प्रसंग पहिला - ‘ध’ कार

श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.



मग अभिवादती ते साधकेश्र्वर । तुंवा पुर्वीच पूजिला ईश्र्वर । म्‍हणोनि फुटती अंकुर । सोंवळे हृदयी तुझे ॥५५॥
मग ॠषीस केल नमस्‍कार । पुढें आरंभिला तो ‘ध’ कार । माघार सांडिला ‘सि’ कार । अक्षरबंधेसी ॥५६॥
‘ध’ कारीं नमिले ते श्रोते । आणि महा कुशल वक्ते । यावेगळे ते बावळे नेणते । नमस्‍कारिले ॥५७॥
शाहाण्णव कुळींचें कवीश्र्वर । आणिक निज भक्त उदार । तितुकियांस माझा नमस्‍कार । साष्‍टांगें पैं ॥५८॥
नमस्‍कार करूनियां वचन । बोले शेख महंमद विज्ञापन । लडिवाळ असे तुमचें दीन । आशिर्वादावें ॥५९॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP