअसे । वाणीमनाजेंनगवसे । निर्गुणभक्तस्रमरसे । जळांमाजीलवणापरी ॥७७॥
निरिच्छजेंसेवन । तेणेंउपजेसत्यज्ञान । जन्मव्याधीजरामरण । भयहानीतयानसे ॥७८॥
हरीचेजेभक्तजन । तेनवांछितीनिर्वाण । केवळवांछितीसेवन । हरीरुपसदैवते ॥७९॥
योगीजेब्रम्हवित्तम । निर्वाणवांछितीपरम । कर्मबीजजोआत्माराम । फलदातातोचिपै ॥८०॥
कर्मम्हणजेईश्वर । प्रकृतीचाजोअहंकार । कर्मफलाचादातार । भोक्तातोचिजाणिजे ॥८१॥
सर्वकर्माचेंकारण । प्रकृतीपुरुषजाण । देहहातोनाशवान । सृष्टीसूत्रपंचभुतें ॥८२॥
देहीजीवकर्मकर्ता । आत्मायाचाकरविता । जीवतोचिकर्मभोक्ता । सुखदुखभोगहे ॥८३॥
मुक्तीतीचनिष्कृती । खोटेखर्याचीप्रतीती । ज्ञान अथवाबीजम्हणती । पंडितयांसीकर्मांचे ॥८४॥
बुद्धीजीनिश्चयात्मिका । ज्ञानबीजतीऐका । वायुभेदप्राणवाचका । कर्मप्रेरकमानस ॥८५॥
कर्णनेत्रत्वचाध्राण । पांचवेसावित्रीरसन । अंगरुपेंप्रेरकजाण । सर्वकर्मेसुखादि ॥८६॥
सूर्यवायुधरारची । देवतेंजाण इंद्रियांची । परिव्याप्त आत्मातोची । मुलीआतांसुखेंजाईं ॥८७॥
सावित्रीम्हणेताता । पतीसतुजसोडून आतां । जाऊंकोठेंज्ञानवंता । पुसेनतेसर्वसांग ॥८८॥
कोणेंकर्मेंकोणयोनी । जातोकेवीहाप्राणी । स्वर्गनर्कमोक्षतीनी । कोणकर्मेंलाभती ॥८९॥
योगीरोगीदीर्घजीवी । सुखिदुःखिअल्पभांवी । काणाबहिरालंगडाकेवी । उन्मत्त अंधकोणकर्में ॥९०॥
लोभीचोर अंगहीन । सिद्धीविभवाकर्मकोण । क्षत्रिवैश्यब्राम्हण । शूद्रम्लेंछकोणकर्में ॥९१॥
कोणव्याधीकोणपातक । कोणेंपापेंकोणनर्क । वैकुंठ आणिगोलोक । प्राप्तहोयकोणकर्में ॥९२॥
ऐकतांचिप्रश्न उत्तम । विस्मितझालामनीयम । कर्मविपाकपरम । आरंभिलायमानें ॥९३॥
बारावेंवर्षतुजमुली । ज्ञानतुझेंअतिनिर्मली । सौभाग्यवतीतुजकेली । प्रसन्नमनेंअखंड ॥९४॥
आणिकजेंपाहिजें । मागमज अतिचोजें । करीनतुझीसर्वकाजे । धर्मकन्येपतिव्रते ॥९५॥
ऐकतांसावित्रीवचन । म्हणेसत्यवंतापासून । औरसपुत्रबलवान । शंभरमज असावे ॥९६॥
ममपित्यासीशतबाळें । स्वशुराचेयावेडोळे । पृथ्वीचेंराज्यसगळें । प्राप्तव्हावेंपतीस ॥९७॥
लक्षवर्षेंपतीसह । भोगुनियास्रुखसमूह । अंतिजावेंहरिगेह । पतीसह आनंदे ॥९८॥
एवंसर्वदेईजे । कर्मविपाककथनकीजे । गुरोआतांकृपाकीजे । बाळहट्टपुरवावा ॥९९॥
यमम्हणेसर्व इच्छित । होईलममवरेंसत्य । जीवकर्माचेंऐकतथ्य । सावधानमानसें ॥१००॥
शुभाशुभकृतीं । तयाजन्मभारतीं । उभयभोगनमिळती । अन्यक्षेत्रींएकदां ॥१०१॥
स्वर्गींभोगसर्वशुभ । नर्कभोगतोअशुभ । एकत्रदोनीशुभाशुभ । भोगहोयभारती ॥१०२॥
दुर्लभजाणमनुजपण । तयांमाजीब्राम्हण । तयांमाजीकर्मनिपुण । ब्रम्हनिष्ठसुदुर्लभ ॥१०३॥
निष्कामजेब्राम्हण । निरुपद्रवतेचिजाण । जीवमुक्त आनंदघन । निर्विकल्पब्रम्हते ॥१०४॥
जेअसतीसकाम । साधितीनित्यस्वधर्म । सत्यलोकतयासुगम । पुन्हायेतीभारती ॥१०५॥
पुन्हाहोतीब्राम्हण । कालेंकरुन उपजेज्ञान । करितीतेमोक्षसाधन । मुक्तहोतिक्रमानें ॥१०६॥
जोज्याचाभक्त । त्यालोकांतोजात । जोस्वधर्मनिरत । सर्वलोकींजायतो ॥१०७॥
स्वधर्माचेंआचरण । करितीजेचारीवर्ण । उत्तमलोकतयालागुन । वैपरीत्येनर्कमिळें ॥१०८॥
जेकरितीकन्यादान । चंद्रलोकींत्यांचेंगमन । चौदाइंद्रपरिपूर्ण । सुखवासतोवरी ॥१०९॥
कन्यादेतीसालंकृत । द्विगुणफलभोगित । निष्कामतेविष्णुप्रत । प्राप्तहोतीसुखानें ॥११०॥
सोनेरुपेंवस्त्रघृत । जलदुग्धफलदेत । चंद्रलोकीतोजात । एकमनुवसतीते ॥१११॥
तांबेसोनेवस्त्रेंगाईं । देतांसूर्यलोकांजाईं । अयुतवर्षेंतेठायीं । वसेसत्पात्रींअर्पिता ॥११२॥
भूमीधेनुविपुलधन । देतांविष्णुसंनिधान । यावतच्चंद्रपूषण । तोंवरीवासश्वेतद्वीपीं ॥११३॥
ज्याज्यादेवांगृहदान । करीसत्पात्रपाहून । तत्तल्लोकींवासस्थान । रेणुमानाब्दमिळेत्या ॥११४॥
महालदेतांचौगुण । विपुलजरीदशगुण । अतिमोठेंशतगुण । ब्रम्हदेवबोलिला ॥११५॥
तडागकरितांदान । जनलोकरेणुमान । चारहस्तधनुप्रमाण । चारसहस्रधनुष्यें ॥११६॥
लांबीरुंदीएवंमान । वापीम्हणवेसमान । मळकाढितांतद्दान । फलहोयजीर्णोद्धारे ॥११७॥
पिंपळासीबांधीपार । तपोलोक अयुतवत्सर । ध्रुवलोकींसाचार । पुष्पोद्यानदानेंवसे ॥११८॥
विप्रासीदेतांविमान । मन्वंतरविष्णुसदन । जेवीअसेंविस्तीर्ण । विशेषफलतेवींत्या ॥११९॥
शिबिकादेतांअर्धपुण्य । झुल्याचेंजोकरीदान । शतमन्वंतरेपूर्ण । वासहोयवैकुंठी ॥१२०॥
धर्मशाळाराजवाटे । करितांइंद्रलोकभेटे । नदेतांनोपतिष्टे । भोगाविणसरेना ॥१२१॥
देवतीर्थव्रतदान । साह्यहोयभोगितान । दुर्लभजन्मब्राम्हण । अतिपुण्येंलाधेहा ॥१२२॥
वर्णिलेंतुजकिंचित । प्रारब्ध आणिसंचित । क्षयतयाचानहोत । वासनाक्षयावांचूनी ॥१२३॥
दोनशतत्रयोदश । भागवतश्लोकसुरस । सावित्रीचेंआख्यानास । वर्णनयेथेंकेलेंसें ॥१२४॥
श्रीदेवीविजयेनवमेनवमः ॥९॥
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP