मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शेख महंमदबाबा श्रीगोंदेकर|प्रसंग पहिला| ‘म’ कार प्रसंग पहिला ईश्वर स्तवन - ॐ कार ‘न’ कार ‘म’ कार मातृपितृ वंदन ‘सि’ कार ‘ध’ कार लेखनप्रशस्ति सद्गुरूची आज्ञा-लेखन लेखन अनुभवी असावें पंचमा-कृपा प्रसंगसमाप्ति प्रसंग पहिला - ‘म’ कार श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते. Tags : kavitapoemsaintsheikh muhammadकविताकाव्यमराठीशेख महंमदसंत ‘म’ कार Translation - भाषांतर वर्णना कर जोडुनी । सद्भाव धरूनियां मनीं । प्रेम दुणावलं तत्त्व धरुनी । बोधी बोधाचें परियेसा ॥२३॥‘म’ मार्गे मार्ग दाविला मज । यालागीं वंदिला सद्गुरुराज । संतीं निरोपिलें ब्रह्मबीज । श्रवणीं माझे ॥२४॥महद माया निरसिली जेणें । दाविलें निराभास ठेवणें । मग तीं लोपली दर्शनें । द्वैतपणाचीं ॥२५॥जैसें सन्मुख पाहातं दर्पण । सन्मुख देखिजे आपण । तैसें सद्गुरु पाहाणेपण । पाठ पोट नाहीं ॥२६॥आतां माझें नमन जीं सद्गुरु । करावा पतितांचा अंगिकारु । तुम्ही महा वरिष्ठ दिगंबरु । दीन तारक दुजे ॥२७॥मानापमानावेगळे केलें । शिष्यत्व लोपवूनि गुरुत्व दीधलें। परि म्यां पाहिजे जतन केलें । कृपेनें तुमचिये ॥२८॥मायबापांचा अठवितां उपकार । त्यांनी हा वाढविला संसार । परि भवमोचकाचा विचार । नेणतीच कांहीं ॥२९॥ममता धरूनियां विस्तार । केला लक्ष चौर्यांशी कारभार । तितुके ठायीं विषय विष अपार । मज भोवणें लागलें ॥३०॥‘म’ अक्षर केवळ जाणा । त्यांत वर्णिला सद्गुरुराणा । पुढें योगेश्र्वरांच्या स्तवना । आरंभ केला ॥३१॥मग सद्गुरु म्हणे शेख महंमद । तुंवा माता पिता वंदिजे शुद्ध । हा ऐके पां माझा शब्द । सगुण सुता ॥३२॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP