मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री रामदासस्वामींचे साहित्य|प्रासंगिक कविता| शिवाजी महाराजांस पत्र. प्रासंगिक कविता रामरूपी भूत आत्मचरित्र डफगाणें शिवाजी महाराजांस पत्र. राजधर्म क्षात्रधर्म समास १ समास २ विठ्ठलरूप राम मातुश्रीस पत्र श्रेष्ठ यांस पत्र प्रासंगिक कविता -बाग प्रकरण समास १ समास २ श्रेष्ठांस पत्र मारुतीची प्रार्थना सावधता प्रकरण उत्तर ब्रह्मपिसा खंडोबाची आरती डफगाणें श्रेष्ठांच्या मुलांस उपदेश प्रतापगडच्या भवानी देवीचें स्तोत्र संभाजीस उपदेश खंडोबाची आरती डफगाणें श्रेष्ठांच्या मुलांस उपदेश भवानी देवीचें स्तोत्र संभाजीस उपदेश प्रासंगिक कविता - शिवाजी महाराजांस पत्र. समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला. Tags : kavitapoemramdassamarthaकवितारामदाससमर्थ शिवाजी महाराज यांस समर्थांच्या भेटीची सारखी उत्कंठा लागून राहिली होती. यासंबंधें समर्थांचें महाराजांस पत्र आलें तें Translation - भाषांतर ओव्यानिश्चयाचा महामेरु । बहुत जनांसी आधरु । अखंड स्थितींचा निर्धारु । श्रीमंत योगी ॥१॥परोपकाराचिया राशी । उदंड घडती जयासी । तयाचे गुणमहत्वासी । तुळणा कैंची ॥२॥नरपति हयपति गजपति । गडपति भूपति जळपति । पुरंदर आणि छत्रपति । शक्ति पृष्ठभागीं ॥३॥यशवंत कीर्तिवंत । सामर्थ्यवंत वरदवंत । पुण्यवंत नीतिवंत । जाणता राजा ॥४॥आचारशील विचारशील । दानशील धर्मशील । सर्वज्ञपणें सुशील । सकळां ठायीं ॥५॥धीर उदार गंभीर । शूर क्तियेसी तत्पर । सावधपणें नृपवर । तुच्छ केले ॥६॥तीर्थक्षेत्रें मोडिलीं । ब्राह्मणस्थानें भ्रष्ट झालीं । सकळ पृथ्वी आंदोळली । धर्म गेला ॥७॥देव धर्म गोब्राह्मण । करावया संरक्षण । हदयस्थ जाला नारायण । प्रेरणा केली ॥८॥उदंड पंडित पुराणिक । कवीश्वर याज्ञिक वैदिक । धूर्व तार्किक सभानायक । तुमच्या ठायीं ॥९॥या भूमंडळाचें ठायीं । धर्म रक्षी ऐसा नाहीं । महाराष्ट्रधर्म राहिला कांहीं । तुम्हां करिताम ॥१०॥आणिकही धर्मकृत्यें चालती । आश्रित होऊनि कित्येक राहती । धन्य धन्य तुमची कीर्ति । विश्वीम विस्तारली ॥११॥कित्येक दुष्ट संहारिले । कित्येकांस धाक सुटले । कित्येकांस आश्रय झाले । शिव कल्याणराजा ॥१२॥तुमचे देशीं वास्तव्य केलें । परंतु वर्तमान नाहीं घेतलें । ऋणानुबंधें विस्मरण झालें । काय नेणूं ॥१३॥सर्वज्ञ मंडळी धर्ममूर्ति । सांगणें काय तुम्हांप्रति । धर्मस्थापनेची कीर्ति । सांभाळली पाहिजे ॥१४॥उदंड राजकारण तटलें । तेणें चिंत्त विभागिलें । प्रसंग नसतां लिहले । क्षमा केली पाहिजे ॥१५॥ N/A References : N/A Last Updated : April 01, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP