भक्तवत्सलता - अभंग २
संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.
N/Aहोसि भक्तांचा कोंवसा । तुझीं ब्रीदें ह्लषिकेशा । निव-विलें सायासा । कृपासिंधु मुरारी ॥१॥
अंबरुषिकारणें । दहा वेळ गर्भवासा येणें । अवतार धरिला नारायणें । गजापूर नगरीं ॥२॥
अंदुरायाच्या घरीं । बाळ जळसेनाच्या कुमरीं । मत्स्य रूप अवतार धरी । वेद हरणकैवारी नारायण ॥३॥
विद्यापुर नगरीं । अंधरुराजा राज्य करी । श्रियादेवी त्या सुंदरी । उदरीं कुमरु जन्माला ॥४॥
पृथ्वी रसातळवटीं । जातां थोर अंदोळली सृष्टी । धांवण्या धांवले जगजेठी । धर पृष्ठीं सांवरिली ॥५॥
मर्गजपुरीं पुरपती । हिर-ण्याक्ष चक्रवर्ती । अग्नि असे जनवंती । घरीं बाळ वराह ॥६॥
त्रिदश-देवश्रिया चाडा । हिरण्याक्ष वधिला गाढा । भूगोल धरूनियां दाढा । केला निवाडा स्वर्यीचा ॥७॥
कर्पूरपुरपाटण । हरिभक्तीचें हें स्थान । सदयादेवी प्रिया नंदन । उदरीं नृसिंह जन्मला ॥८॥
पित्या पुत्रा झाली कळी । स्तंभीं प्रगटला तयेवेळीं । असुर मारिला करकमळीं । भक्त प्रर्हाद रक्षिला ॥९॥
कश्यपनंदनवर्धन । कोवळादशाचा वामन । खुजट रूप धरून । महेंद्रपुरीसी आला ॥१०॥
दानें तपें व्रतें बळी । सोही घातला पाताळीं । अद्यापि राहिला जवळी । चरणातलीं पद देउनी ॥११॥
रेणापुरीं देवी रेणुका । लाधली जमदग्नीस देखा । तिचे उदरीं विश्वतारका । परशुराम जन्मला ॥१२॥
असुरीं वधि-येली माया । ह्मणे धांवें पुत्रराया । अवचित पातला धावया । सह-सार्जुन मारिला ॥१३॥
अयोध्या नाम नगरी । जन्म कौसल्ये उदरीं । देवभक्तांचा कैवारी । दशरथनंदन राघव ॥१४॥
राम त्रैलोक्यीं वीर दारुण । तेणें वधियेला रावण । अढळपद देऊन । राज्यीं बिभीषण स्थापिला ॥१५॥
मथुरा नामें नगरीं । वसुदेव दे-वकी उदरीं । कृष्ण आठबा अवतारी । लीला विग्रहि जन्मले ॥१६॥
कंस चाणूर मर्दिले । विमळार्जुन उन्मळिले । सप्त गर्भाचे सूड घेतले । रक्षिलें गाई गोपाळां ॥१७॥
बौद्ध श्रीवत्साच्या घरीं । जन्म शांभवीच्या उदरीं । राजा कांतिये नगरीं । निरंतर रूपें राहिला ॥१८॥
ध्यान मुद्रा मांडूनियां । वस्त्रें शस्त्रें त्यजूनियां । राहिला पैं निरंजनिया । भक्तिभाव ओळखे तो ॥१९॥
कल्कि जसरा-याचा पुत्र । सावित्री देवीचा कूमर । शंभलापुरीं करील अवतार । दाही रूपें प्रगटला ॥२०॥
ऐसा अमूर्त मूर्ति विटेव र । उभा राहिला निरंतर । विष्णुदास नाम्याचा दातार । वर विठ्ठल पंढरीये ॥२१॥
N/A
References : N/A
Last Updated : December 22, 2014
TOP