नवम स्कंध - अध्याय दहावा

श्री मत्स्वच्छंदानंदानी रचिलेल्या प्रसिद्ध देवी भागवतसाराचा मराठी अवतार म्हणजे प्रस्तुत ‘ श्री देवी विजय ‘ ग्रंथ होय.


श्रीगणेशायनमः । धर्मम्हणेअन्नदान । करितांअन्नपरिमाण । शिवलोकींतयास्थान । मिळेवर्षेंतीतुकीं ॥१॥

अन्नदानासमान । अन्यनसेंमहादान । देशकालपात्रशोधन । नलगेकाहींयादाना ॥२॥

क्षुधितासदेताअन्न । सर्वदेवतांप्रसन्न । आत्म्याचेहेंसंतर्पण । अनंतफलहोतसे ॥३॥

देवविप्रासीआसन । देतांअयुतवर्षेंप्रमाण । वैकुंठीमिळेस्थान । धेनुदेतांपयस्विनी ॥४॥

तीघेलोमपरिमाण । वैकुंठवासतयाजाण । पुण्यदिनीदेतांचतुर्गुण । शतगुणपुण्यक्षेत्री ॥५॥

विष्णुक्षेत्रींगोदान । फलतयाचेंकोटिगुण । भारतांमाजीगोदान । चंद्रलोक अयुताब्दें ॥६॥

उभयतोमुखींदान । वैकुंठींतल्लोममान । वर्षेंवसेसुखानें । अतिपुण्यहोतसे ॥७॥

वरुणालयींवर्षे अयुत । राहेदेतांछत्रश्वेत । वस्त्रेंदेतांथंडीत । वायुलोकींवसेतो ॥८॥

सूर्यचंद्रपर्यंत । वैकुंठींवासहोत । जोसवस्त्रभक्तासीदेत । शालिग्रामप्रीतीनें ॥९॥

चंद्रलोकींपूर्ववत । राहेजोशय्यादेत । दीपदानेंवासहोत । अग्निलोकींअयुताद्वें ॥१०॥

मिळेंइंद्राचेंअर्धासन । करितांमुलीगजदान । चौदाइंद्रलोकवारुण । अश्वदानेंलाभतसे ॥११॥

बागपंखाचामर । देतांअयुतवत्सर । वायुलोकमनोहर । प्राप्तहोयतयांशी ॥१२॥

धान्य आणिरत्न । देतांघेतादोघेजण । वैकुंठवासतयांलागुन । बहुकालपर्यंत ॥१३॥

जोकरीनामकीर्तन । चिरंजीवतोचिजाण । दोलोत्सवपूर्णमादिन । जिवन्मुक्तहोयकर्ता ॥१४॥

शिवलोकीवसेजाण । करितांविप्रातिलदान । वर्षसंख्यातिलप्रमाण । सुखेंराहेशिवापाशी ॥१५॥

फलदानेंस्वर्गवास । गृहदानेंहोयत्यास । भूमिआणिदासिदास । देतांवैकुंठींवसेतो ॥१६॥

दानेंसर्वभोगसाधन । नचुकेआवागमन । देवीभक्तिवांचून । कदाकाळसावित्री ॥१७॥

देवीमंत्र उपासना । श्रीपुर अक्षयत्याचेंस्थान । तुलसीपत्रदेतांदान । अक्षय्यवैकुंठतयाशी ॥१८॥

नित्यकरीगंगास्थान । तोनरस्रूर्यासमान । त्याचेहोतांदर्शन । वैकुंठवासहोतसे ॥१९॥

गाढतपेंजेव्हांभास्कर । सुवासितसीतलनीर । देतांकैलासीअत्यादर । चौदाइंद्रवसेतो ॥२०॥

सत्तुदेतवैशाखमासी । तोजायशिवलोकासी । करितांजन्माष्टमीव्रताशी । वासवैकुंठींहोतसे ॥२१॥

शिवरात्रीचेंकरीव्रत । शिवलोकींनांदत । बिल्वपत्रशिवाअर्पित । पत्रमानवर्षेंवसेतो ॥२२॥

करीजोशिवार्चन । शिवापुढेंप्रेमेंवर्तन । दिनमानयुगप्रमाण । शिवसंनिधराहेतो ॥२३॥

रामनवमीआचरितां । वैकुंठवासतत्वता । नवरात्रींदेवीपुजितां । बलिदानादिकेंनर ॥२४॥

गजांतमिळेसंपत्ती । पुत्रपौत्रादिसंतती । शिवलोकीहोयवस्ती । यावत इंद्रचतुर्दश ॥२५॥

राधाकृष्णाचेंपूजन । करितांगोलोकस्थान । एकादशींव्रतेंकरुन । वैकुंठवासलाभतसे ॥२६॥

वामनद्वादशीचेंव्रत । तेणेंइंद्रलोकींजात । साठसहस्रवर्षेंपर्यंत । वसेतेथेंसुखानें ॥२७॥

रविसप्तमीसंक्रांत । हविष्यान्नेंएकभुक्त । सूर्याशीजोपूजीत । सूर्यलोकतयाशी ॥२८॥

जेष्ठकृष्णचतुर्दशी । जोपुजीसावित्रीशी । सप्तमन्वंतरेंत्याशी । ब्रम्हलोकवास्तव्य ॥२९॥

माधशुक्लपंचमीदिन । सरस्वतीचेंपुजन । मणिद्वीपींब्रम्हदिन । वासतयाहोतसे ॥३०॥

विप्रादेतांमिष्ठान्न । विष्णुलोकत्याचेंस्थान । कोटिनामकरीस्मरण । जीवन्मुक्तनरतोची ॥३१॥

पार्थिवलिंगपूजन । करितांपावेंशिवस्थान । पृथ्वीचिकरितांप्रदक्षिण । पूनर्जन्मनसेत्या ॥३२॥

अश्वमेधेंकरीयजन । अश्वलोमाब्दमान । इंद्राचेमिळेंअर्धासन । चतुर्गुणराजसूयें ॥३३॥

शक्तिमखतोप्रधान । करितीहरिहरादिजाण । शक्तीचेजेंसेवन । तयासमदुजेंनाहीं ॥३४॥

तिचेस्मरण आणिध्यान । तिचीपूजागायन । तिचेंचव्रतादीसेवन । मनेप्सितदेतसे ॥३५॥

धर्मवाक्य ऐकून । सावित्रीकरीस्तवन । यमाचेतावेदवाक्यान । ललितसुंदरपदानें ॥३६॥

दिव्यक्षेत्रपुष्कर । तपलातेथेंभास्कर । धर्मवरेंधर्मकुमर । पावलातुजनतोस्मी ॥३७॥

सर्वांभूतीजोसमान । म्हणोनीनामशमन । सर्वजीवाचाजोअंत । कृतांततुजनतोस्मी ॥३८॥

प्राणीमात्राशुद्धिकर । दंडार्थतूदडधर । कालतूंचिदुर्निवार । शास्तातुजनतोस्मी ॥३९॥

ब्रम्हनिष्ठतपीयमीं । जितेंद्रियस्वात्मारामी । सर्वज्ञतूंकर्मस्वामी । यमातुजनतोस्मी ॥४०॥

ब्रम्हतेज अतिकांत । पुण्यमित्रभगवंत । कर्मफलदगुणातीत । ईश्वरातुजनतोस्मी ॥४१॥

एवंकरितांस्तवन । यमझालाप्रसन्न । म्हणेबाळेजेकरीतीपठण । स्तवत्यासीनदंडीमी ॥४२॥

अशुभकर्माचेफळ । तिजसींसांगेसकळ । जेंऐकतांचिकेवळ । भयहोयमनुष्यां ॥४३॥

अशुभफळभोगार्थ । नर्ककुंडेनिर्मित । शायसींअसतींख्यात । आणीकहीअसतीबहु ॥४४॥

पापभोगार्थशरीर । मिळेजीवादृढतर । दुःखहोयनिर्भर । परीप्राणकदाजाईना ॥४५॥

सोसावयासीअसेंबळ । होतसेबहुविव्हळ । स्वकर्म आठवेंतेंवेळ । हायहायकरीतसे ॥४६॥

कोणकुंडकेवींअसें । कोणकर्मेमिळतस । केवींजीवभोगीतसे । कितीवर्षेंकोणयोनीं ॥४७॥

सर्वविस्तरेंसांगेन । ऐकेसावित्रीसावधान । नारदातेनारायण । व्याससांगेनृपासी ॥४८॥

वडिलाबोलेकठोर । तयावन्हिकुंडनर्कथोर । खोल असेअपार । धगधगींतपेटलें ॥४९॥

एकक्रोशाचेंवर्तुळ । शतहस्त उठेज्वाळ । प्राणीकरितीतळमळ । मेलोंमेलोओरडती ॥५०॥

निघूंनशकतीबाहेर । दूत उभेसमोर । वरीयेतांदेतीमार । दयाकैचीतयाशी ॥५१॥

देहरोमाब्दमान । त्यांतटाकीतीनेऊन । अरण्यजेंवृक्षहीन । तीनजन्मपशूतेथें ॥५२॥

तेव्हांशुद्धीपावत । भारतीपुन्हांजन्महोत । पापानेंपापवाढत । कैचानिस्तारतयाचा ॥५३॥

विप्र आलाक्षुधित । तयाभोजननदेत । पुर्वमानेंचिटाकित । तप्तकुंडीतयाते ॥५४॥

अर्धक्रोशविस्तार । तप्तोदकभरलेअपार । उकळयाफुटतीनिरंतर । घोरझषजयांमाजी ॥५५॥

मगतप्तीअरण्यांत । पक्षीहोयजन्मसात । रवीअथवासंक्रांत । क्षारघालवितांवस्त्रासी ॥५६॥

वस्त्रतंतूप्रमाण । क्षारकुंडीटाकितीजाण । क्षारोदकतप्तपूर्ण । क्रोशमात्रविस्तारे ॥५७॥

अमाअथवाश्राद्धवासर । नद्यावावस्त्रीक्षार । देतांरजकसाचार । सप्तजन्मतोहोय ॥५८॥

वेदशास्त्रविप्रनिंदक । प्राप्तत्यासीभयानक । राहेतेथेंकल्प अनेक । सर्पयोनिजायतो ॥५९॥

क्रोशमात्रविस्तृत । बहूताडितीतेथेंदूत । जीवतेव्हांआक्रोशत । नकोनकोपुरेपुरे ॥६०॥

तयानाहींप्रायश्चित । चरचराअंगफाडित । मुसळेंशिरेंफोडित । दांतपाडितीगदेनें ॥६१॥

जिव्हाधरोनिओढिती । पाशेंकंठ आवळिती । आतांनिंदापुन्हाम्हणती । क्रोधेदूततयाशी ॥६२॥

जीवकाकुळतीयेती । दूतवरीहाणिती । दीर्घस्वरेंक्रंदती । एवंदुःखदुजेंनसे ॥६३॥

जेहरितीविप्रवृत्ती । विष्ठाकुंडीतेपडती । साठसहस्रवर्षेंखाती । सदाविष्ठापापिष्ट ॥६४॥

हेंकुंड अतिकुत्सित । विष्ठेनेंच असेंपूरित । एकक्रोशविस्तृत । दुर्गंधयुक्तकीटादि ॥६५॥

मगतितुकींचवर्षें । कृमिहोयविष्ठेंतबसे । अन्यतडागींबळासरसे । पाळबांधीआपुली ॥६६॥

मूतेतडागजळांत । पडेतोमूत्रकुंडांत । तदरेणुवर्षपर्यंत । तेंचभक्षीतेथेंराहे ॥६७॥

हेंकुंडकोसदोन । मूत्रभरलेंअतिउष्ण । कीटकतोडितीतीक्ष्ण । अंधक्कार असेबहु ॥६८॥

शतजन्महोयबैल । जोएकलाचिबहुवेळ । मिष्टान्नभक्षीखळ । श्लेष्माकुंडतयासाठीं ॥६९॥

अर्धकोशत्याचेंमान । कफेंझालेंपरिपूर्ण । कीटतोडितीअतितीक्ष्ण । शतवर्षेंतेचिभक्ष्य ॥७०॥

अनंतरप्रेतयोनी । मातापिताकामिनी । पुत्रकन्याअसोनी । जोनपोषींदुष्टत्वें ॥७१॥

तयासीतेंगरकुंड । शतवर्षेंअखंड । कीटकरितींदुःखंड । विषभक्षणसर्वदा ॥७२॥

पूर्ववततयाचाविस्तार । भूतजन्मनंतर । अतिथीपाहतांसमोर । वक्रदृष्टीजयाची ॥७३॥

त्याचेदिलेंलेंजल अन्न । नघेतिदेवपितृगण । ब्रम्हहत्यादिपातकेंजाण । प्राप्तहोतींतयासी ॥७४॥

सर्वपातकांचासखा । पात्रभूतसर्वंदुःखा । तयासाठींनर्कदूषिका । निर्मिलींसेईश्वरें ॥७५॥

नेत्रमलेतोपूर्ण । सर्पादीकीटदारुण । तोडितींजीवाअकरुण । शतवर्षेंतेचभक्षी ॥७६॥

मगजायभूतयोनी । अशुचिसदातोप्राणी । अतिथीकदानावमानी । ईश्वरासितोआवडे ॥७७॥

ब्राम्हणातेदेऊंकेलें । तेंनदेतांअन्यादिले । वासाकुंडप्राप्तझालें । शतवत्सरतयाशी ॥७८॥

चारकोसाचेंविस्तृत वसेनेंअसेंपूरित । कीटकतेथेंतोडित । कठोरदंतेकरुनिया ॥७९॥

सातजन्मखेकडा । दरिद्रीहोयपुढा । रेतपाजितींत्यामूढा । शुक्रकुंडशतवर्षें ॥८०॥

असेंकुंडक्रोशमात्र । शुक्रभरलेंअपवित्र । कीट असतीतीक्ष्णगात्र । भोजनतेचितयाशी ॥८१॥

शतवर्षेंहोयकृमी । शुद्धतेव्हांपरिणामी । गुरुविप्रालोभकामी । रक्तकाढीप्रहारें ॥८२॥

रक्तकुंडीवर्षशत । राहेरक्तचीखात । हेंकुंडदुर्गंधीयुक्त । वापीतुल्यगहनहें ॥८३॥

व्याघ्रहोयजन्मसात । भक्त अश्रुपाहूनहसत । तोशतवर्षेंपर्यंत । अश्रुकुंडीपडतसे ॥८४॥

चारवापीसमान । कुंड असेंमहान । उष्णाश्रूजलेंपूर्ण । तीक्ष्णकीटतोडिती ॥८५॥

त्रिजन्महोयचंडाल । मित्राचाकरीछळ । तयानर्कगात्रमळ । याचेंमापकेवळचारवापीप्रमाणें ॥८६॥

तीनजन्महोयखर । कोल्हाहोयतीनवार । शुद्धतेव्हांसाचार । मित्रछलनकीजे ॥८७॥

बधिरासीजोहसला । कर्णमलनर्कींपडला । सप्तजन्मबहिराजाहला । दरिद्रिहीनांगसातवेळ ॥८८॥

कुंडकर्णमलेंभरलें । पुर्वप्रमाणबोलिलें । दुष्टजतुनीखंडिलें । तेंचभक्षशतवर्ष ॥८९॥

लोभार्थमारिलेप्राणीं । लक्षवर्षमज्जाघाणी । ससामासासातयोनीं । वराहकुक्कुटमृगादी ॥९०॥

पूर्ववतसर्वमान । मांसकुंडतैसेंचिजाण । कन्याक्रयेंलोममान । वासतेथेंभक्ष्यतेची ॥९१॥

माथांदेतीमांसमार । ताडितीतेवारंवार । वापीसम आकार । तीक्ष्णजंतुयूक्ततो ॥९२॥

साठसहस्रवत्सर । विटकृमीतोसाचार । व्याधहोयसातवार । तीनवेळावराह ॥९३॥

कुकुटजळूमेडुक । सातसातवेळकाक । चारकुंडेंनखादिक । प्रमाणत्याचेंचारवापी ॥९४॥

व्रतश्राद्धादिदिनीं । क्षौरकरवीअतिमानी । तोदिवसवर्षमानी । चारकुंडीपडतसे ॥९५॥

सकेशपार्थिवपूजन । तेणेकेशनर्कगमन । मृद्रेणूवर्षमान । म्लेंछहोयहरकोपें ॥९६॥

जोनकरीगयावर्जन । अस्थिकुंडतयालागुन । स्वलोमाद्वमान । सप्तजन्मतोतरी ॥९७॥

स्वस्त्रीगर्भवतीअसतां । ताम्रकुंडतीसभोगितां । दोनकोसाचीत्याचीयत्ता । तप्तताम्रचहूंकडे ॥९८॥

तप्तपुतळयाएकलक्ष । आलिंगवितीसमक्ष । ताडितीदंडेसदावक्ष । हायहायशतवर्षे ॥९९॥

पतीपुत्रहीननारी । भोजनकरितांतिचेघरी । लोहकुंडंनिधारी । रजोदोषान्नजेविता ॥१००॥

पूर्वींपेक्षाहेंद्विगुण । समानसर्वलक्षण । चर्मस्रुराहीदोन । अर्धवापिमानानें ॥१०१॥

लोहकुंडांतीलप्राणी । रजककाकसप्तयोनीं । व्रणीदरिद्रीहोऊनी । शुद्धहोयतेधवा ॥१०२॥

हस्तेंचर्मस्पर्शोन । देवद्रव्यस्पर्शेजाण । शतवर्षेंकष्टमान । चर्मकुंडींपडेतो ॥१०३॥

सेवितांचिशूद्रान्न । सुराकुंडींशतमान । शूद्रयाजीहोऊन । शूद्रश्राद्धेंशुद्धता ॥१०४॥

स्वामीसकरीवाक्ताडण । शाल्मलीनर्कदारुण । दूतकरीतीताडण । अश्वजन्मतयासी ॥१०५॥

लक्षपुरुषमान । कंटकवृक्ष अतितीक्ष्ण । रुततीआंगीभीषण । झाडावरीझुगारिती ॥१०६॥

परासीदेतांविष । नर्कतयासीसविष । राहेतेथेंसहस्रवर्ष । सर्पडसतीपरोपरी ॥१०७॥

एकक्रोशयाचेंमान । शतजन्महोयव्रण । सप्तजन्मकुष्टपूर्ण । शुद्धतेव्हांदुरात्मा ॥१०८॥

गाय अथवाबैल । ताडनकरीजोखळ । तयाकुंडतप्ततैल । युगेंचारतेथेंवसे ॥१०९॥

लोमप्रमाणवृषयोनीं । नर्कहाएकयोजनीं । तप्ततैलाचीयेथेंघाणी । पिळितीपाप्यायमदूत ॥११०॥

लोहखिळ्यानेंजीवमारी । कुतकुंडदुःखभारी । अयुतवर्षानंतरी । सुयोनींत उदरव्यथा ॥१११॥

पूर्ववतयाचेंप्रमाण । लोहशंकुदारुण । अंधःकार असेगहन । ढकलितीआंतमारिती ॥११२॥

उगेंचखायजोमांस । कृमिनर्कमिळेंत्यास । पूर्ववतमानयास । सर्पसमकृमीते ॥११३॥

शुद्रशवाचेंदहन । करितांपूयकुंडजाण । पूर्वींहुनहेंद्विगुण । भयंकरफारहें ॥११४॥

दरिद्रीमूकबधिर । सप्तजन्मशूद्रनर । कृष्णसर्पांचासंहार । सर्पकुंडतयाशी ॥११५॥

लोमवर्षेंतेथेंवसें । सर्पजन्मघेतसे । मगमनुष्यहोतसे । स्वरुज आणिअल्पायु ॥११६॥

पूर्ववतयाचेंमान । सर्पतालवृक्षासमान । नित्यभक्षितीतयालागुन । यमदूतताडिती ॥११७॥

लहानजीव उगेंचमारी । पडेदंशकुंडांतरी । दंशमानपरीवत्सरी । दंशजन्मम्लेंछत्व ॥११८॥

अर्धक्रोशप्रमाण । कुंडेंमशकादितीन । हस्तपादबांधून । ताडीतीदूतमाझेत्या ॥११९॥

मधुमक्षिकामारुन । मधुकरीभक्षण । तोहीपूर्ववतमान । दुःखसर्व अनुभवी ॥१२०॥

जोविप्रादंडकरी । तोवज्रकुंडांतरी । रोममानपरीवत्सरीं । हाहाकारकरीतसे ॥१२१॥

सातजन्मकाकसूकर । अर्थेंलोभेंदंडकर । कर्तानृपलोमवत्सर । वृश्चिककुंडीपडतसे ॥१२२॥

वज्रवृश्चिककुंडेदोन । वाप्यर्धयाचेंमान । वृश्चिकेंवज्रेपूर्ण । असतींजाणसावित्री ॥१२३॥

शरशलखड्गतीन । पूर्ववततयाचेमान । तत्तद्वस्तुपरीपुर्ण । अतिदुःखदपापिष्टा ॥१२४॥

विप्रजोकर्महोत । तयासीहींकुंडेंतीन । जेअसतीसंध्याहीन । भक्तिहीननर्कगामी ॥१२५॥

प्रजेसकोंडीकारागीरी । गोलकुंडत्यासनिर्धारी । पुर्वामाननिर्धारी । तप्तोदककिटादिक ॥१२६॥

नक्रादिकासिमारीत । नक्रकुंडींतोपडत । नक्रकंटकपरिमित । नक्रहोयस्वयेतो ॥१२७॥

अतिदुर्गंधमलिन । हेंकुंडपूर्वमान । नक्रकरितांभक्षण । हायहायपुकारी ॥१२८॥

पुण्यक्षेत्रींभारतीं । कामदृष्टींपाहेसती । काकमुखत्याप्रती । डोळेफोडितीकावळे ॥१२९॥

स्वलोमाब्दमान । विण्मूत्रतेथेंभक्षण । याचेंपूर्ववतमान । दग्धहोयत्रिजन्म ॥१३०॥

स्वर्णताम्रलोहचोर । मंथानबीजकुंडथोर । स्वलोमाब्ददुस्तर । कीटतोडितीतयासी ॥१३१॥

मानदोघांधनुःशत । यमदूत अतिताडित । सप्तजन्मदरिद्रीहोत । सोनारलोहारतांबट ॥१३२॥

देवद्रव्यतंत्रतस्कर । रोमाब्दमानभयंकर । वज्रकुंडीपडेंसत्वर । दग्धतैसाक्षुधार्त ॥१३३॥

मानत्याचेंधनुःशत । वज्रशिलाविनिर्मित । तप्तभूमीअंगपोळत । लोळवीतीतयांवरी ॥१३४॥

रुपेंस्त्रीगोरस । चोरीपाषाणकुंडत्यास । स्वलोमाब्दमानास । अंगभंगक्षणोक्षणी ॥१३५॥

कुर्मकुष्टीश्वेतबक । तीनतीनजन्मदुःख । वापीद्विगुणसंम्यक । परिमाणयाचेनारदा ॥१३६॥

तैसेंचतीक्ष्णपाषाण । कुंड असेंपूर्वमान । कांस्यादिचोरालागून । पूर्वमानेंभोगणें ॥१३७॥

अश्व आणिअधिकांग । रक्तपीतिदारुणांग । होयतयापादरोग । शुद्धहोयतेधवा ॥१३८॥

जारत्वेंजेंउत्पन्न । करितीनित्यजीवन । लालामुखांतनेऊन । पूर्वमानेंटाकिती ॥१३९॥

क्रोशमात्रयाचेंमान । लाळदुर्गंधपरिपूर्ण । शूलचक्षुरोगेकरुन । शुद्धहोयक्रमानें ॥१४०॥

म्लेंछांचेकरीसेवन । लेखनेंकरीजीवन । मसीकुंडींजाऊन । भोगीदुःखपुर्वमानें ॥१४१॥

मानयाचेधनुःशत । कृष्णपशुकृष्णबस्त । तीनतीनजन्मघेत । तालवृक्षशेवटीं ॥१४२॥

धान्यादिकांचातस्कर । चूर्णकुंडीशतवत्सर । मेषकुकुटवानर । तीनतीनजन्मयाचे ॥१४३॥

दरिद्रीआणिअल्पायुषी । होयशुद्धबहुदिवशी । क्रोशमानयाकुंडाशीं । चुनातप्तपसरला ॥१४४॥

विप्राचेंहरिवित्त । चक्रपूजातेणेंकरित । चक्रकुंडींतोपडत । शतवर्षेंपातकीं ॥१४५॥

तेलीहोयवंशहीन । जन्महोतीऐसेंतीन । पूर्ववत असेंमान । परिभ्रमेंअंनचुरे ॥१४६॥

वक्रतागोविप्राशी । वक्रकुंडमिळेंत्याशी । योजनएकमानाशी । अंधकारकंदरा ॥१४७॥

तेथेंराहेयुगशत । वक्रहीन अंगहोत । दरिद्रीभार्यावंशहोत । नष्टत्याचासप्तधा ॥१४८॥

गृघ्रबिडालसूकर । त्रित्रिवारहोयमयूर । कूर्ममांसभक्षीनर । कूर्मकुंडींतोपडे ॥१४९॥

एकक्रोशप्रमाण । कूर्म असतीदारुण । तेथेंराहेशतनाम । पूर्ववतयोनीकूर्मादि ॥१५०॥

तूपतेलजोचोरी । ज्वालाकुंडीनिर्धारी । तेलांततळितीसाचारी । शतवर्षेंपर्यंत ॥१५१॥

याचेंहीक्रोशमान । ज्वालाउठतीतेलांतून । मच्छमूषकहोऊन । सातवेळाशुद्धतो ॥१५२॥

स्रुगंधादिकरीहरण । भस्मकुंडत्यादारुण । तेंहीअसेंपूर्वमान । तप्तभस्मपाषाणतेथें ॥१५३॥

रोमाब्दतेथेंराहून । दुर्गंधिसप्तजनन । कस्तुरीमृगजन्मतीन । मनुष्यमगहोयतो ॥१५४॥

बलेंछलेंभूमिहरी । तप्तसूचिचाअधिकारीं । वसेसप्तमन्वंतरी । नित्यतप्तदुष्टात्मा ॥१५५॥

कृमीहोयविष्ठेंत । साठसहस्रपर्यंत । मगहोयभूमिरहित । दरिद्रीआणिअपवित्र ॥१५६॥

तेव्हांयोनीस्वयोनी । लागेसत्कर्माचरणी । मानयाचेंएकयोजनी । तप्तोदकक्षारते ॥१५७॥

तितकेंचखोल अंधार । लाटायेतिभयंकर । दुष्टजंतूअपार । पातक्यासीतोडिती ॥१५८॥

खड्गेंकरीजीवहनन । मनुष्यमारीदयाहीन । तयासीअसिपत्रवन । चौदाइंद्रपर्यंत ॥१५९॥

त्यांतहीमारितांब्राम्हण । शतमन्वंतरेंसेवीवन । अंगसदाछिन्नभिन्न । होयतयाचेचालता ॥१६०॥

मंथानआणिसूकर । जन्मघेणेंशंभरशंभर । सृगालकुक्कुटदर्दुर । सातसातजन्मघेणें ॥१६१॥

व्याघ्रवृकतीनवेळ । रेडाहोयदुर्बळ । हेंकुंडतेजागळ । अर्धक्रोशप्रमाण ॥१६२॥

वृक्ष अंसेताडाचा । खडगधारपानसाचा । स्रावहोयरक्ताचा । वरुनखालींलोटती ॥१६३॥

जोकरीग्रामदहन । क्षुरधारायुगेंतीन । अंगदग्ध आणिछिन्न । वरीमारदंडाचा ॥१६४॥

मगजायप्रेतयोनी । अग्नीपडेमुखांतुनी । नमिळेंकदाअन्नपाणी । अपवित्रभक्षीतसे ॥१६५॥

सप्तजन्मकपोत । शूलरोगाजन्मसात । तितुक्यानेंचकुष्टीहोत । शुद्धहोयक्रमानें ॥१६६॥

पराचेलागेकानीं । परनिंदावाखाणी । सूचिमुखीयुगतीनी । रडेबोंचतीसुयात्या ॥१६७॥

विंचुसर्पवज्रकीट । सातदाजन्मेंभस्मकीट । मनुष्यमगव्याधिष्ट । अर्धमाननर्कहा ॥१६८॥

फोडीलोकांचेंघर । गाईम्हशीबस्तचोर । गोकामुखीतोनर । तीनयुगेंतळमळीं ॥१६९॥

वीसधनुष्येंखोल । जंतूअसतीदंताळ । जन्मकरीसातवेळ । गोमहीषबक्रयाचा ॥१७०॥

चोरजोसाधारण । नक्रमुखीवर्षेंतीन । षोडशधनुप्रमाण । कुंड असेसावित्री ॥१७१॥

सातजन्महोयबैल । मगमानवदुर्बळ । महारोगीकंगाल । शुद्धहोयतेव्हांतो ॥१७२॥

गायगजवृक्षतुरंग । प्राणघेईसवेग । महापापीतीनयुग । गजदंशकुंडींपडतसें ॥१७३॥

हस्तीचेघेऊनदांत । ताडितीतयायमदूत । मानत्याचेधनुःशत । म्लेंछहोयसप्तधा ॥१७४॥

पाणीपिताधेनूशी । दूरकरीपापराशी । गोमुखाकारनर्कत्याशी । एकमनुसंतापे ॥१७५॥

महारोगीहोयनर । चांडाळहोयसप्तवार । कुंडमानविस्तर । चांडाळहोयसप्तवार । कुंडमानविस्तर । तीसधनुष्येंअसेतो ॥१७६॥

स्त्रीगोभिक्षुद्विज । हत्यासंपादीसहज । भ्रूणहातोपापिराज । कुंभिपाकतयासाठीं ॥१७७॥

चौदाइंद्रपर्यंत । दुखतेथेंभोगित । सहस्रधागृघ्रहोत । शतवारसूकरतो ॥१७८॥

काकसर्पसातवेळ । साठसहस्त्रवर्षकाळ । विष्ठाकीटहोयखळ । अनेकजननकरीतसे ॥१७९॥

क्रमेंकरुनीहोयबैल । मगकुष्टीदरिद्रीदुर्बळ । एवंभोगितांबहुकाळ । तेव्हांशुद्धहोयतो ॥१८०॥

कालचक्रभयानक । योजनायुतकुंभीपाक । लक्षपुरुषभयानक । खोलीज्याचीकुंभसां ॥१८१॥

कोठेंअसेंतप्ततैल । तप्ततांबेंकेलेंलाल । पापिश्रेष्ठांचीकेवळ । दूतकरितीप्रतिष्ठा ॥१८२॥

सर्वांगांकिडेचावती । पापीतेव्हांओरडती । इतक्यांतमुसळेंमारिती । दूतत्यांसीमुदगरे ॥१८३॥

जोंहोतीमूर्छित । तोतप्ततैलींसोडित । मेलोंमेलोंम्हणत । तवभरितीमुखींविष्ठा ॥१८४॥

तेणेंयेईओकारी । तोंपडेदंडगळ्यावरी । विव्हळतोलघुशंकाकरी । श्वानओढितीवृषणातें ॥१८५॥

एवंदुःखांचेंमार । पडतीत्यापाप्यावर । सर्वनर्कसंख्यासाचार । चतुर्गुणपापीयेथें ॥१८६॥

पुंश्चलीसीकरीगमन । कालसूत्रत्यालागुन । तप्ततेलपरीपूर्ण । कालसूत्रतेचिपै ॥१८७॥

ग्रहणींकरीभोजन । अरुंतुदकुंडजाण । क्षतेंकरितींचाऊन । ऐसेकीट अरुंतुद ॥१८८॥

ब्रम्हहत्येचेंलक्षण । बोलेतीससूर्यनंदन । शिवविष्णूगजानन । सूर्यशक्तीहीपांच ॥१८९॥

यांतभेदविचारी । ब्रम्हहत्यानिर्धारी । भक्तकिंवाविप्रवरी । भेदकरीतांब्रम्हहा ॥१९०॥

विष्णुविप्रपादोदक । शिवविष्णुनैवेद्यक । कृष्ण आणिब्रम्हएक । भेदतीचब्रम्हहत्या ॥१९१॥

वेदशास्त्रशक्तिभक्त । विष्णुशिव अविभक्त । द्वेषकरीतांत्वरीत । भेदतीचब्रम्हहत्या ॥१९२॥

एकादशींजन्माष्टमी । शिवरात्र अर्करामनवमी । व्रतनकरीअर्थकामी । ब्रम्हहत्याहोतसे ॥१९३॥

एवंअनेकविद्ध । कर्मकीजेसुबुद्ध । हरिसेवनाविणेंशुद्ध । कदानसेसावित्री ॥१९४॥

श्रीदेवीचेंआराधन । सर्वकर्मांचेंदहन । देवीभक्तीसंपन्न । वरेंमाझ्याहोसीलतूं ॥१९५॥

नारदाएवंयमेंबोलून । स्वलोकींकेलेंगमन । सावित्रीआणिसत्यवान । घरांआलेआनंदे ॥१९६॥

यमाचेंजेंवरदान । व्रतप्रभावेंकरुन । लक्षवर्षेंसुखभोगुन । गेलीवैकुंठांपतीसह ॥१९७॥

हेंसावित्रीआख्यान । जेकरितीश्रवणपठण । यमबाधातयालागून । कदांकाळींनसेची ॥१९८॥

दशोपरीसप्तशत । श्लोकसावित्रीचरित । अंबाबोलिलीप्राकृत । संक्षेपेयेथेंकृपेनें ॥१९९॥

श्रीदेवीविजयेनवमेदशमः ॥१०॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP