मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री रामदासस्वामींचे साहित्य|प्रासंगिक कविता| संभाजीस उपदेश प्रासंगिक कविता रामरूपी भूत आत्मचरित्र डफगाणें शिवाजी महाराजांस पत्र. राजधर्म क्षात्रधर्म समास १ समास २ विठ्ठलरूप राम मातुश्रीस पत्र श्रेष्ठ यांस पत्र प्रासंगिक कविता -बाग प्रकरण समास १ समास २ श्रेष्ठांस पत्र मारुतीची प्रार्थना सावधता प्रकरण उत्तर ब्रह्मपिसा खंडोबाची आरती डफगाणें श्रेष्ठांच्या मुलांस उपदेश प्रतापगडच्या भवानी देवीचें स्तोत्र संभाजीस उपदेश खंडोबाची आरती डफगाणें श्रेष्ठांच्या मुलांस उपदेश भवानी देवीचें स्तोत्र संभाजीस उपदेश प्रासंगिक कविता - संभाजीस उपदेश समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला. Tags : kavitapoemramdassamarthaकवितारामदाससमर्थ समर्थांनीं पत्रद्बारें केलेला Translation - भाषांतर अखंड सावधान असावें । दुश्चित कदापि नसावें । तजवीजा करीत बसावें । एकांत-स्थळीं ॥१॥कांहीं उग्र स्थिति सांडावी । कांहीं सौम्यता धरावी । चिंता लागावी परावी । अंतयामीं ॥२॥मागील अपराध क्षमावे । कारभारी हातीं धरावे । सुखी करून सोडावे । कामाकडे ॥३॥पाणवठीं तुंब निघेना । तरी मग पाणी चालेना । तैसें सज्जनांच्या मना । कळलें पाहिजे ॥४॥जनाचा प्रवाह चालिला । म्हणजे कार्यभाग आटोपला । जन ठायीं ठायीं तुंबला । म्हणजे खोटें ॥५॥श्रेष्ठीं जें जें मिळविलें । त्यासाठीं भांडत बैसले । मग जाणावें फावलें । गुलामांसी ॥६॥ऐसें सहसा करूं नये । दोघे भांडतां तिसर्यासी जाये । धीर धरोन महत्कार्य । समजून करावें ॥७॥आधींच पडली धास्ती । म्हणजे कार्यभाग होय नास्ती । याकारणें समस्तीं । बुद्धि शोधावी ॥८॥राजी राखितां जग । मग कार्य-भागाची लगबग । ऐसें जाणोनियां सांग । समाधान राखावें ॥९॥सकल लोक एक करावें । गलीम निवटून काढावे । ऐसें करितां कीर्ति धांवे । दिंगतरीं ॥१०॥आधीं गाजवावे तडाके । मग भूमंडळ धाके । ऐसें न होतां धक्के । राज्यासी होती ॥११॥समय प्रसंग ओळखावा । राग निपटून काढावा । आला तरी कळों न द्यावा । जनांमध्यें ॥१२॥राज्या-मध्यें सकळ लोक । सलगी देऊन करावे सेवक । लोकांचे मनामव्यें धाक । उपजोंचि नये ॥१३॥बहुत लोक मिळवावे । एक विचारें भरावे । कष्टें करोनि घसरावें । म्लेंच्छांवरी ॥१४॥आहे तितुकें जतन करावें । पुढें आणिक मिळवावें । महाराष्ट्र राज्य करावें । जिकडे तिकडे ॥१५॥लोकीं हिंमत धरावी । शर्तीची तरवार करावी । चढती वाधती पदवी । पावाल येणें ॥१६॥शिवराजास आठवावें । जीवित्व तृणवत् मानावें । इहलोकीं परलोकीं राहावें । कीर्तिरूपें ॥१७॥शिवराजाचें आठवावें रूप । शिवराजाचा आठवावा प्रताप । शिवराजाचा आठवावा साक्षेप । भूमंडळीं ॥१८॥शिवराजाचें कैसें चालणें । शिवराजाचें कैसें बोलणें । शिवराजाची सलगी देणें । कैसें असे ॥१९॥सकळ सुखांचा त्याग । करूनि साधिजे तो योग । राज्यसाधनाची लग-बग । कैसी असे ॥२०॥त्याहून करावें विशेष । तरीच म्हणावें पुरुष । याउपरी आतां विशेष । काय लिहावें ॥२१॥॥ प्रासंगिक कविता संपूर्ण ॥॥ एकूण प्रासंगिक कविता संख्या ॥४०५॥ N/A References : N/A Last Updated : April 02, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP