प्रसंग पहिला - सद्गुरूची आज्ञा-लेखन
श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.
त्रिभुवन दिसें ठेंगणें । लक्ष चौर्यांशींचें भ्रमणें दृष्टि भासे ॥६३॥
आतां सद्गुरु बोलिले निज गुह्य । ब्रह्मविद्या निरोपिली तुज । तुंवा लीन व्हावें सहज । अनुवाद देखोनियां ॥६४॥
पाहे जे जे आनुवादा पातले । थितें कर्मजंजाळा गुंतले । ते न होती सद्गुरुचे अंकिले । बरळती बाष्कळ ॥६५॥
सरज्या अंकुश डफावरी लावून । हाटोंहाट उमगती भांडण । जैसें पिसाळलें श्र्वान । किंवोन झडा घालित असे ॥६६॥
दांडाईत डफगण्याची एकचि मती । दाटून खवळून कळी करिती । परी ते नेणती ब्रह्मस्थिती । स्वयें अनुभवें ॥६७॥
दृष्टांत डांकुलता हिंसा करी । शब्दज्ञानें ठकी नरनारी । तैसी कीर्तनाची भरउभरी । किरवें वधूनियां ॥६८॥
जैसे थोडें क्षीर डेरां ताविलें । उतों आल्या बहुतसें देखिलें । तैसें शब्दज्ञात्यांस जालें । भीतरी रितें राहिलेंसें ॥६९॥
रितां कुंभ मस्तकीं घेतला । तो पवनें वाजत नदीस गेला । जळ भरिल्या धरिला अबोला । तैसें बोधाचें चिन्ह ॥७०॥
थोडें जळ कुंभ शीरावरी । चालतां हिंदोळा हिंदोळ करी । तैसें अघोर्यासी बोलतां विचारी । कष्टी होईजेल ॥७१॥
जो व्याधिग्रस्त तिडकाळू केला देवें । त्यास जरी आपण भेटिजे स्वभावें । तरी शीघ्र पीडा भरेल वोळखावें । ठायींचेंचि भल्यांनी ॥७२॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP