मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री रामदासस्वामींचे साहित्य|प्रासंगिक कविता| श्रेष्ठांच्या मुलांस उपदेश प्रासंगिक कविता रामरूपी भूत आत्मचरित्र डफगाणें शिवाजी महाराजांस पत्र. राजधर्म क्षात्रधर्म समास १ समास २ विठ्ठलरूप राम मातुश्रीस पत्र श्रेष्ठ यांस पत्र प्रासंगिक कविता -बाग प्रकरण समास १ समास २ श्रेष्ठांस पत्र मारुतीची प्रार्थना सावधता प्रकरण उत्तर ब्रह्मपिसा खंडोबाची आरती डफगाणें श्रेष्ठांच्या मुलांस उपदेश प्रतापगडच्या भवानी देवीचें स्तोत्र संभाजीस उपदेश खंडोबाची आरती डफगाणें श्रेष्ठांच्या मुलांस उपदेश भवानी देवीचें स्तोत्र संभाजीस उपदेश प्रासंगिक कविता - श्रेष्ठांच्या मुलांस उपदेश समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला. Tags : kavitapoemramdassamarthaकवितारामदाससमर्थ श्रेष्ठ परंधामास गेले त्या वेळीं समर्थांनीं पत्रद्वारें केलेला Translation - भाषांतर बरें सत्य बोला यथातथ्य चाला । बहू मानिती लोक येणें तुम्हांला ।धरा बुद्धिपोटी विवेकें मुलें हो । बरा गूण तो अंतरामाजीं राहो ॥१॥सदा संत घांसोनि तोंडा धुवावें ।कळाहीन तें शूद्र मूखीं नसावें ।सदा सर्वदा यत्न सोडूं नये रे । बहूसाल हा खेळ कामा नये रे ॥२॥दिसामाजिं कांहीं तरी तें लिहावें । प्रसंगीं अखंडीत वाचीत जावें ।गुणश्रेष्ठ ऊपास्य त्याचें करावें । बरें बोलणें सत्य जीवीं धरावें ॥३॥बहू खेळ खोटा सदालस्य खोटा । समस्तांसि भांडेलची तो करंटा ।बहूतां जनांलागीं जीवीं भजावें । भल्यासंगतीं न्याय तेथें भजावें ॥४॥हिशोबीं सदा न्याय सांडूं नये रे । कदाचीत अन्याय होतां धका रे । जनीं सांडितां न्याय रे दु:ख होतें । महा सूख तेंही अकस्मात जातें ॥५॥प्रचीतीविणें बोलणें व्यर्थ वांया । विवेकेंविणें सर्वही दंभ जाया ।बहू सज्जला नेटका साज केला । विचारा विणें सर्वही व्यर्थ गेला ॥१६॥वरी चांगला अंतरीं गोड नाहीं । तया मानवाचें जिणें व्यर्थ पाहीं ।वरी चांगला अंतरीं गोड आहे । तया लगिं कोणी तरी शोधिताहे ॥७॥सदा अंतरीं गोड तें सांडवेना । कदा अंतरीं ओखटें देखवेना ।म्हणूनी बरा गूण आधीं धरावा । महाघोर संसार हा नीरसावा ॥८॥भला रे भला बोलती तें करावें । बहूतां जनांचें भुखें येश ध्यावें ।परी शेवटीं सर्व सोडूनी द्यावें । मरावें परी कीर्तिरूपें उरावें ॥९॥बरा ओखटा सर्व संसार झाला । अकस्मात येईल रे काळघाला ।म्हणोनी भले संगतीं सत्य चाला । जनीं दास तो बोधिताहे भुलांला ॥१०॥ N/A References : N/A Last Updated : April 01, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP