प्रसंग पहिला - प्रसंगसमाप्ति
श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.
घडिक भला घडिक फुंदे अनाचारें । हें सांग स्वामी कवणिया विचारें । सद्गुरु म्हणती ऐक उत्तरें । विश्र्वास धरूनियां ॥९८॥
तुमच्या ज्ञानविवेकाची गोडी । ते मज कळे ना मति असे थोडी । पिता घांस चाऊनियां आवडी । बालकामुखीं घालितसे ॥९९॥
तैसे निज विवेकाचे घांस । तुम्ही आवडी घालावे मुखास । तेणें प्रेमबोध उल्हास । होईल मातें ॥१००॥
सत्वर प्रसंग पहिला संपला । पुन्हां भावें दुसरा आरंभिला । सावध व्हावें अनुभवाला शेख महंमद म्हणे ॥१०१॥
Last Updated : November 11, 2016
TOP