नवम स्कंध - अध्याय आठवा
श्री मत्स्वच्छंदानंदानी रचिलेल्या प्रसिद्ध देवी भागवतसाराचा मराठी अवतार म्हणजे प्रस्तुत ‘ श्री देवी विजय ‘ ग्रंथ होय.
श्रीगणेशायनमः । कवचघेऊनहरी । शंखचूडाचेरुपकरी । बैसूनरथांभीतरी । किंचितसैन्यरचियेलें ॥१॥
येउनीयापुरद्वारी । जयशब्दवाजवीभेरी । प्रकृतीयेऊनसामोरी । नगरांतप्रवेशला ॥२॥
प्रवेशलाअंतःपुरी । तुलसीस आनंदभारी । पतीसपंचार्तिकरी । पायधुतलेप्रेमानें ॥३॥
भोजनादिझाल्यावर । मंचकीदोघेंझालेस्थिर । रणवृत्तपुसेसुकुमार । पतिलागीतेधवा ॥४॥
अनंतविश्वेंजोसंहारी । तयासीझुंझतांसमरी । जयकेवींझालातरी । नवलसांगामजलागी ॥५॥
पुन्हापाहिलेहेचरण । धन्यधन्य आजिचादिन । वाक्य ऐसेंऐकुन । बोलेंतेव्हांश्रीहरी ॥६॥
प्रियेसंग्रामझालाघोर । सर्वहीपाडिलेअसुर । द्वंद्वयुद्धशतवत्सर । शंकरासीजाहलें ॥७॥
पराजयनसेदोघासी । विधीयेऊनमध्यदेशीं । सख्यकरविशिवासी । युद्धतेव्हांसंपले ॥८॥
विधीचेऐकूनवचन । इंद्रपददिलेंसोडून । आलोंआतांपरतोन । शिवगेलाकैलासी ॥९॥
एवंकरुनीभाषण । झालातिशींरममाण । आकर्षणचुंबनालिंगन । रतिसमरमांडिला ॥१०॥
तोआलिंगनादिप्रकार । व्यत्ययासपडलाफेर । तर्किलेंतिणेंसत्वर । पतीनसेमाझाहा ॥११॥
तेव्हांपुसतीहरीशी । कोणतूंकपटविलासी । कापट्येंमजभोगिलेशी । शापितेंआतांमायिका ॥१२॥
शापभयेंतेव्हांहरी । प्रत्यक्षप्रगटेमुरारी । शंखचक्रगदाधारी । चतुर्भुजपद्महस्त ॥१३॥
मेघश्याममनोहर । कोटिमदनसुंदर । कांसेपीतपीतांबर । मुगुटशोभेमस्तकी ॥१४॥
किंचित्शोभेंसुहास्यवदन । गळांशोभेंकौस्तुभरत्न । ह्रदईंश्रीवत्सलांछन । तिलकरेखिलामृगमदे ॥१५॥
एवंरुपदेखून । मूर्छाआलीमोहेकरुन । पुन्हासावधहोऊन । बोलेहरीसीतेधवा ॥१६॥
हेनाथतूंदयाहीन । ह्रदयतुझेंपाषाण । कापट्येंमजभोगून । प्राणघेतलापतीचा ॥१७॥
तोहीतुझाचिभक्त । परिमारिलाव्यर्थ । पाषाणह्रदययथार्थ । पाषाणहोईंममशापें ॥१८॥
एवंहरीशीशापुनी । विलापकरीतीकामिनी । करुणायुक्तज्ञानखाणी । समजावितनयवाक्यें ॥१९॥
तपकेलेंसमजसाठीं । शंखचूडेंतुजसाठीं । ब्रम्हवरेंत्याचिगांठी । आजवरीपडलीतुज ॥२०॥
तवतपाचेंफलद्याया । आलोतुलसीयाठायी । देवकार्यकराया । शापमोक्षार्थतयांच्या ॥२१॥
सुदामानामेंगोपाळ । शापेंझालादानवप्रबल । भक्तपोषमीसर्वपाळ । सखामाझासोडविला ॥२२॥
तूंहीहादेहटाकून । रमेसदृशहोऊन । रमेमजसहवर्तमान । सुखेंरमेचिरकाळी ॥२३॥
हादेहतुझापावन । गंडकीनामेंनदीहोऊन । भारतींलोक उद्धारण । करोआतांपवित्रे ॥२४॥
तवकेशांचाभार । वृक्षरुपहोवोसाचार । तुलसीनामेंतरुवर । ममसंनिद्धप्राधान्यें ॥२५॥
स्वर्गमृत्यूपाताळी । गोलोकींविरजाकुळीं । भांडीरचंपकवनस्थळीं । कुंदमालिकावनांत ॥२६॥
पुण्यरुपमालतीवनी । तैसैंचचंदनकाननी । वासतुझावृंदावनी । ममसमीपसदाअसो ॥२७॥
तुझेंपुष्प अथवापत्र । मज अर्पीजोपवित्र । अर्पिनत्यासीवस्तुमात्र । ममलोकदेईनत्या ॥२८॥
तुझ्यावृक्षाचेमुळी । तीर्थेंराहतीसकळी । तुझ्यादर्शनेंत्रिकाळी । पातकशमेमनुष्याचे ॥२९॥
घटसहस्र अमृत । अथवाधेनूचेअयुत । कार्तिकींतवपत्रदानदेत । फळतयासींतेंहोय ॥३०॥
तुझेंस्पर्शिलेंजळ । अथवापक्वतुझेंदळ । प्राप्तजरीअंतकाळ । सायुज्यत्यासीदेईनमी ॥३१॥
नित्यजोभक्तीकरुन । तवतोयकरीप्राशन । लक्षाश्वमेधाचेंपुण्य । प्राप्तहोयतयासी ॥३२॥
तुझेंकाष्ठाचिदिव्यमाळा । धारणकेलीजेणेंगळां । प्रत्येकपाउलींत्याला । अश्वमेधफलहोय ॥३३॥
तुलसीहातींघेऊन । सत्यककरुनविचन । नकरीजोपालन । कालसुत्रतयाशीं ॥३४॥
पर्वणीद्वादशींसंक्रमण । दोनीसंधीमध्यान्ह । रात्रीअथवाअभ्यंगकरुन । अशुद्ध अथवासुतकी ॥३५॥
रात्रीचेंवस्त्रनेसून । नकरितांजलस्थान । तोडीजोतुळसीपान । तेणेंछेदिलेंशिरमाझें ॥३६॥
त्रिरात्रींचेंशिळेपात । अथवाअसोभूपतित । जलस्पर्शेशुद्धसत्य । मजलागींअर्पावें ॥३७॥
श्राद्धव्रत आणिदान । प्रतिष्ठाआणिदेवार्चन । तुझ्यापात्रेंकरुन । पूर्णहोयसर्वही ॥३८॥
वृक्षाधिष्ठानतुलसी । श्रीकृष्णासहक्रीडसी । लवणाब्धीमदंमाशी । नदीरुपेंपावसील ॥३९॥
स्वतःतूंरमासम । पावसीलममधाम । तवशापेंरुपमम । शैलहोईलतवतीरीं ॥४०॥
कोटिशःतेथेंकीटक । होतीलतीक्ष्णदंष्ट्रक । शिलाकोरुनसम्यक । अनेकचक्रेंकरितील ॥४१॥
तेचिशालिग्रामदिव्य । नानालक्षणेंअभिनव । पूजितीलजेमानव । भक्तियक्ततवपत्रें ॥४२॥
इच्छितत्यांचेपुरवीन । दुरितकष्टहरीन । सारुप्यादिदेईन । अंतकाळींस्वभक्ता ॥४३॥
एकद्वारचक्रेंचार । वनमालाशोभेसुंदर । जोअसेनीरदाकार । लक्ष्मीनारायणओळखावा ॥४४॥
शालिग्रामपूर्वलक्षण । असेवनमाळेवांचून । तोलक्ष्मीजनार्दन । मोक्षदायकपूजन ॥४५॥
गोष्पद आणिचक्रेंचार । नवनीराभदोनद्वार । रघुनाथमूर्तीसुंदर । वनमाळानसावी ॥४६॥
मेघच्छटाचक्रेंदोन । शालिग्रामजोअतिसान । तोचिजाणावामन । वनमाळारहितजो ॥४७॥
तैसाचजरीसुंदर । वनमाळामनोहर । तोचिजाणाश्रीधर । ग्रहस्तांनीपुजावा ॥४८॥
द्विचक्र आणिस्थूल । नाहींजयांवनमाल । आकारेंअतिवर्तुल । दामोदरजाणिजे ॥४९॥
तैसाचिपरीमध्यम । बाणक्षतदिसेसूक्ष्म । तोचिजाणारणराम । धनुर्बाणचिन्हजो ॥५०॥
सप्तचक्रछत्रभूषण । मध्यम आणिस्वर्णवर्ण । राजराजेश्वरतोजाण । राज्यलक्ष्मीदेतसे ॥५१॥
चौदाचक्रांचाअनंत । स्थूळ आणिनीलकांत । चारीपुरुषार्थदेत । पूजकासीभक्तासी ॥५२॥
द्विचक्रमेघशोभन । मध्यमगोपचक्रसमान । वामभागींलक्ष्मीचिन्ह । मधुसुधनजाणिजे ॥५३॥
एकचक्रीसुदर्शन । गुप्तचक्रगदाधरजाण । द्विचक्र अश्ववदन । हयग्रीव उग्रमूर्ती ॥५४॥
मुखबहुविस्तारिलें । द्विचक्रदंष्ट्रशोभले । नारसिंहरुपझालें । वैराग्यदेतपूजकां ॥५५॥
तैसाचपरीवनमाला । लक्ष्मीनृसिंहझाला । ग्रहस्थेंसुखेंपूजिला । सुखदायकभक्तीनें ॥५६॥
दोनचक्रेंअसतीद्वारीं । श्रीचिन्ह आणिसमाकरीं । वासुदेवतोनिर्धारी । सर्वकामदेतसे ॥५७॥
सूक्ष्मछिद्रेंबहुत । सूक्ष्मचक्रशोभत । नवमेघसमकांत । श्रीधरपूज्यग्रहस्थां ॥५८॥
दोनचक्रेंएकजागीं । स्थूळ असेंपृष्टभागीं । संकर्षणमहायोगी । सुखदेतगुहस्थां ॥५९॥
पीतभासबहुशुद्ध । वर्तुल आणिअविरुद्ध । तयांजाण अनिरुद्ध । गृहस्थासींसुखदेईं ॥६०॥
छत्रसमतोराज्यकर । वर्तुलतोलक्ष्मीकर । दुःखदहोयशकटाकार । शूलाकारमारीतसे ॥६१॥
वाईटजरीमुख । दरिद्र आणिदेईदुःख । पिंगटहनिकारक । भग्नचक्रेंहोयव्याधी ॥६२॥
शालिग्रामजरीविदीर्ण । पूजकांसीहोयमरण । ओळखुनिसुलक्षण । भक्तजनींपुजावा ॥६३॥
शालिग्रामशंखतुलसी । रक्षीलजोएकदेशी । तोमोठापुण्यराशी । विघडितांमहापाप ॥६४॥
एवंतुलसीसबोलून । उगाझालानारायण । तुलसीनेंदेहटाकून । दिव्यरुपजाहली ॥६५॥
तुलसीगंगारमावाणी । विष्णुप्रियाचौघीजणी । तुलसीचरित्रविस्तारुनि । तुजलागीकथियेलें ॥६६॥
सवेघेऊनतुलसी । विष्णुजायवैकुंटासी । सहनझालेंदोघीसीं । परीवाणीसनसोसे ॥६७॥
तिणेंकेलाअवमान । तुलसीझालीअंतर्धान । मनदेवेंगीराप्रार्थून । आज्ञाघेततियेची ॥६८॥
वाणीहोतांप्रसन्न । स्वयेंगेलावृंदावन । तुलसीचामंत्रजपून । नामाष्टक आरंभिलें ॥६९॥
वृक्षसमूहवृंदनाम । पूर्वींप्रगटेअभिराम । तेणेंवृंदावनधाम । नमस्कारवृंदावनें ॥७०॥
असंख्यविश्वेंपुजिली । विश्वपुज्याम्हणतिली । आतांअंतर्हितझाली । विश्वपुजितेनमोस्तु ॥७१॥
पवित्रकेलींभुवनें । नमूंतुजविश्वपावनें । देवानतोषतुजवांचुने । पूजसारानमोस्तु ॥७२॥
आनंददेसीभक्तासी । नंदिनीनामतूंसी । सीमानसेरुपासी । तुलसीतुजनमोस्तु ॥७३॥
एवंकरितांस्तवन । प्रगटलीतुलसीजाण । तिघीनीमगसन्मानुन । वैकुंठासीनेलीती ॥७४॥
विष्णूनीबहुमानिली । पावनाचीपावनझाली । कथाश्रवणेंपापसकळी । दूरहोयनारदा ॥७५॥
पंचेचाळीसएकशत । वर्णिलेंतुलसीचरित । अंबावदलीप्राकृत । भक्तजनाकारणें ॥७६॥
देवीविजयेनवमेष्टमः ॥८॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP