मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री रामदासस्वामींचे साहित्य|प्रासंगिक कविता| समास १ प्रासंगिक कविता रामरूपी भूत आत्मचरित्र डफगाणें शिवाजी महाराजांस पत्र. राजधर्म क्षात्रधर्म समास १ समास २ विठ्ठलरूप राम मातुश्रीस पत्र श्रेष्ठ यांस पत्र प्रासंगिक कविता -बाग प्रकरण समास १ समास २ श्रेष्ठांस पत्र मारुतीची प्रार्थना सावधता प्रकरण उत्तर ब्रह्मपिसा खंडोबाची आरती डफगाणें श्रेष्ठांच्या मुलांस उपदेश प्रतापगडच्या भवानी देवीचें स्तोत्र संभाजीस उपदेश खंडोबाची आरती डफगाणें श्रेष्ठांच्या मुलांस उपदेश भवानी देवीचें स्तोत्र संभाजीस उपदेश कारखाने प्रकरण - समास १ समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला. Tags : kavitapoemramdassamarthaकवितारामदाससमर्थ सामनगडावर किल्ला बांधतांना सांगितलेलें Translation - भाषांतर ऐका विटांचा प्रसंग । लांबी रुंदी यथासांग । चौक नेमस्त व्यंग । असोंचि नये ॥१॥वीट लांबी नऊ तसू । आणि रुंदी सात तसू । उंची जाणिजे तीन तसू । पाठपोट नेमस्त ॥२॥खाली बरड वरी खडगा । वीट कामा नयेगा । धारेकोरेपाशीं दगा । कामा नये ॥३॥भूमीपासूनि नीट करावी । कलबुताची कळाशी धरावी । आंतपावेतों नेमस्त भरावी । खिळे मारुनी ॥४॥खडे खापरी कामा नये । थोडें कमावणें कामा नये । थोडी लीद कामा नये । आणि बहुत ॥५॥राख कोंडा बुळग्या दाणे । घालूम नये दैन्यवाणें । अथवा कांहीं अधिक उणें । करूंचि नये ॥६॥घट्ट चिखल कामा नये । पातळ तरी असूंचि नये । दडपितां कळाशी वाहूं नये । नाथर बुजे ॥७॥खणख णीत वाळवाव्या । झणझणीत भाजाव्या । भट्टया नेमस्त कराव्या । आणि दरी ॥८॥ओलें सरपण कामा नये । कावळकाटया कामा नये । मोठे ढोण कामा नये । नेमस्त असावे ॥९॥जाळ घालावा नेमस्त । उमास करूं नये व्यस्त । ठाव असावा प्रशस्त । समान भूमी ॥१०॥पूजाविधि चुकों नेदावी । भट्टी बरी निवूं द्यावी । वीट हळू उतरावी । टाकूं नये ॥११॥पहिलेपासून शेवटवरी । अंत:करण बरें विवरी । आळस करील तो वैरी । कामा नये ॥१२॥कामकर्त्यास गमूम देऊं नये । काम घेतां त्रासूं नये । कठीण शब्द बोलूं नये । क्षणक्षणां ॥१३॥दिवस उगवल्यावरी येऊं देऊं नये । गमित माणूस कामा नये । आशक्त पोर कामा नये । आणि म्हातारे ॥१४॥बळकट लोक निवडावे । काम पाहूनि लावावे । सगट मुशारे करावे । हें मूर्खपण ॥१५॥जेवणापुरतें बसों द्यावें । सवेंचि कामास लावावें । दिवस धारे संभाळावें । क्षणक्षणां ॥१६॥वेळ गमूंचि नेदावा । खोटा रुका बदलून द्यावा । मुशारा रेवूंचि न द्यावा । तमक खोटा ॥१७॥हिशेब बरा राखीत जावा । लिहिण्याचा आळस नसावा । मुबदला करीत जावा । उप-सामुग्री ॥१८॥खिळे कुराडी पायळ्या । पहारा संबळ कुदळ्या । सन फावडे लेरसळ्या । तरफा असाव्या ॥१९॥नाडे साले काचे दोर । काढवेणे कळके ढोलर । उथाळ्या चाळण्या डाळया थोर । तक्ते बळकट काथवटी ॥२०॥मांदणे डेरे घागरी । रांजण गाडगीं भारी । पाळीं बहुतां परोपरी । दांडे असावे ॥२१॥धोंडे गुंडे चिपा चिपरे । खरुस चुना वाळू कंकरे । पाटे वरवंटे बरे । कामगार असावे ॥२२॥पोशिदे असावे सावधान । हुन्नरबंदी तुफान ॥ दोघांचे एक चित्त मन । कामा नये ॥२३॥तिकटया सूत्रें ओळंबे । काम पाहूनियां मनुष्य झोबे । तरी मग इमारती खेबडंगे । उभे राहती ॥२४॥ N/A References : N/A Last Updated : April 01, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP