गणेश स्तोत्र - नमनाष्टकस्तोत्र
विश्वातील सर्व कारणांचे कारण असणारा असा सर्वात्मा, वेदांनी ज्याची महती गायली आहे, सर्वप्रथम पूजनीय असणार्या अशा गणेशाला मी वंदन करितो.
अगा हे निजानंदवासिन मयूरेशा । कृपासागरा भालचंद्रा परेशा ॥
तुला प्रार्थितो मी प्रभो विघ्ननाशा । नमस्कार माझा तुला श्रीगणेशा ॥१॥
महाविष्णु तो जन्मला त्वन्मुखात । महा शंभुही वर्णिला नेत्रजात ॥
विधि जन्म घे पासुनि नाभिदेशा । नमस्कार माझा तुला श्रीगणेशा ॥२॥
महाशक्ति झाली तुझ्या वाम अंगी । तसा सूर्यही जाहला दक्षभागी ॥
तुझे पुत्र हे पंचदेवेश ईशा । नमस्कार माझा तुला श्रीगणेशा ॥३॥
तुवां धीपते घेउनि वेष नाना । नरांतारिकां मारिले दुर्जनांना ॥
सदा सज्जना देशिबा पूर्ण तोषा । नमस्कार माझा तुला श्रीगणेशा ॥४॥
अहो राहसी इक्षुच्या सागरांत । अजा विघ्नपा लक्षलाभादितात ॥
स्वभक्तांचिया तोडि संसारपाशा । नमस्कार माझा तुला श्रीगणेशा ॥५॥
प्रिया सिद्धि बुद्धी तुझ्या दोन जाया । जगा मोहवीती अनाद्यंत गाया ।
तया आंवरी तूचिं हेरंबधीशा । नमस्कार माझा तुला श्रीगणेशा ॥६॥
मयूरेश्वरा मोरया ढुंढिराजा । नमो विघ्नपा जेष्ठराजाधिराजा ॥
कृपा वीतरी सेवकी ब्रह्मवेषा । नमस्कार माझा तुला श्रीगणेशा ॥७॥
अनंतापराधा क्षमावे दयाळा । स्वंपादाब्ज दावी मला चंद्रमाळा ॥
पुन्हा प्रार्थना ही तुझ्या पाददेशा । नमस्कार माझा तुला श्रीगणेशा ॥८॥
॥ जय जय गणेश ॥
N/A
References : N/A
Last Updated : April 04, 2013
TOP