अन्नपूर्णास्तुति
मोरोपंत हे जरी संत नव्हते, तरी सदाचरणी, सच्छील असे ते एक विद्वान् गृहस्थाश्रमी होते.
( गीतिवृत्त )
जय देवि ! अन्नपूर्णे ! भगवति ! विश्वेश्वरप्रिये ! वरदे !
परदेवते ! भवार्णवपतिता, शरणागता, जना कर दे. १
प्रणतांसि अन्नपूर्णे ! करिति तुझे देवभूप पाय सदा.
संतर्पिसि वात्सल्यें तूं भक्तिज्ञानरूपपायसदा. २
काशींत अन्नपूर्णे ! निवविसि, देवूनि वस्त्र अन्न, मना.
पाय तुझे पात्र सदा, जे साधु असाधु जीव, तन्नमना. ३
तूं माय अन्नपूर्णे ! देता विश्वेश आत्मपद तात.
द्याया स्वास्थ्य मज जडा, हें नातें सकल साधु वदतात. ४
करिसि गुहमयूरेश्वर यांचें प्रेमेंकरूनि जेंविहित,
तैसाचि अन्नपूर्णे ! मीहि करावें असेल जें विहित. ५
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP